AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar Death News LIVE Updates: ‘नटसम्राट’ हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पड्याआड, निधनाची प्रत्येक अपडेट जाणून घ्या tv9 marathi वर

| Updated on: Oct 08, 2026 | 12:50 PM
Share

Veteran actor Nana Patekar passes away News LIVE Updates in Marathi: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या ज्येष्ठ अभिनेत्याचे डोना पौला येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले

Nana Patekar Death News LIVE Updates: 'नटसम्राट' हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पड्याआड, निधनाची प्रत्येक अपडेट जाणून घ्या tv9 marathi वर

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Oct 2026 12:50 PM (IST)

    नाना पाटेकरांचे गोव्यात निधन, शरद पवार जीएमसी रुग्णालयात दाखल

    दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन. ज्येष्ठ नेते शरद पवार जीएमसी रुग्णालयात दाखल.

  • 08 Oct 2026 12:40 PM (IST)

    नाना पाटेकर शेतकऱ्यांचा आधार होते- आमदार अर्जुन खोतकर

    नाना पाटेकर हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्य लोकांचा आधार होते असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. शिवाय जालना जिल्ह्यात नाना पाटेकर यांच्या माध्यमातून अनेक कामं झाली असून आम्ही ती जवळून बघितली असल्याचेही खोतकर यांनी म्हटले.

  • 08 Oct 2026 12:25 PM (IST)

    नानाची वाडी इथं नाना पाटेकर यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू

    डोणजे गावात नाना पाटेकर यांच्यावर अंत्यसंसंस्कार केले जाणार आहेत. डोणजे गावातील नानाची वाडी याठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी सुरु करण्यात आली आहे. डोणजे ग्रामस्थ आणि नाम फाउंडेशनच्यावतीने तयारी सुरु करण्यात येत आहे.

  • 08 Oct 2026 12:15 PM (IST)

    अभिनेते नाना पाटेकर यांना छगन भुजबळांनी वाहिली श्रद्धांजली

    ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट नाना पाटेकर यांच्या निधनावर मंत्री छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त केले आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी नाना पाटेकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या चित्रपट आणि सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली. तसेच नाना पाटेकर यांच्यासाठी त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली आहे.

  • 08 Oct 2026 11:50 AM (IST)

    Nana Patekar Passed Away: दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीची प्रतिक्रिया

    दाक्षिणात्या अभिनेता ऋषभ शेट्टी म्हणाला, “नाना पाटेकर सर यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांच्या दमदार अभिनयाने आणि प्रत्येक पात्रात त्यांनी ओतलेल्या जिवंतपणामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे, तर ‘नाम फाउंडेशन’च्या (Naam Foundation) माध्यमातून शेतकरी, ग्रामीण समुदाय आणि गरजू लोकांसाठी त्यांनी केलेले कार्य असंख्य लोकांच्या हृदयाला भिडले आहे.”

  • 08 Oct 2026 11:48 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: अमोल पालेकर काय म्हणाले?

    नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर म्हणतात, “त्या धक्क्यातून मी अजूनही पूर्णपणे सावरलेलो नाही. अवघ्या एका दिवसापूर्वीच आमचे बोलणे झाले होते. त्यांनी मुद्दाम फोन करून सांगितले होते की, ‘मी तुझ्या नवीन नाटकाला येऊ शकलो नाही, पण पुढच्या प्रयोगाला मात्र नक्की येईन.’ आज पहाटे जेव्हा ही बातमी समजली, तेव्हा सर्व काही शून्य झाल्यासारखे वाटले—एक पोकळी निर्माण झाली. आमची ओळख आणि मैत्री अनेक दशकांची होती. आपण खूप काही गमावले आहे, असे मला वाटत आहे.”

  • 08 Oct 2026 11:43 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: नाम फाऊंडेशन CEO ची प्रतिक्रिया

    “नाना गेल्यामुळे नाम फाऊंडेशनचे छत्र हरपले. आमचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे छत्र हरपले” अशी प्रतिक्रिया नाम फाऊंडेशनच्या CEO ने दिली आहे.

  • 08 Oct 2026 11:38 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: तीन दिवसांपूर्वीच नाना यांचा फोन आला होता-रोहित पवार

    तीन दिवसांपूर्वीच नाना यांचा फोन आला होता, नाना आणि दादांची मैत्री घट्ट होती, नाना लवकरच दुष्काळाची पाहणी करणार होते, असं रोहित पवार म्हणाले.

