Breaking News Maharashtra LIVE: आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातून २५ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

कोर्टाने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर जैन समाज हा चांगलाच आक्रमक होताना दिसला. हेच नाही तर दादरच्या कबुतरखाना परिसरात टाकलेली ताडपत्री फाडून त्यांनी कबुतरांना धान्य दिले. आता मराठी एकीकरण समिती आक्रमक होताना दिसतंय. कबुतरखाना विरोधात ते आज आंदोलनाच्या तयारी आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडले. पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. आज याप्रकरणी कोर्टात सुनावणी आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद गेल्यानंतरही शासकीय बंगला सोडला नाहीये, त्यांच्यावर दंड आकारण्यात आलाय. त्यावरही आज महत्वाच्या घडामोडींची शक्यता आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातून २५ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग
आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पातून २५ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यातून आला आहे. प्रकल्पाच्या ३१ पैकी २५ दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. २५ दरवाजे ३० सेंटीमीटरने उघडून ६६८.७३ घनमीटर पाण्याचा विसर्ग केला. पाण्याचा येवा कायम असल्याने प्रचलन सूचीनुसार प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करणअया आला. त्यामुळे वर्धा नदीकाठीच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
-
धुळे -सोलापूर महामार्गावर क्रुझरला अपघात, 9 जण जखमी
धुळे -सोलापूर महामार्गावर क्रुझर कारला अपघात झाल आहे. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीनंतर या जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाकाळा गावाजवळील शिवाजीनगर येथे क्रुझरचा टायर फुटला. त्यामुळे क्रुझर डिव्हायडरला धडकून नाल्यात कोसळली.
-
-
कल्याण चिकन मटन बंदी प्रकरणी आयुक्त अभिनव गोयल यांची महत्त्वाची पत्रकार परिषद
कल्याणमधील चिकन मटन बंदीच्या निर्णयामुळे वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणी केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. आयुक्त चिकन मटण बंदी प्रकरणात महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयुक्त काय निर्णय घेतात याकडे साऱ्या राज्याचं लक्ष असणार आहे.
-
एनसीबीने 200 कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला
एनसीबीने 200कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यासोबतच ड्रग्ज रॅकेटशी संबंधित 8 तस्करांनाही अटक करण्यात आली आहे.
-
माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींचा पुणे कोर्टात दावा
माझ्या जीविताला धोका असल्याचा दावा राहुल गांधी यांनी पुणे कोर्टात केला आहे. सावरकर मानहानी प्रकरणातील सुनावणी दरम्यान त्यांनी हा दावा केला आहे. गोडसेंच्या वंशजांनी माझी तक्रार केल्याचं देखील राहुल गांधी यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी अर्जातून दावा केला आहे.
-
-
नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने 15 ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश
नाशिक महापालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 ऑगस्टला महापालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने आदेश काढले आहेत. 15 ऑगस्टला कुणीही जनावरांची कत्तल करू नये, पालिका प्रशासनाने आवाहन केलं आहे. जनावरांची कत्तल करतांना आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
-
अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार बॅटिंग
अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. धामणगाव रेल्वे तालुक्याला पावसाने झोडपलं. अंजनशिंगी परिसरामध्ये नदीच्या पुराचे पाणी शिरले शेतात अनेक शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कपाशी, तूर, सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे.
-
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा, सर्वोच्च न्यायालय उद्या याचिकेवर सुनावणी करणार
जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा राज्य दर्जा पुनर्संचयित करण्याच्या मागणीसाठीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी करणार आहे. मुख्य न्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांचे खंडपीठ या याचिकेवर सुनावणी करणार आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा पुनर्संचयित करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
-
चंद्रपूरात संततधार पावसाने ईरई धरणाची पाणीपातळी उंचावली
चंद्रपूर जिल्ह्यातील संततधार पावसाने शहरालगतच्या ईरई धरणाची पाणीपातळी उंचावली, 7 पैकी 2 दरवाजे उघडून विसर्ग सुरू झाला आहे.
-
वर्धा येथे नदीला पुर आल्याने वर्धा – राळेगाव मार्गाची वाहतूक विस्कळीत
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील सरूळ शिवारात यशोदा नदीला पुर आल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने वर्धा – राळेगाव मार्गाची वाहतूक प्रभावित झाली आहे.
-
कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम- कोर्ट
तूर्तास कबूतरखान्यांवर बंदही कायम असणार आहे. लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या. सार्वजनिक नोटीस जारी करुन लोकांचे मत जाणून घ्या असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
-
टोल नाक्यावर ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण; पोलिस अंमलदार निलंबित
पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण एक्स्प्रेसवेवरील उर्से टोल नाक्यावर आज दुपारी संतप्त नागरिकांनी ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण केली होती. वॉर्डनवर खाजगी बस ऑपरेटरकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. घटनेदरम्यान ट्रॅफिक कॉन्स्टेबलने हस्तक्षेप केला, त्यानंतर वॉर्डनने पैशांची कबुली दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाईचा इशारा दिला होते.
-
त्यांनी खड्ड्यातले पैसे खाल्ले; उदय सामंत यांची जोरदार टीका
ज्या लोकांनी अनेक वर्षे मुंबईत महानगरपालिकेमध्ये सत्ता भोगली त्यांनी फक्त खड्ड्यातले पैसे खाल्ले.. मराठी माणसांची सहानुभूती मिळवण्यासाठी नवीन धोरण आणलेलं आहे.. दोन वर्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई खड्डेमुक्त होणार आहे असे उदय सामंत यांनी म्हटलं.
-
बदनापूर शहरात निघाली हर घर तिरंगा रॅली
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात आज हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी बदनापूर शहरातील सर्वच शाळेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या मध्ये सहभाग घेतला शिवाय मोठ्या संख्येने नागरिक देखील सहभागी झाले होते.बदनापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात होऊन बाजार समितीमध्ये या रॅलीचा समारोप झाला यावेळी भाजप आमदार नारायण कुचे त्याचबरोबर जालन्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी अशीमा मित्तल उपस्थित होत्या.दरम्यान यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत संवादही साधला. त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं.
-
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे सोलापूर- धुळे महामार्गावरील पाणीच पाणी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे सोलापूर- धुळे महामार्गावरील पाणीच पाणी. सोलापूर शहरातील पावसामुळे ओढे नाले ओव्हरफ्लो झाल्याने तुळजापूर नाका येथील ओढादेखील ओव्हर फ्लो झाला आहे. सोलापूर धुळे महामार्गावर ओढ्याचं पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. धुळ्याकडून सोलापूरकडे येणारी वाहतूकही संथगतीने झाली आहे.
-
20 वर्षीय सुलेमान पठाण यांच्या मृत्यू प्रकरण; एमआयएमकडून प्रकरणात कायदेशीर मदत
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे 20 वर्षीय सुलेमान पठाण यांच्या मृत्यू प्रकरणात एम आय एम च्या माजी खासदार इम्तियाज जलील यांचे वकील व प्रतिनिधींच्या मंडळाने जामनेर पोलिसांची भेट घेतली. एमआयएम चे प्रदेश महा सचिव समीर साजिद बिल्डर , ज्येष्ठ वकील ॲड खिजर पटेल, निरीक्षक शारिक नक्षबंदी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. एमआयएमच्या प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाने बेटावद येथे जात मृतकाच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन व्यक्त केले आणि या प्रकरणात कायदेशीर मदतीचे आश्वासन दिले आहे.
-
जळगावात देखील स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी
जळगाव शहरात स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी काढले आहेत.आदेशात स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख न करता याच दिवशी श्रीकृष्ण जयंती असल्याने मास विक्रीवर बंदी बाबत आदेशात नमूद आहे. दरवर्षी श्रीकृष्ण जयंतीला मास विक्रीवर बंदीचे आदेश काढत असतो, यंदा योगायोगाने 15 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आली त्यामुळे त्या दिवशी मास विक्री बंदचे आदेश काढले असल्याचं स्पष्ट केलं आहे.
-
धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर
धनंजय मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर गेले आहेत. ही भेट नेमकी कशासाठी हे मात्र अजूनही समजलेलं नाही.
