Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरुन राजकारण, कांदेंच्या आरोपांना शंभुराज देसाईंचाही दुजोरा

सुहास कांदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शंभूराज देसाई यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर यावर दोन्ही सभागृहात चर्चाही झाली होती. त्यामुळे सुरक्षतेच्या अनुशंगाने राज्य गृहमंत्री म्हणून सुरक्षाही जाहीर केली होती. धमकी पत्राची सतत्या पडताळण्यात आली.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरुन राजकारण, कांदेंच्या आरोपांना शंभुराज देसाईंचाही दुजोरा
शंभूराजे देसाईंची संजय राऊतांवर टीका
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 1:17 PM

मुंबई : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी सुरक्षतेसाठी मर्यादित पोलीस कर्मचारी असावेत अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. सुरक्षेबाबत गंभीर नसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जुन्या किस्स्याची आता नव्याने चर्चा रंगू लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना त्यांच्या जीवीताला धोका असतानाही त्यांना (Uddhav Thackeray) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सुरक्षा नाकारली असा आरोप शिंदे गटाचे आ. सुहास कांदे यांनी केला होता. शिवाय त्यांनी केलेल्या आरोपाचे सतेज पाटील यांनी खंडन केले तर आता (Shambhuraj Desai) शंभुराज देसाईं यांनी मात्र दुजोरा दिला आहे. त्यादरम्यान नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आले होते. केवळ त्यांनाच नाहीतर त्यांच्या कुटुंबियांनाही धमकी देण्यात आली होती. असे असताना सुरक्षा देणे महत्वाचे होते. मात्र, याबाब वर्षावरुन विचारणा झाल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशी वागणूक दिली जात होती याचे दाखलेही त्यांच्या गटातील आमदारांनी देण्यास सुरवात केली आहे.

काय म्हणाले देसाई ?

सुहास कांदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता शंभूराज देसाई यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना धमकीचे पत्र आल्यानंतर यावर दोन्ही सभागृहात चर्चाही झाली होती. त्यामुळे सुरक्षतेच्या अनुशंगाने राज्य गृहमंत्री म्हणून सुरक्षाही जाहीर केली होती. धमकी पत्राची सतत्या पडताळण्यात आली. यामध्येही त्यांना सुरक्षेची गरज पाहिजे असाच सूर उमटला होता. त्याअनुशंगाने अधिकऱ्यांशी बैठक पार पडत असताना सकाळी 8 ते साडे आठच्या दरम्यान आपणास वर्षा निवसस्थानावरुन फोन आल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षतेबाबत विचारणा झाल्यानंतर त्यांना सुरक्षतेची गरज नसल्याचे खुद्द उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे देसाई म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांचा नेमका उद्देश काय आहे. हे माहित नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

नक्षलवाद्यांच्या धमकीचे पत्र

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या काळात गडचिरोलीचे पालकमंत्री देखील होते. दरम्यानच्या काळात जिल्ह्याला घेऊन काही निर्णय झाले होते. निर्णय होताच त्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते. एवढेच नाहीतर यामध्ये कुटुंबियांचाही समावेश असणार असा उल्लेख करण्यात आला होता. चौकशीअंती यामध्ये तथ्य असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जीवीताला धोका असतानाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरक्षा का नाकारली हा प्रश्न कायम आहे.

सुहास कांदेचे काय आहेत आरोप?

आ. सुहास कांदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पुन्हा राजकारण ढवळून निघत आहे. नक्षल्यांनी मारण्याची भूमिका दिला. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो, एसआयटी, सीआयडी असेल.. यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला रिपोर्ट केले. त्यानंतरसुद्धा एकनाथ शिंदेंची सिक्युरिटी वाढवली नाही. हिंदुत्व विरोधकांना सिक्युरिटी दिली. पण हिंदुत्ववाद्यांना दिली नाही. हे का घडलं? शिंदेंना सिक्युरिटी द्यायची नाही. हिंदुत्ववाद्यांना अशी सुरक्षा का नाकारण्यात आली, असा माझा सवाल सुहास कांदे यांनी उपस्थित केला आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.