  • 08 Oct 2026 11:35 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: नसीरुद्दीन शाह यांची प्रतिक्रिया

    ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांना एकत्र काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही, याची त्यांनी खंत व्यक्त केली. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शाह म्हणाले, “मला नाना पाटेकर यांच्यासोबत काम करण्याची संधी कधीच न मिळाल्याची खूप खंत आहे. मी त्यांचा खूप आदर करत असे.”

  • 08 Oct 2026 11:30 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: नाना पाटेकर यांच्यावर ४ वाजता अंत्यसंस्कार

    ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पुण्यातील सिंहगड रस्त्याजवळील डोंजे गावातील त्यांच्या फार्महाऊसवर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील. डोना पौला येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालेल्या नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्याहून पुण्यात आणले जात आहे. शवविच्छेदन पूर्ण झाले आहे. अंतिम निरोप आणि पोलीस सन्मानाने होणाऱ्या अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. मराठी रंगभूमी तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल नाना पाटेकर यांना शासकीय अंत्यसंस्कार दिले जातील, असे महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते.

  • 08 Oct 2026 11:25 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: रणदीप हुड्डाची प्रतिक्रिया

    रणदीप हुड्डा यांनी नाना पाटेकरच्या आठवणींना उजाळा दिला: “जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा ‘परिंदा’ चित्रपटात पाहिले, तेव्हा मला असे वाटले नाही की मी एखाद्या अभिनेत्याला पाहत आहे; मला वाटले की मी एका खऱ्याखुऱ्या व्यक्तीला पाहत आहे. अनेक वर्षांनंतर जेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो, तेव्हाही तीच भावना कायम राहिली. ते अगदी तसेच होते – मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करणारे एक खरेखुरे व्यक्तिमत्त्व, केवळ दिखाऊपणा करणारा अभिनेता नव्हे.”

  • 08 Oct 2026 11:20 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: राज ठाकरे काय म्हणाले?

    “ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं. हिंदी चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई हे दृढ समीकरण. मुंबई आली की इथली रंगभूमी, इथलं व्यावसायिक सिनेमाचं जग, इथल्या झोपडीपासून, चाळीपासून कुठेतरी रोज या शहरात स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करणारा इथला मध्यमवर्ग, निम्न मध्यमवर्ग आला, पुढे याच शहरातला आणि हळूहळू या देशातील उध्वस्त होत गेलेला कामगार वर्ग आला, त्यातून आलेल्या सामाजिक नैराश्यातून उदयाला आलेलं अंडरर्वल्डचं विश्व असेल, सामाजिक सलोखा बघता बघता विस्कटून जाण्याचा काळ असेल, पुढे याच मध्यमवर्गाच्या आकांक्षा उदारीकरणानंतर विस्तारत जाणं आणि या सगळ्याच्या भोवती फिरणारं राजकारण. या प्रत्येक टप्प्यात नाना पाटेकर कधी नाटकातून कधी सिनेमातून दिसले. हमीदाबाईची कोठीपासून ते परिंदा ते क्रांतिवीर ते अब तक छप्पन ते अगदी नटसम्राटपर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले . या प्रत्येक टप्प्यावरची कुठेतरी अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले, असं राज ठाकरे म्हणाले.

  • 08 Oct 2026 11:15 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: पवन कल्याण यांनी व्यक्त केले दु:ख

    पवन कल्याण म्हणाले, “श्री नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना. प्रख्यात अभिनेते श्री नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल मी माझ्या अत्यंत तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांचे कुटुंबीय व आप्तेष्टांप्रती माझ्या मनापासूनच्या संवेदना व्यक्त करतो.

  • 08 Oct 2026 11:10 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: सनी देओलची प्रतिक्रिया

    सनी देओल म्हणाला,  “नाना आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. आम्ही कधीच एकत्र काम केले नाही, पण आमचे नाते खूप खास होते आणि ते अनेक वर्षांपासूनचे होते. निर्भय आणि उत्साहाने भरलेले व्यक्तिमत्त्व; त्यांना जे करायचे असे तेच ते करायचे. ते माझ्या कायम असेच स्मरणात राहतील. नाना, तुमची आठवण येईल,”

  • 08 Oct 2026 11:05 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: अभिनेत्री मनीषा कोईरालाची प्रतिक्रिया

    अभिनेत्री मनीषा कोईराला, एका महान अभिनेत्याच्या, एका भव्य व्यक्तिमत्त्वाच्या आणि आपल्या कलेतील खऱ्या दंतकथेच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे.

