Chanakya Niti : पुरुषांनी नेहमी या 3 गोष्टींपासून दूर राहावं, चाणक्य यांचा सल्ला
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आयुष्य जगताना काय करायला पाहिजे आणि कोणत्या चुका टाळाव्यात याचं मार्गदर्शन व्यक्तीला मिळत.

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे आयुष्य जगताना काय करायला पाहिजे आणि कोणत्या चुका टाळाव्यात याचं मार्गदर्शन व्यक्तीला मिळत. चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांचं अर्थशास्त्र या विषयात विशेष प्रभूत्व होतं. आयुष्याचं नियोजन कसं करावं हे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सोप्या-सोप्या उदाहरणातून समजून सांगितलं आहे.
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये पुरुषांना काही सल्ले दिले आहेत. चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करता कामा नये, कारण तुम्ही जर या चुका केल्या तर तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते. तुम्ही बरबाद व्हाल. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे.
महिलांचा अपमान – चाणक्य म्हणतात पुरुषांनी कधीच महिलांचा अपमान करू नये, महिलांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे. कारण एक स्त्री कधीही आपला अपमान विसरत नाही, तीने मनात आणलं तर तुमच्या संपूर्ण घराचं वाटोळ होऊ शकतं, त्यामुळे महिलांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे.
चुकीची संगत – चाणक्य म्हणतात पुरुषांनी नेहमी चुकीच्या संगतीपासून दूर राहिलं पाहिजे, तुमचा कितीही जवळचा मित्र असू द्या, तो जर चुकीच्या गोष्टी करत असेल तर तुम्ही त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, त्यातच तुमचं हीत आहे. तुम्ही जर अशा मित्रांच्या नादी लागलात तर भविष्यात तुम्हालाही त्या सवयी लागू शकतात.
घरातील गोष्टी – आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने काही योजना बनवणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये काही वाद विवाद सुरू असतील तर चुकूनही त्याची चर्चा बाहेर करू नका, यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. या तीन गोंष्टीपासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्य देतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
