भारतीय राजकारणात गंभीरसह या 10 क्रिकेटपटूंनी आजमावलं नशिब, जाणून घ्या त्यांची कारकिर्द

भाजपा खासदार गौतम गंभीर याने राजकारणाला रामराम ठेोकला आहे. त्यानंतर बरीच चर्चा रंगली आहे. आतापर्यंत क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर दहा क्रिकेटपटूंनी राजकीय पटलावर आपलं नशिब आजमावलं. चला जाणून घेऊयात क्रिकेटपटूंबद्दल

| Updated on: Mar 02, 2024 | 3:47 PM
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने राजकारणाला रामराम ठोकला आहे. 2019 मध्ये पूर्व दिल्ली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आला होता. आता गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर त्याने याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

1 / 11
टीम इंडियासाठी 15 सामने खेळलेले मनोज तिवारी हे पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून 2021 ची विधानसभा निवडणूक लढवली आणि शिबपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

2 / 11
नवज्योत सिंग सिद्धूने राजकीय प्रवासाला भाजपामधून सुरुवात केली होती. त्यानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात धरला. 2019 मध्ये पंजाब काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम पाहिले. याआधी सिद्धूने भारतासाठी 187 सामने खेळले आहेत.

3 / 11
माजी भारतीय कर्णधार मन्सूर अली खान पतौडी हे राजकारणात आपली इनिंग सुरू करणाऱ्यांपैकी एक होते. हरियाणातील भिवानी आणि मध्य प्रदेशातील भोपाळमधून त्यांनी दोनदा लोकसभा निवडणूक लढवली आणि दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला

4 / 11
टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने 2014 ची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील फुलपूरमधून काँग्रेसकडून लढवली होती. मात्र पहिल्याच प्रयत्नात पराभूत झाल्यानंतर राजकारणापासून दूर गेला.

5 / 11
टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन 2009 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मतदारसंघातून काँग्रेस खासदार म्हणून निवडून आला होता. आता हैद्राबाद काँग्रेसमध्ये ओळख निर्माण केली आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्युबली हिल्स मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांचा पराभव झाला.

6 / 11
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू कीर्ती आझाद यांनी बिहारमधील दरभंगा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून तीनदा विजय मिळवला आहे. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेले आझाद आता राजकारणापासून दूर राहिले आहेत.

7 / 11
टीम इंडियाचा माजी कसोटीपटू चेतन चौहान हे उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून दोन वेळा भाजपचे खासदार आहेत. 2004 मध्ये पराभवानंतर त्यांनी राजकारणाला रामराम ठोकला.

8 / 11
भारतीय संघाचे माजी फलंदाज विनोद कांबळी यांनी 2009 ची विधानसभा निवडणूक मुंबईतील विक्रोळी येथून लोकभारती पक्षाकडून लढवली होती. ती निवडणूक हरल्यानंतर ते राजकारणापासून दूर गेला.

9 / 11
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मनोज प्रभाकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी 169 सामने खेळल्यानंतर आता त्यांची भारतीय जनता पक्षात ओळख आहे.

10 / 11
कर्नाटकसाठी 14 प्रथम श्रेणी सामने खेळलेले प्रकाश राठोड यांची काँग्रेस पक्षात ओळख आहे. 2018 मध्ये ते कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही निवडून आले होते.

11 / 11
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.