  • 08 Oct 2026 11:00 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: रजा मुराद यांची प्रतिक्रिया

    रजा मुराद म्हणाले, “माझा अजूनही विश्वास बसत नाही. नाना पाटेकर यांच्यासारखा माणूस आता आपल्यात नाही, हे माझं मन आणि हृदयही स्वीकारू शकत नाही. ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर होते, त्यांच्यात प्रचंड इच्छाशक्ती होती आणि ते आपल्या अटींवर जगले व काम केले. त्यांचा स्वभाव कठोर होता, पण मन खूप कोमल होते आणि ते एक महान परोपकारी व्यक्ती होते. “

  • 08 Oct 2026 10:54 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: ते कधीच बंधनात राहिले नाही- नरेंद्र मोदी

    नरेंद्र मोदी म्हणाले की,  ते एक चांगले अभिनेता होते ज्यांनी वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले. नाना पाटेकरजी यांचे आयुष्य तिरंग्याच्या आन बान शानसाठी समर्पित होते, ते कधीच बंधनात राहिले नाही, नेहमीच परिंद्यासारखे होते.

  • 08 Oct 2026 10:47 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: स्मृती इराणी काय म्हणाल्या?

    स्मृती इराणी म्हणाल्या, ‘दादा’ – मी त्यांना याच नावाने हाक मारायचे, तर जगासाठी ते ‘नाना पाटेकर’ होते. त्यांचे फोन कधीही, अचानक यायचे; पण ते खूप मोलाचे असायचे. कसलेही औपचारिक शिष्टाचार किंवा वरकरणी गप्पागोष्टी नसायच्या. फक्त तो ओळखीचा आवाज – “कुठे आहेस रे?”

  • 08 Oct 2026 10:42 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: अनुपम खेर यांची नाना पाटेकर यांच्यासाठी पोस्ट

    अनुपम खेर यांची नाना पाटेकर यांच्यासाठी पोस्ट म्हणाले, “नाना पाटेकर… सर्वश्रेष्ठ? काही तासांपूर्वीच मला ती हृदयद्रावक बातमी मिळाली की माझे मित्र नाना पाटेकर – जे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आणि एक उत्तम माणूस होते – ते आता आपल्यात राहिले नाहीत.”

  • 08 Oct 2026 10:36 AM (IST)

    Nana Patekar Passed Away: मनोज बाजपेयी काय म्हणाला?

    मनोज बाजपेयी म्हणाले, “धक्कादायक! नाना पाटेकर जी आता आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. चित्रपटसृष्टीत स्थान मिळवण्याच्या आशेने मुंबईत आलेल्या आमच्यासारख्या अनेकांसाठी त्यांचा प्रवास एक आशेचा किरण ठरला. स्वतःची कला, स्वतःचे वेगळेपण आणि आपण जसे आहोत तसेच राहणे, हे स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरू शकते, याची जाणीव त्यांनी करून दिली.”

  • 08 Oct 2026 10:33 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: रवीना टंडन काय म्हणाली?

    रवीना टंडन यांनी ‘मुस्तफा’ चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला: “नानांच्या निधनामुळे मला मोठा धक्का बसला असून मी अत्यंत दुःखी झाले आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की एक दिवस आपल्यालाही याच मार्गावरून पुढे जावे लागणार आहे आणि त्या अंतिम प्रवासाला सुरुवात करावी लागणार आहे; पण हे माहित असूनही, या हानीचे दुःख काही कमी होत नाही. त्यांच्या जाण्याने मला अचानक आणि खूप मोठा धक्का बसला आहे.

  • 08 Oct 2026 10:30 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: विनोद तावडे यांची प्रतिक्रिया

    विनोद तावडे म्हणाले, “नाना पाटेकर केवळ एक अभिनेते नव्हते, तर ते एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते ज्यांनी देशाचे हित लक्षात घेऊन आपली प्रतिभा आणि लोकप्रियता समाजाच्या कल्याणासाठी वापरली. ते माझे वैयक्तिक परिचित आणि मित्र होते; आमच्या भेटीगाठींदरम्यान झालेल्या संवादातून मी अनेक गोष्टी शिकलो. “

  • 08 Oct 2026 10:24 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: नाना पाटेकर यांच्या मुलाशी फडणवीस यांनी साधला संवाद

    नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे, आता नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकरशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला आहे. फोनवरुन संवाद साधत सांत्वन केले आहे.

  • 08 Oct 2026 10:20 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: अभिनेता रजनीकांत काय म्हणाले?

    “माझे प्रिय मित्र नानाजी आता आपल्यात नाहीत यावर माझा विश्वासच बसत नाही. त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. असं रजनीकांत म्हणाले आहे.

  • 08 Oct 2026 10:15 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी व्यक्त केला शोक

    एकत्र घालवलेल्या क्षणांच्या आठवणींचा पूर… त्याने आयुष्यातील सर्व सत्ये खोलवर समजून घेतली होती, दिग्दर्शन अनंत महादेवन म्हणाले.

