Marathi News » Photo gallery » Devendra Fadnavis: Who says there is competition between Fadnavis and Gadkari? Take a look at today's photo, the opinion will change
Devendra Fadnavis: कोण म्हणतं फडणवीस-गडकरींमध्ये स्पर्धा आहे? हे आजचे फोटो बघा, मत बदलेल
मागील काही वर्षांत फडणवीस आणि गडकरी यांच्या गटातील स्पर्धा अनेकदा महाराष्ट्रातच चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नितीन गडकरी यांना अगदी कमरेत लवून नमस्कार केल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
भारतीय जनता पार्टीतील जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी नागपूरमध्ये भेट झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अगदी वाकून नितीन गडकरी यांना नमस्कार केला.
1 / 5

2 / 5
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची नागपूर विमानातळावर भेटले त्यानंतर हे हसतमुख प्रसारमाध्यमांना सामोरे गेले.
3 / 5
नुकत्याच राज्यात स्थापन झालेल्या भाजप - सेना युतीच्या सरकामध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले होते.
4 / 5
देशात आपल्या कामामुळे आपली वेगळी छाप नितीन गडकरी यांनी केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून आपल्या वेगळी छाप पाडली आहे.