AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत अखेर इतिहास घडला, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने ठोकलं पहिलं शतक

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या वाटेला फलंदाजी आली. नॅट स्कायव्हर ब्रंटच्या फलंदाजीचा झंझावात या सामन्यात पाहायला मिळाला.

| Updated on: Jan 26, 2026 | 9:22 PM
Share
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 199 धावा केल्या. तसेच विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. यात नॅट स्कायव्हर ब्रंट मोलाचा वाटा राहीला. (Photo: BCCI/WPL)

1 / 5
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं हे चौथं पर्व आहे. आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात कोणालाही शतक ठोकता आलं नव्हतं. पण ही किमया चौथ्या पर्वात नॅट स्कायव्हर ब्रंटने केली. तिने या स्पर्धेतील पहिलंवहिलं शतक ठोकण्याचा मान मिळवला.  (Photo: BCCI/WPL)

2 / 5
नॅट स्कायव्हर ब्रंटने 57 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 100 धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेट 175.44 चा होता. चौकार आणि षटकारांच्या मदतीने तिने 70 धावा केल्या. (Photo: BCCI/WPL)

नॅट स्कायव्हर ब्रंटने 57 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 100 धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेट 175.44 चा होता. चौकार आणि षटकारांच्या मदतीने तिने 70 धावा केल्या. (Photo: BCCI/WPL)

3 / 5
नॅट स्कायव्हर ब्रंटने शतक ठोकण्यापूर्वी पाच फलंदाज शतकाच्या वेशीवर आले होते. पण त्यांच्याकडून काही शतक झालं नाही. 2025 मध्ये जॉर्जिया वोलने नाबाद 99, 2023 मध्ये सोफि डिव्हाईने 99, 2023 मध्ये एलिसा हिलीने नाबाद 96, 2025 मध्ये बेथ मुनीने नाबाद 96 आणि स्मृती मंधानाने 2026 मध्ये 96 धावांची खेळी केली होती. (Photo: BCCI/WPL)

4 / 5
नॅट सायव्हर-ब्रंट म्हणाली, की मी ९० च्या आसपास काही खेळाडू बाद होताना पाहिले आहेत. म्हणून मला ते पुन्हा करायचे नव्हते. पण मला संघासाठी जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या. आपण त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकलो याचा मला खूप आनंद झाला. वैयक्तिकरित्या मलाही खूप आनंद झाला. (Photo: Mumbai Indians Twitter)

5 / 5
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.