  • 08 Oct 2026 10:12 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: मोहन जोशी काय म्हणाले?

    मोहन जोशी म्हणाले, “आज गोव्याहून नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख आणि धक्का बसला आहे. त्यांनी कधीही केवळ ‘नायक’ (हिरो) म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही, तरीही त्यांनी साकारलेली पात्रे लोकांच्या हृदयात नेहमीच नायक म्हणून राहिली.”

  • 08 Oct 2026 10:05 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: सुनील शेट्टी काय म्हणाला?

    सुनील शेट्टी म्हणाला, “अत्यंत धक्कादायक!!! तुमच्यासारखी माणसं आता पुन्हा घडत नाहीत. कितीही उंच शिखरावर पोहोचलात तरी तुमची मुळे जमिनीशी घट्ट जोडलेली होती. कोणत्याही संकोचाशिवाय स्वतःसारखेच राहणारे, अत्यंत प्रामाणिक आणि आपल्या कलेत पारंगत. नाना’ एकच होते आणि दुसरे कोणीही तसे होणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ… तुमच्याशिवाय चित्रपटसृष्टी आता पूर्वीसारखी राहणार नाही,” असे अभिनेता सुनील शेट्टीने लिहिले.

  • 08 Oct 2026 10:05 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

    चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री – नाना पाटेकर जी आपल्या सर्वांना सोडून गेले,ही एक मोठी हानी झाली आहे, देश-विदेशातील मराठी माणसांना नाना पाटेकर त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज अतिव दुःख आहे.मी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून नाना पाटेकर यांच्यासोबत काम केले आहे, गेल्या पंधरा वर्षापासून मला लहान भाऊ समजून त्यांनी खूप मदत केली.”

  • 08 Oct 2026 10:01 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: कंगना रणौतकडून शोक व्यक्त

    कंगना रणौतने नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीचा एक व्हिडिओ क्लिप आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आणि लिहिले, “अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी, विशेषतः कारण नानाजी खूप तंदुरुस्त आणि निरोगी दिसत होते. ओम शांती.”

  • 08 Oct 2026 09:55 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची प्रतिक्रिया

    २००३ मधील ‘भूत’ या अलौकिक हॉरर-थ्रिलर चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले, “शब्दांत वर्णन करता येणार नाही इतके दुःख झाले आहे. ही घटना अत्यंत दुःखद, हृदयद्रावक आणि धक्कादायक आहे. ओम शांती.”

  • 08 Oct 2026 09:50 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनेत्याच्या प्रभावी अभिनयाचे कौतुक केले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला. “मानवी अनुभवांचे विविध पैलू पडद्यावर प्रभावीपणे आणि हृदयस्पर्शीरीत्या साकारणाऱ्या पाटेकर यांच्या अभिनयाचे त्यांनी स्मरण केले. तसेच, पाटेकर यांची समाजसेवेप्रती असलेली निष्ठा अधोरेखित करत त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना शोकसंवेदना व्यक्त केल्या.”

  • 08 Oct 2026 09:45 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: रवी किशन यांची प्रतिक्रिया

    रवी किशन म्हणाले, आज सकाळी नाना पाटेकर जी यांच्या निधनाची अत्यंत हृदयद्रावक बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. एक मोठा स्टार असूनही, नाना जी भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा महान कलाकारांपैकी एक होते जे प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिले; त्यांची ओळख त्यांच्या साधेपणाने, सहजतेने आणि मातीशी जोडलेल्या व्यक्तिमत्त्वाने होती. मुंबईच्या झगमगाटात राहूनही त्यांनी आपली मुळे आणि मूल्ये कधीच सोडली नाहीत.”

  • 08 Oct 2026 09:45 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले “भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते नाना पाटेकर जी यांचे निधन ही कलाविश्वासाठी कधीही भरून न येणारी हानी आहे. पाच दशकांहून अधिक काळ आपल्या नैसर्गिक अभिनयाने आणि प्रभावी संवादफेकीने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप पाडली. गंभीर सामाजिक विषय असोत किंवा विनोदी-व्यंग्यात्मक भूमिका, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्रात त्यांनी जणू प्राणच ओतले. “

  • 08 Oct 2026 09:40 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

    अंबादास दानवे म्हणाले,” बॉलिवूडच्या झगमगाटातही साधेपणाने आयुष्य जगता येते, हे दाखवून देणारे उत्तम उदाहरण म्हणजे नाना पाटेकर. प्रसंगी परखड, मायाळू, कठोर आणि दिलदार मनाच्या नानांना गमावणे ही त्यांच्या चित्रपट चाहत्यांची हानी आहेच; पण माझ्यासारख्या त्यांच्या साधेपणावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांचेही हे मोठे नुकसान आहे. आज मराठवाडा आणि महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असताना नानांसारख्या संवेदनशील माणसाची उणीव कायम भासत राहील. ही अकाली एक्झिट अत्यंत वेदनादायी आहे!”

  • 08 Oct 2026 09:37 AM (IST)

    अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया

    अरविंद केजरीवाल म्हणाले,” दिग्गज नाना पाटेकर जी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला आणि अत्यंत दुःख झाले. ते आता आपल्यात नाहीत, यावर विश्वासच बसत नाही. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आणि आप्तेष्टांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. ९० च्या दशकातील त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांनी एका संपूर्ण पिढीवर आपली अमीट छाप सोडली. त्यांनी केवळ अभिनयच केला नाही, तर ते आपल्या भूमिका खऱ्या अर्थाने जगले. त्यांची ती वैशिष्ट्यपूर्ण शैली सदैव आपल्या हृदयात कोरलेली राहील.”

  • 08 Oct 2026 09:31 AM (IST)

    नाना पाटेकर यांना आपल्यापासून दूर नेण्यासाठी देवालाही मारावेसे वाटते.- राम गोपाल वर्मा

    राम गोपाल वर्मा म्हणाले, “नाना पाटेकर यांना आपल्यापासून दूर नेण्यासाठी देवालाही मारावेसे वाटते. राम गोपाल वर्मा यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले, “हो, सर्वांना माहीत आहे की कोणीही अमर नाही… पण तरीही माझा विश्वास बसत नाही की त्यांच्यासारख्या एका कणखर माणसासोबत असे अचानक घडू शकते… ज्या हृदयाने त्यांचा विश्वासघात केला, त्याचा मला तिरस्कार वाटतो आणि अभिनयाचे देव, नाना पाटेकर यांना आपल्यापासून दूर नेण्यासाठी देवालाही मारावेसे वाटते.”

  • 08 Oct 2026 09:23 AM (IST)

    नाना पाटेकर यांच्या निधनावर एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली हळहळ

    एकनाथ शिंदे म्हणाले, ” महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. महाराष्ट्राने आणि देशाने एक संवेदनशील, तगडा अभिनेता व खऱ्या अर्थाने एक ‘नटसम्राट’ गमावला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला… नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातच आमची भेट झाली होती. माझ्या दरेगावी गाळ उपसण्याच्या कामासाठी देखील ते आले होते, तेव्हा पांढऱ्या कपड्यांकडे बघत त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं.”

  • 08 Oct 2026 09:20 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: शिखर धवन यांची प्रतिक्रिया

    शिखर धवन यांची प्रतिक्रिया “माजी क्रिकेटपटू शिखर धवन यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले: “भारतीय चित्रपटसृष्टीने आज एक अत्यंत खास प्रतिभा गमावली आहे. नाना पाटेकर साहेब, तुमचे कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. ओम शांती.”

  • 08 Oct 2026 09:17 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: नाना पाटेकर यांना नेमकं काय झालं ते डॉक्टरांनी बोलून दाखवलं

    ANI शी बोलताना मणिपाल हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर म्हणाले, “नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणले तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. पहाटे ५:३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांना वाचवण्याचे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु रुग्णालयात आणले तेव्हाच त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यांना वाचवण्यासाठी सुमारे ४५ मिनिटे ते एक तास ‘कार्डियाक मसाज’ देण्यात आला, पण त्यांना वाचवता आले नाही. आमच्या माहितीनुसार, पहाटे २:३० च्या सुमारास त्यांनी आपल्या मित्राला संदेश पाठवून प्रकृती ठीक नसल्याचे कळवले होते. पण रात्र असल्याने मित्राला तो संदेश दिसला नाही.” सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

  • 08 Oct 2026 09:14 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केले दु:ख

    प्रकाश राज म्हणाले,  “प्रिय नानाजी, तुमची खूप आठवण येतेय… आपण एकत्र घालवलेले क्षण, त्या गप्पा-गोष्टी, ती खडाजंगी, तुम्ही स्वतः बनवलेले जेवण आणि तुम्ही दिलेले ज्ञान – या सर्व गोष्टी मी सदैव जपून ठेवेन. माझ्या आयुष्याच्या प्रवासात तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे आभार. 🙏🏿🙏🏿🙏🏿 भावपूर्ण श्रद्धांजली.”

