PHOTO | ‘लगीन घटिका समीप आली…करा हो लगीनघाई…’, पाहा डिंपल आणि ‘देवमाणसा’च्या लग्नसोहळ्याचे फोटो!

सध्या ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिकेच्या सेटवर लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. नुकताच हा बहुचर्चित विवाह सोहळा देखील पार पडला आहे.

May 28, 2021 | 3:01 PM
Harshada Bhirvandekar

|

May 28, 2021 | 3:01 PM

एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ (Devmanus) ही नवी मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

1 / 8
‘देवमाणूस’ ही मालिका सध्या चर्चेचा विषय होतेय. कारण, या मालिकेतील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. इतकेच नव्हे तर, मालिकेत आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

2 / 8
सध्या अजित आणि डिंपलच्या लग्नाची तारीख जवळ येऊ लागते. इकडे दिव्या अजितच्या विरोधात पुरावे गोळा करतेय. अजित अस्वस्थ आहे. सरू आज्जी देखील हे लग्न होऊ देणार नाही यावर ठाम आहे.

3 / 8
सध्या मालिकेच्या सेटवर लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. नुकताच हा बहुचर्चित विवाह सोहळा देखील पार पडला आहे.

4 / 8
आता जशी या लग्नाची उत्सुकता आहे, तशीच देवी सिंगला अटक कधी होणार, याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. नुकत्याच आलेल्या एका प्रोमोमध्ये या लग्नसोहळ्या दरम्यान डॉ. अजितकुमार उर्फ ‘देवी सिंग’ पोलिसांच्या तावडीत सापडल्याचे दिसते आहे.

5 / 8
सध्या एसीपी दिव्या सिंहला डॉक्टरच देवी सिंग असल्याचं समजलं आहे. मात्र पुरेशा पुराव्यांअभावी त्याला पकडलं, तर तो हातावर तुरी देऊन निसटेल. याशिवाय गावकऱ्यांचा रोष पत्करावा लागेल, तो वेगळाच, याची भीती दिव्याला आहे.

6 / 8
त्यामुळे ती डॉक्टरला जाळ्यात ओढून गाफील ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर लग्नाच्या बेडीत अडकण्याआधी आपण त्याला बेड्या घालू, असा इरादा त्याने व्यक्त केला आहे.

7 / 8
दरम्यान, अजितकुमारनेही आपल्या बाजूने पुरेशी वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलीस त्याला पकडायला आले, तर डिंपलसोबतच मंगल, बाबू, बजा, नाम्या आणि समस्त गावकरी त्याला पाठीशी घालणार यात वाद नाही. त्यामुळे सहानुभूतीचा फटका न बसू देता त्याला बेफिकीर ठेवत पुरावे जमा करण्याचा प्लॅन दिव्या आखत आहे.

8 / 8

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें