सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीतील हलबीटोला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. राजकुमार फत्थू मेश्राम (वय 48 वर्षे, रा. हलबीटोला, ता. सालेकसा, जि. गोंदिया ) याचा त्याच्या पत्नीनेच मारहाण करून खून केल्याचा आरोप आहे.
1 / 5
सदर प्रकरणात आरोपी पत्नी रामकला राजकुमार मेश्राम (वय 36 वर्षे) आणि राजकुमार यांच्यात घरी दारू पिवून येतोस म्हणून कडाक्याचे भांडण झाले.
2 / 5
आरोपी महिलेने आरडा-ओरड करत गोठ्यात असलेला लाकडी दांडा घेऊन आपल्या पतीच्या डोक्यावर जोराने मारला. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाले.
3 / 5
त्यानंतर रात्रभर राजकुमार गोठ्यात पडून राहिले. योग्य ते उपचार न मिळाल्याने आणि रात्रभर त्याच अवस्थेत पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
4 / 5
या प्रकरणात सालेकसा पोलिसांनी रामकलाला अटक केली असून पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या चौकशीतून रात्री नेमकं काय घडलं? हे समजणार आहे.