  • 08 Oct 2026 09:10 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआरने व्यक्त केला शोक

    दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर म्हणाला “भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेते नाना पाटेकर सर यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत एक विलक्षण प्रामाणिकपणा आणि तीव्रता दिसून येत असे. त्यांच्या अभिनयात कधीच कृत्रिमता जाणवली नाही; उलट, पडद्यावर जणू प्रत्यक्ष जीवनच साकार होत असल्याचा भास व्हायचा. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान पिढ्यानपिढ्या लक्षात राहील, असे ते एक अद्वितीय कलाकार होते. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तेष्टांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.

  • 08 Oct 2026 08:59 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: अक्षय कुमार काय म्हणाला?

    नानाजींच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले आहे. ते अशा काही मोजक्या अभिनेत्यांपैकी एक होते ज्यांना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फार काही करण्याची गरज भासत नसे. तो आवाज, ती तीव्रता आणि प्रत्येक अभिनयातील ती प्रामाणिकता… त्यांची शैली अगदीच अद्वितीय होती. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्यांच्यासोबत ‘वेलकम’ आणि अलीकडेच ‘हाऊसफुल ५’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या सेटवरील अनेक आठवणी माझ्यासाठी नेहमीच खास राहतील. नानाजी खरोखरच अद्वितीय होते. तुम्ही आता आमच्यात नाही आहात, यावर विश्वासच बसत नाहीये. त्या सर्व आठवणींसाठी धन्यवाद. तुमची खूप आठवण येईल, जी शब्दांत मांडणे कठीण आहे.”

  • 08 Oct 2026 08:57 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: तीन-चार दिवसांपूर्वीच बोलणी केली-शेखर सुमन

    शेखर सुमन यांनी अवघ्या तीन-चार दिवसांपूर्वीच नाना पाटेकर यांच्याशी बोलणी केली होती. त्यांनी सांगितले होते की, ते शूटिंग करत असून एक-दोन दिवसांत येणार आहेत. आज सकाळी ही दुर्दैवी बातमी मिळाली. मी गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्याशी बोलत होतो; त्यांना माझ्या शोमध्ये यायचे होते. मी परवाच त्यांच्याशी बोललो होतो. त्यांनी सांगितले की ते सध्या गोव्यात शूटिंग करत आहेत. शूटिंग संपल्यावर ते तुमच्या शोमध्ये येतील. ते अगदी ठीक होते. त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कोणतेही लक्षण नव्हते. ते मुळात १ किंवा २ ऑक्टोबरला येणार होते. पण नंतर मला त्यांचा मेसेज आला की ते शूटिंग संपल्यावर परत येतील.”

  • 08 Oct 2026 08:54 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: नाना पाटेकर शासकीय इतमामात अंतिम संस्कार पुण्यात होणार

    नाना पाटेकर शासकीय इतमामात अंतिम संस्कार पुण्यात होणार. डोनजे गाव भोर तहसील इथे होणार असल्याची माहीती. नाना पाटेकर यांची अंतिम इच्छा होती की त्यांचे शेवटचे कार्य हे पुणे डोणजे येथील शेतामध्येच व्हावे अशी त्यांची अंतिम इच्छा होती.

  • 08 Oct 2026 08:50 AM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला शोक

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक, म्हणाले,”ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. ‘क्रांतिवीर’ ते ‘नटसम्राट’ या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे. परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत ‘नाम फाऊंडेशन’ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति

  • 08 Oct 2026 08:47 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

    प्रताप सरनाईक म्हणाले, “नाना गेले… पण नानांचा आवाज, त्यांचा रांगडा अभिनय, त्यांच्या संवादातील धार आणि माणुसकीची ऊब कधीच जाणार नाही… रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या असामान्य अभिनयाने अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक अभिनेता हरपला नाही, तर मराठी मातीशी नाळ जोडलेला एक संवेदनशील, ताकदीचा आणि अस्सल कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. नानांनी साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा जिवंत होती… कारण त्या व्यक्तिरेखेत नानांचा आत्मा असायचा. त्यांचा आवाज कानावर पडला की आजही अंगावर शहारा येतो आणि त्यांचा पडद्यावरील चेहरा डोळ्यांसमोर आला की मन नकळत भावुक होते. नाना पाटेकर नावाचा हा ‘अभिनयाचा विद्यापीठ’ आता प्रत्यक्षात नसला, तरी त्यांच्या कलेच्या रूपाने तो सदैव आपल्या सोबत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”

  • 08 Oct 2026 08:46 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने रोहित पवार यांना दु:ख

    रोहित पवार म्हणाले,  “सामाजिक जाण आणि भान असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारं आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, प्रभावी आणि अष्टपैलू कलाकार गमावला आहे. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘अग्निसाक्षी’, ‘नटसम्राट’, ‘वेलकम’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची अमीट छाप उमटवली. पडद्यावरील अभिनयासोबतच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी केलेले त्यांचं सामाजिक कार्य त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारं आहे. कलेच्या माध्यमातून लाखो मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या महान कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती!”