-
मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे ‘सह्याद्री’ वर दाखल
मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे ‘सह्याद्री’ वर आले आहेत. शासकीय बंगल्याच्या ताब्यावरून मुंडे यांनी भेट घेतली की वैयक्तिक कामासाठी ? मुंडेंच्या भेटीवरून विविध चर्चांना उधाण
-
स्वातंत्र्य दिनी काय खायचं किंवा खायचं नाही, हे ठरवण्याचा हक्क आपल्याला आहे – आदित्य ठाकरेंचं ट्विट चर्चेत
स्वातंत्र्य दिनी काय खायचं किंवा खायचं नाही, हे ठरवण्याचा हक्क आपल्याला आहे! कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना त्यात हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि असा हुकूम नागरिक मान्यही करणार नाहीत , शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांचं ट्विट सध्या चर्चेत आहे.
स्वातंत्र्य दिनी काय खायचं किंवा खायचं नाही, हे ठरवण्याचा हक्क आपल्याला आहे!
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना त्यात हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि असा हुकूम नागरिक मान्यही करणार नाहीत!
नागरिकांवर शाकाहार लादण्याऐवजी शहरातील भयानक रस्ते आणि मोडकळीस आलेल्या नागरी…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 13, 2025
-
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीला सह्याद्री अतिथीगृहात सुरूवात
सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीला सह्याद्री अतिथीगृहात सुरूवात झाली आहे. या बैठीकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे,मंत्री मंगलप्रभात लोढा,आमदार राजेंद्र चौधरी,योगेश कदम हजर आहेत.
-
भुसावळ रेल्वे स्थानकावर मनमाड व सुरत कडे कडे जाणाऱ्या गाड्या गेल्या दोन तासापासून रखडल्या
भुसावळ रेल्वे स्थानकावर मनमाड व सुरत कडे कडे जाणाऱ्या गाड्या गेल्या दोन तासांपासून रखडल्या आहेत.
गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्सप्रेस, वास्को-द-गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस, छपरा सुरत ताप्ती गंगा एक्सप्रेस, भुसावळ नंदुरबार पॅसेंजर पुनर्निर्धारित, या गाड्या गेल्या दोन तासापासून भुसावळ रेल्वे स्थानकावर उभ्या आहेत.
भुसावळ जळगाव महामार्गावरील रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याच्या कामामुळे भुसावळ रेल्वे स्थानकावर या गाड्या थांबून ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती रेल्वेने दिली.
-
सोलापूरमध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
सोलापूरमध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याच्या निषेधार्थ माकपने ही निदर्शनं केली आहेत.
-
सोलापूर-धुळे महामार्गावरील वाहतुकीला ब्रेक
सोलापूर जवळील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तुळजापूर नाका येथील ओढा झाला ओव्हर फ्लो. सोलापूर धुळे महामार्गावर ओढ्याचं पाणी आल्यामुळे वाहतूक झाली विस्कळीत. धुळ्याकडून सोलापूरकडे येणारी वाहतूक झाली संथगतीने. सोलापूर धुळे महामार्ग आणि सोलापूर पुणे महामार्ग सर्विस रोड गेले पाण्याखाली.
-
लोढांसारखे एका समाजासाठी काम करणारे मंत्री आमच्याकडे नाहीत – गोवर्धन देशमुख
“लोढांसारखे एका समाजासाठी काम करणारे मंत्री आमच्याकडे नाहीत. पोलिसांमुळे माझा हात मुरगळला. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. पोलिसांकडून आमच्यावर दडपशाही सुरु आहे. आगामी निवडणुकीसाठी ताकद दाखवली जातेय” असं गोवर्धन देशमुख म्हणाले.
-
पेहलवान सुशील कुमारला सुप्रीम कोर्टाकडून झटका
ज्यूनियर पेहलवान सागर धनखड हत्याकांड प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आरोपी पेहलवान सुशील कुमारला सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. कोर्टाने सुशील कुमारला एका आठवड्यात सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने मार्च महिन्यात सुशील कुमारला नियमित जामीन दिलेला. मे 2021 मध्ये हत्याकांड प्रकरणात सुशील कुमारला अटक झालेली.
