AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे आणि धनंजय मुंडेंच्या खात्याविषयी ‘सामना’तून संकेत

आदित्य ठाकरे यांच्याकडे वनविभागाची धुरा सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

आदित्य ठाकरे आणि धनंजय मुंडेंच्या खात्याविषयी 'सामना'तून संकेत
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jan 01, 2020 | 10:32 AM
Share

मुंबई : महाविकास आघाडीचे 42 मंत्री ठरलेले असले, तरी खातेवाटप अद्याप झालेले नाही. मात्र शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून खातेवाटपाविषयी सूतोवाच करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे वनविभागाची धुरा सोपवली जाण्याचे संकेत (Saamana on Aditya Thackeray Ministry) मिळत आहेत.

आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणासाठी सातत्याने केलेले काम पाहाता त्यांच्याकडे या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच पर्यावरणासोबतच आणखीही एखाद्या महत्वाच्या खात्याची धुरा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांची सामाजिक न्याय विभागावर बोळवण होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या मुंडेंचा जलसंपदा विभागासाठी आग्रह असल्याचं म्हटलं जातं.

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुजबळही नाखुश असल्याचं म्हटलं जातं. तर नवाब मलिक राज्य उत्पादन शुल्क मंत्रालय सोडून कामगार मंत्रालयासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद राष्ट्रवादीला असल्यास ग्रामविकास आणि ग्रामीण भागाशी निगडीत खातं काँग्रेसकडे वळवलं जाण्याची शक्यता आहे.

ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले कृषी खाते गुलाबराव पाटील किंवा दादा भुसे यांच्यासारख्या ग्रामीण भागातील नेत्यांकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे, असं ‘सामना’त म्हटलं आहे.

फडणवीस सरकारमध्ये उद्योग खात्याची जबाबदारी सांभाळणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी कृषी खात्याची जबाबदारी सांभाळावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असल्याचं म्हटलं जातं. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय एक-दोन दिवसात होईल, असाही यात उल्लेख आहे. (Saamana on Aditya Thackeray Ministry)

राष्ट्रवादीचे मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री)  – बारामती (पुणे) दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे) धनंजय मुंडे – परळी (बीड) अनिल देशमुख  – काटोल (नागपूर) हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर) राजेंद्र शिंगणे  – सिंदखेड राजा (बुलडाणा) नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई) राजेश टोपे – उदगीर (लातूर) जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे) बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा) दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे) आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर) प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)

आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

शिवसेनेचे मंत्री 

संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ) गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव) दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक) संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद) अनिल परब – मुंबई (विधानपरिषद) उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी) आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई) शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर) अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) – सिल्लोड (औरंगाबाद) शंभूराज देसाई (राज्यमंत्री) – पाटण (सातारा) बच्चू कडू (राज्यमंत्री) – (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती) राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर)

आतापर्यंत सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

काँग्रेसचे मंत्री

अशोक चव्हाण – भोकर (नांदेड) के सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार) विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर) अमित देशमुख– लातूर शहर (लातूर) सुनिल केदार – सावनेर (नागपूर) यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती) वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई) अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई) सतेज पाटील (राज्यमंत्री) – कोल्हापूर (विधानपरिषद) डॉ. विश्वजीत कदम (राज्यमंत्री) – पलुस कडेगाव (सांगली)

आतापर्यंत बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Saamana on Aditya Thackeray Ministry

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...