  • 08 Oct 2026 08:44 AM (IST)

    आशिष शेलार यांनी हळहळ व्यक्त केली

    आशिष शेलार यांच्याकडून शोक व्यक्त, म्हणाले, “करारी अभिनेता आपण गमावला ! मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने अजरामर ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका जिवंत करणाऱ्या नानांनी रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, करारी, प्रतिभावान आणि अस्सल कलावंत गमावला आहे. महाराष्ट्र शासनानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०१३ पुरस्कारासह चित्रपट क्षेत्रातील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. मध्यमवर्गीय कामगार मराठी कुटुंबातून पुढे आलेल्या नाना पाटेकर यांनी अपार मेहनत व आपल्या वेगळ्या शैलीने अभिनयात ठसा उमटवला. आमच्या गिरणगावातील एक अस्सल, इरसाल, उत्सव प्रेमी मराठी माणूस आम्ही आज गमावला आहे. नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती! 

  • 08 Oct 2026 08:42 AM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

     जितेंद्र आव्हाड म्हणाले,” ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले,हे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणार आहे.गेली 5 दशके आपल्या अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या नटसम्राटाला भावपूर्ण श्रद्धांजली..!!”
  • 08 Oct 2026 08:40 AM (IST)

    Nana Patekar Passes Away: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी व्यक्त केले दु:ख

    महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे, त्या म्हणाल्या, “अभिनयाचा एक युगपुरुष हरपला… ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे. अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेल्या नानांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटवली. नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे. कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील वंचित घटक आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्यही सदैव प्रेरणादायी राहील. आज अभिनयविश्वातील एक संवेदनशील मन, एक दमदार आवाज आणि एक अस्सल कलाकार हरपला आहे. या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील.”

  • 08 Oct 2026 08:37 AM (IST)

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हळहळ व्यक्त केली

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हळहळ व्यक्त केली आहे, ते म्हणाले,  “प्रख्यात अभिनेते, सशक्त नाट्य-कलाकार आणि संवेदनशील समाजसेवक पद्मश्री नाना पाटेकर जी यांचे निधन ही कलाविश्वासाठी कधीही भरून न येणारी हानी आहे. आपल्या असाधारण अभिनयाद्वारे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी समृद्ध केली, तसेच सामाजिक जाणीवेतून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकीही जपली. भगवान श्रीराम दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांशी स्थान देवोत आणि शोकाकुल परिवार व चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवोत, हीच प्रार्थना. ॐ शांती.”

  • 08 Oct 2026 08:35 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही व्यक्त केला शोक

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही व्यक्त केला शोक, म्हणाले, “भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती.”

  • 08 Oct 2026 08:33 AM (IST)

    नाना पाटेकर यांच्या बातमीने रितेश देशमुख यांना धक्का बसला

    रितेश देशमुख यांना धक्का बसला आहे. अभिनेते आणि सहकलाकार रितेश देशमुख यांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले: “मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतका मोठा धक्का बसला आहे. जणू काही एखाद्या ट्रकची धडक बसली आहे, असे वाटत आहे. नाना पाटेकर जी यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. अभिनयात अद्वितीय आणि कोणाचीही बरोबरी होऊ शकत नाही असे व्यक्तिमत्त्व; त्यांनी आपल्या अनोख्या शैलीने आणि अभिनयाच्या खास ठसक्याने लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले. अशी कोणतीही भूमिका किंवा पात्र नव्हते जे ते साकारू शकले नाहीत. मग तो भव्य-दिव्य नायक असो, भीतीदायक खलनायक असो किंवा त्यांचा तो भावशून्य चेहऱ्याचा (poker-faced) विनोदी अभिनय असो – त्यांनी प्रत्येक भूमिका लीलया पेलली. ते पडद्याबाहेरही खरे नायक होते आणि जनहितार्थ आपल्या सेवाभावी कार्याद्वारे त्यांनी अविरत काम केले. ‘ब्लफमास्टर’ आणि ‘हाऊसफुल ५’ मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले, परंतु एखाद्या मराठी चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा मात्र कायमची अपूर्णच राहील. त्यांचे कुटुंब, आप्तस्वकीय आणि लाखो चाहत्यांप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. खरोखरच, एका युगाचा अंत झाला आहे. तुमचे मार्गदर्शन, आपल्या गप्पा, माझ्या पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, आपण एकत्र अनुभवलेला हास्यविनोद आणि एक व्यक्ती म्हणून मला समृद्ध केल्याबद्दल तुमचे आभार. तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली!!!!”

  • 08 Oct 2026 08:31 AM (IST)

    नील नितीन मुकेशने व्यक्त केले दु:ख

    नील नितीन मुकेशने नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना म्हटले  आहे, ” नाना पाटेकर जी यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. अभिनयात अद्वितीय कौशल्य असलेल्या आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अशा या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या दमदार अभिनयाची आठवण सदैव राहीलच, पण त्यासोबतच असंख्य उदयोन्मुख कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेली प्रेरणा आणि बळही कायम स्मरणात राहील. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक खरा दिग्गज. सर, तुमचा वारसा सदैव जिवंत राहील. ओम शांती.

  • 08 Oct 2026 08:29 AM (IST)

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त नाना पाटेकर यांच्या निधनावर व्यक्त केला शो

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त नाना पाटेकर यांच्या निधनावर व्यक्त केला शोक. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले: “प्रख्यात अभिनेते श्री. नाना पाटेकर यांच्या अचानक निधनाची अत्यंत दुःखद बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला असून माझे मन हेलावून गेले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीने आपला एक अत्यंत प्रभावी, अस्सल आणि ज्याची जागा कोणीही भरून काढू शकत नाही असा आवाज गमावला आहे. नानाजींनी केवळ भूमिका साकारल्या नाहीत, तर त्यांनी प्रत्येक पात्रात जिवंत आणि निर्भीड सत्य ओतले. ‘परिंदा’, ‘क्रांतीवीर’ आणि ‘प्रहार’ मधील स्फोटक अभिनयापासून ते ‘अब तक छप्पन’ मधील उत्कट तीव्रतेपर्यंत, त्यांच्या अभिनयाने असा एक मापदंड प्रस्थापित केला ज्यापर्यंत पोहोचण्याची आशा फार कमी लोक करू शकतात. रुपेरी पडद्यापलीकडे, त्यांची साधेपणा, अगाध नम्रता आणि सामाजिक कार्ये व ग्रामीण समुदायांप्रती असलेली निस्वार्थ निष्ठा यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे मोठेपण दिसून येत असे.”

  • 08 Oct 2026 08:28 AM (IST)

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नाना पाटेकर यांच्या निधनावर काय म्हणाले?

    कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार नाना पाटेकर म्हणाले,” ज्येष्ठ अभिनेते श्री. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. आपल्या असाधारण प्रतिभेने, पडद्यावरील प्रभावी उपस्थितीने आणि अविस्मरणीय अभिनयाने त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अत्यंत अविस्मरणीय पात्रे दिली आहेत. पडद्यापलीकडे, शेतकऱ्यांविषयीची त्यांची तळमळ आणि समाजसेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील खोली दर्शवते. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

  • 08 Oct 2026 08:24 AM (IST)

    नाना पाटेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, नेमकं काय घडलं?

    नाना पाटेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गोव्यातील डोना पावलामधील घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली. मणिपाल रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी 45 मिनिटे सतत सीपीआर देऊनही नाना पाटेकर यांना वाचवता आले नाही.

  • 08 Oct 2026 08:18 AM (IST)

    नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमीवर जयवंत वाडकर यांची प्रतिक्रिया

    नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समजताच जयवंत वाडकर म्हणाले की, ” मला कळलं आताच खरं तर शब्द सुचत नाहीये, खरंच काय बोलू मी, एवढं काम त्याच्याबरोबर केले आहे, आमची सुरुवात त्याच्यासोबत झाली आहे, सतिश पुळेकर आमचे गुरु, आमच्या सगळ्या वन एक्च प्लेला गायडन्स करणं, म्हणजे आता खूप खूप आठवणी आठवतं आहे,  त्याच्यासोबत शेवटचे काम केले होते ते नटसम्राटमध्ये, त्या चित्रपटातील आठवणी तर आहेतच. “

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. या ज्येष्ठ अभिनेत्याचे डोना पौला येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते गोव्यातील डोना पौला येथील त्यांच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. असे वृत्त आहे की, नाना पाटेकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे त्यांच्यावर उपचार करण्यात आले पण बॉडीने काही रिस्पॉन्स केला नसल्याने शेवटची त्यांना मृत घोषित केले. आता या बातमीनंतर अनेकांना झटका बसला आहे, राजकीय क्षेत्रातून, अभिनय क्षेत्रातून त्यांच्या निधनाच्या बातमीने शोकाकुळ व्यक्त केला जात आहे.

Published On - Oct 08,2026 8:14 AM

Follow Us
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती