Tyre Rating : सरकार टायर उद्योगासाठी स्टार रेटिंग नियम आणणार, वाहनांचे मायलेज 10 टक्क्यांनी वाढेल

वास सुरक्षित तर होईलच शिवाय वाहनांचे मायलेजही वाढेल. टायर उद्योगासाठी सरकार लवकरच नवीन 5-स्टार रेटिंग आणणार आहे.

May 18, 2022 | 2:17 PM
शुभम कुलकर्णी

|

May 18, 2022 | 2:17 PM

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांनी टायर उद्योगांशी बोलणी पूर्ण केली आहेत. टायर्सना त्यांच्या इंधनाची बचत करण्याच्या, सुरक्षिततेची खात्री करण्याच्या आणि वाहन घसरण्यापासून रोखण्याच्या क्षमतेच्या आधारावर रेट केले जाईल.

1 / 5
सध्या टायरच्या गुणवत्तेसाठी BIS नियम लागू आहेत. हे गुणवत्तेची समान पातळी दर्शविते, परंतु ग्राहकांनी कोणते टायर घ्यावे हे माहित नसते. कारण सर्व टायर BIS प्रमाणपत्रासह येतात.

2 / 5
5-स्टार रेटेड टायर वापरून 10 टक्क्यांपर्यंत इंधनाची बचत करता येईल, असा विश्वास आहे. यासोबत टायर सेफ्टी आणि स्किड क्षमतेचाही उल्लेख असेल.

3 / 5
ARAI अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. एआरएआयच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमामुळे प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आरामदायी होणार आहे. टायर अधिक इंधन कार्यक्षम आणि विश्वासार्ह आहेत याची खात्री करणे हे स्टार रेटिंग सादर करण्याचा उद्देश आहे. यामुळे तेलाचा वापर 10 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

4 / 5
स्टार रेटिंगद्वारे निकृष्ट टायर्सच्या आयातीवर बंदी घालण्याची सरकारची योजना आहे . सरकारच्या या पाऊलामुळे आत्मनिर्भर भारत अभियानालाही चालना मिळणार आहे. यामुळे देशांतर्गत कंपन्या अधिक चांगले टायर बनवू शकतील.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें