Marathi News Photo gallery Sports photos Ipl 2023 dc vs kkr delhi capitals captain david warner break mi rohit sharma most runs record against single opponent in ipl
Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्मा याच्यासाठी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्याआधी वाईट बातमी
मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन करणाऱ्या कॅप्टन रोहित शर्मा याला पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्याआधी मोठा झटका लागला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला मजबूत झटका लागला आहे. आयपीएल 16 व्या सिजनमधील 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने सलग 5 पराभवानंतर सहाव्या मॅचमध्ये पहिला विजय मिळवला. दिल्लीने केकेआरवर 4 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीकडून कॅप्टन डेव्हिड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी केली.
1 / 5
डेव्हिड वॉर्नर याने 33 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. वॉर्नरचं या मोसमातील हे चौथं अर्धशतक ठरलं. वॉर्नरने यासह मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा याचा रेकॉर्डही ब्रेक केला.
2 / 5
वॉर्नर आयपीएलमध्ये केकेआरवर विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. वॉर्नरच्या नावावर केकेआर विरुद्ध 1 हजार 75 धावांची नोंद आहे. तर रोहित शर्माच्या नावावर एकाच टीम विरुद्ध 1 हजार 40 रन्स आहेत.
3 / 5
दिल्लीच्या गोलंदाजानीही कारमाना केला. केकेआर विरुद्ध दिल्लीच्या गोलंदाजांनी 120 पैकी 67 डॉट बॉल टाकले. आयपीएलच्या या 16 व्या हंगामात सर्वाधिक डॉट बॉल्स टाकण्याची ही दुसरीच वेळ ठरली. या आधी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 74 डॉट बॉल टाकण्यात आले.
4 / 5
तसेच दिल्ली विरुद्धच्या सामन्यात केकेआरच्या आंद्रे रसेल याला सूर गवसला. रसेलने मुकेश कुमार याच्या बॉलिंगवर केकेआरच्या डावातील शेवटच्या म्हणजेच 20 व्या ओव्हरमध्ये सलग 3 सिक्स ठोकले. रसेलची अशी कामगिरी करण्याची ही दुसरी वेळ ठरली.