-
राहुल गांधींच्या मुद्याचं करुणा मुंडेंकडून स्वागत
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर उपस्थित केलेल्या प्रश्नाचे करुणा मुंडे यांनी स्वागत केले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा निवडणूक आयोग धनंजय मुंडेंना पाठिंबा देत होता. करुणा मुंडे म्हणाल्या की, ‘निवडणूक आयोग सत्तेत असलेल्या मोठ्या नेत्यांसाठी काम करतो’
-
मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड
दादरमधील आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. कबुतरखानाच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन करण्यात येत आहे.
-
दादरमध्ये मराठी एकीकरण समितीचं आंदोलन
दादरमधील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन करण्यात येत आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.
-
हत्या प्रकरणातील कुस्तीगीर सुशील कुमारचा जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द
सर्वोच्च न्यायालयाने कुस्तीगीर सुशील कुमारचा खून प्रकरणातला जामीन रद्द केला आहे. त्याला एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर सुशीलवर सागर धनकडच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.
-
गायक बादशाहच्या क्लबवरील हल्ल्याप्रकरणी एकाला अटक
चंदीगडमध्ये गायक बादशाहच्या क्लबवरील हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतून एका आरोपीला अटक केली. या आरोपीचं नाव दीपक असं असून तो पंजाबमधील फरीदकोटचा रहिवासी आहे. दीपक हा गँगस्टर गोल्डी ब्रारच्या सतत संपर्कात होता अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
-
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवकडून पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५ चं कुर्ल्यात भव्य उद्घाटन
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवकडून पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५ चं कुर्ल्यात भव्य उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मंगलप्रभात लोढा, माणिकराव कोकाटे, रणजीत खाशाबा जाधव उपस्थित होते. मल्लखांब, कुस्ती, कबड्डी, खो-खो यांसारख्या पारंपरिक क्रीडांचा जल्लोष करण्यात येणार आहे. तरुणाईत क्रीडा संस्कार रुजवण्याचा आयोजकांचा निर्धार आहे.
-
दिग्गज निर्माते अशोक पंडित यांच्याकडून जया बच्चन यांच्या वर्तनाचा निषेध
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांच्याजवळ एक व्यक्ती सेल्फी क्लिक करण्यासाठी गेली असता त्या व्यक्तीला जया बच्चन जोरात धक्का देऊन ओरडतात. त्यांच्या या वर्तनाचा निर्माते अशोक पंडित यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
-
विदर्भात काँग्रेसला आणखी एक धक्का…
अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे मोर्शी मतदारसंघाच्या माजी आमदाराचे पुत्र लवकरात भाजपमध्ये जाणार… काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे भाजपच्या संपर्कात… शनिवारी वरुड येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विक्रम ठाकरे करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश सूत्रांची माहिती… मागील विधानसभा निवडणुकीत विक्रम ठाकरे यांना महाविकास आघाडने उमेदवारी न दिल्याने त्यांनी लढवली होती अपक्ष निवडणूक…
-
आदेश आणि महापालिकेचे स्टॉक व्हिडिओ हॉट लाईनवर
जळगाव शहरात स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी करण्यात आली आहे… याबाबतचे आदेश महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी काढले आहेत… आदेशात स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख न करता याच दिवशी श्रीकृष्ण जयंती असल्याने मास विक्रीवर बंदी बाबत आदेशात नमूद आहे… १५ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आणि २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी या दिवशी दोन मांसविक्री बंद ठेवण्यात येणार आहे… या बंदी असलेल्या दिवशी व्यवसाय सुरू असल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे… सदरचे वृत्त महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे…
-
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा…
चंद्रपूर : 9 विद्यार्थी रुग्णालयात दाखल, चिमूर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या जांभुळघाट येथील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील घटना… शाळेत एकूण ५३८ विद्यार्थी असून 9 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने या विद्यार्थ्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. मुलं-मुलींना उलट्या, हातापायांना सूज, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू लागली. दरम्यान, या विद्यार्थ्यांना नेमका कशाचा त्रास झाला, याचा शोध घेतला जात असून त्यांच्या विविध तपासण्या केल्या जात आहेत. अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली आहे…
-
वांद्रे तलावाजवळ कबुतरखान्यात न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन, अजूनही खाद्य घालणं सुरुच
मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखाना बंद करण्याचे आदेश देऊनही वांद्रे तलावातील कबुतरखान्यात आजही काही लोक कबुतरांना खाऊ घालताना दिसत आहेत. आज एका महिलेने येथे कबुतरांना अन्न टाकले. कबुतरांच्या पिसांमधून आणि विष्ठेतून पसरणाऱ्या जंतूंमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनिया सारखे गंभीर आजार वाढत असल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कबुतरांना अन्न देऊ नये असा स्पष्ट बोर्ड लावलेला असूनही, काही लोकांना या आदेशाची माहिती नसल्याचे दिसते. एका तरुणाने कबुतरांना खाद्य देताना सांगितले की त्याला न्यायालयाच्या आदेशाबद्दल माहिती नव्हती, पण आता यापुढे तो खाऊ घालणार नाही. तरीही, अनेक ठिकाणी अजूनही या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.
-
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेची युवासेना आढावा बैठक, उत्तर महाराष्ट्रातील कामकाजाचा आढावा घेणार
नाशिकमध्ये आज ठाकरे गटाच्या शिवसेनेची युवासेना आढावा बैठक होत आहे. या बैठकीसाठी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित राहणार असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर महाराष्ट्रातील कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. गोल्फ क्लबसमोरील शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या या बैठकीत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यासाठीची रणनीती यावर या बैठकीत सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.
-
रक्षाबंधन सणानिमित्त एसटी महामंडळाला प्रवाशांचा भरभरुन प्रतिसाद, तब्बल 137.37 कोटी रुपयांचे उत्पन्न
यंदाच्या रक्षाबंधन सणानिमित्त एसटी महामंडळाला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला. 8 ते 11 ऑगस्ट या चार दिवसांत एसटीच्या प्रवासी उत्पन्नाने उच्चांक गाठला. या काळात महामंडळाला तब्बल 137.37 कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये विशेषतः 11 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी एसटीने 39 कोटी रुपयांची कमाई केली. ही या वर्षातील आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेक प्रवाशांनी एसटीने प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित, सोयीचा आणि परवडणारा असल्याने अनेक प्रवाशांनी आपल्या गावी जाण्यासाठी एसटीला पसंती दिली, याचाच फायदा महामंडळाला झाला.
-
प्रांजल खेवलकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
पुणे पोलिसांना खराडी परिसरात एका ड्रग्ज पार्टीवर छापा टाकण्यात यश आलं. याप्रकरणी पोलिसांनी प्रसिद्ध व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिक प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांचा या पार्टीशी नेमका काय संबंध आहे याचा तपास सुरू आहे. दरम्यान, प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळावा यासाठी वकिलांनी आज पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर आज दुपारी 3 वाजता सुनावणी होणार असून, न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
दादर कबुतरखाना परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त
कबुरतखाना बंदवरून मराठी एकीकरण समितीचे आज आंदोलन असून दादरच्या कबुतरखाना परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आहे. याच पार्श्वभूमीवर जैन मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आलाय.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता संवाद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता संवाद. जनता संवादला उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल
-
येरवड्यातून चार मनोरुग्ण बेपत्ता
येरवड्यातून चार मनोरुग्ण बेपत्ता. संरक्षक भिंत नसल्याचा परिणाम. सहा कर्मचारी निलंबित. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातून चार मनोरुग्ण गेल्या दोन आठवड्यामध्ये बेपत्ता झाल्यानंतर मनोहर रुग्णालयात प्रशासनाने सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले
-
मार्केट यार्ड शुक्रवारी बंद
स्वातंत्र्यदिनानिमित्त पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड येथील बाजार विभाग शुक्रवारी बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीस न आणण्याचे आव्हान बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Published On - Aug 13,2025 8:06 AM
