मी अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा; राम कदमांचे खुले आव्हान

अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचं कदम यांनी म्हटले होते. | Ram Kadam

मी अर्णव गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा; राम कदमांचे खुले आव्हान
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 10:05 AM

मुंबई: रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) हे सोमवारी अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात जाणार आहेत. त्यावेळी ‘हिंमत असेल तर मला अडवूनच दाखवा’, असे जाहीर आव्हान राम कदम यांनी मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला दिले आहे. (BJP MLA Ram Kadam want to meet Arnab Goswami)

राम कदम यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. आज सकाळी 11 वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णव गोस्वामी यांची भेट घेणार असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे. देशातील 130 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अर्णव गोस्वामी यांना भेटायला जाणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आज नवी मुंबईत हायव्होल्टेड ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कालच राम कदम हे अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले होते. अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचे कदम यांनी म्हटले होते. तत्पूर्वी राम कदम यांनी अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी मंत्रालयाबाहेर उपोषण केले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर राम कदम यांना हे आंदोलन मागे घ्यावे लागले होते.

तत्पूर्वी पोलिसांनी रविवारी सकाळी अर्णव गोस्वामी यांना अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलिसांना चकमा देत एका व्यक्तीने अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.

संबंधित बातम्या:

तळोजा कारागृहाबाहेर अर्णव समर्थक आणि महाराष्ट्र पोलीस समर्थकांचा ‘सामना’, जोरदार घोषणाबाजी

Arnab Goswami| हरिश साळवे म्हणाले, अर्णवला जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का? कोर्टात काय काय घडलं?

‘वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले!’ अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरुन होणाऱ्या टीकेला राऊतांचं ‘रोखठोक’ उत्तर

(BJP MLA Ram Kadam want to meet Arnab Goswami)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.