Skin Care : जास्त स्क्रबिंगमुळे झाले त्वचेचे नुकसान ? रिकव्हरीसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

मानसी मांडे,  Tv9 मराठी

|

Updated on: Feb 09, 2023 | 11:01 AM

त्वचा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे, मात्र ही पद्धत अधिक अवलंबल्यास त्वचेलाही नुकसान सहन करावे लागू शकते. जास्त स्क्रबिंगमुळे तुमची त्वचा खराब झाली आहे का? तसं असेल तर डॅमेज झालेल्या स्किनसाठी काही टिप्स फॉलो करा, ज्यामुळे रिकव्हरी होईल.

Feb 09, 2023 | 11:01 AM
बाजारात अशी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, ज्यांच्यावतीने त्वचेसाठी सर्वोत्तम एक्सफोलिएशनचे दावे केले जातात. स्क्रबिंगमुळे त्वचा स्वच्छ तर होतेच , चमकूही लागते. मात्र जास्त स्क्रबिंग केल्यास त्वचेचे नुकसानही होते. तुमचीही त्वचा डॅमेज झाली असेल तर रिकव्हरीसाठी काही टिप्स फॉलो करू शकता.

1 / 5
या पद्धतीचा अवलंब करा : त्वचेची रिकव्हरी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. फोमिंग क्लीन्सर वापरणे थांबवा आणि त्याऐवजी सौम्य क्लीन्सर वापरा. तसेच, मॉयश्चरायझेशनचे रूटीन नियमितपणे पाळा.

2 / 5
शिया बटर : जास्त स्क्रबिंग केल्यामुळे खराब झालेली त्वचा दुरुस्त करण्यासाठी, शिया बटरपासून बनवलेल्या गोष्टी वापरणे सुरू करा. यामध्ये असलेले मॉयइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेची आर्द्रता परत आणतात व त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.

3 / 5
खोबरेल तेल : खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत, खाण्यापासून ते त्वचेसाठीही त्याचे अनेक उपयोग होतात. नारळाचे तेल किंवा खोबरेल तेल हे नैसर्गिक असून त्यामुळे त्वचेची काळजी घेतली जाते. त्यामध्ये मॉयश्चरायझिंग गुणधर्म आहेत. प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही खोबरेल तेलात इसेंशिअल ऑईलचे काही थेंब मिसळून ते त्वचेवर लावू शकता.

4 / 5
हायलूरॉनिक ॲसिड : हा आपल्या त्वचेमध्ये उपस्थित असलेले एक आवश्यक घटक आहे जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि ती चमकण्यास मदत करते. जेव्हा हायलूरॉनिक ॲसिड कमी होते तेव्हा गडद दिसून लागते. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक सीरम बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा तुम्ही वापर करू शकता. मात्र त्यापूर्वी तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्यावा.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI