AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रावण महिन्यात करा हे खास उपाय; वास्तुदोषापासून मिळेल मुक्ती

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं, श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. शास्त्रानुसार या महिन्यात महादेवांची भक्ती भावानं पूजा आणि प्रार्थना केल्यास महादेवांचा आशीर्वाद मिळतो

श्रावण महिन्यात करा हे खास उपाय; वास्तुदोषापासून मिळेल मुक्ती
| Updated on: Jul 20, 2025 | 9:03 PM
Share

हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं, श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. शास्त्रानुसार या महिन्यात महादेवांची भक्ती भावानं पूजा आणि प्रार्थना केल्यास महादेवांचा आशीर्वाद मिळतो, तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी येते. तुमची प्रगती होते. यासोबतच जे काही रोग, दोष आणि कष्ट आहेत, त्याचा देखील अंत होतो. जर तुमच्याही घरात वास्तुदोष आहे आणि त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडत आहे, तर तुम्ही श्रावणात काही विशेष उपाय करू शकतात, त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, जाणून घेऊयात या उपयांबाबत.

ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही जर वास्तुदोषामुळे अडचणीत असाल, तुम्हाला कुठल्याच कामात यश मिळत नसेल, घरात पैसा टिकत नसेल, काही आरोग्याच्या समस्या असतील, तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही श्रावण महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी घरात शिवलिंग तयार करून त्याची पूजा करा, सोबतच दोन लवंगा आणि कापूर महादेवाच्या या पिंडीला अर्पण करा, महादेवाच्या पिंडीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे तुमच्या घरातील जे काही वास्तुदोष आहेत ते नष्ट होतील. तुम्हाला वास्तुदोषापासून मुक्ती मिळेल.

सोबत वास्तुदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठून अंघोळ करून महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाची भक्तीभावानं पूजा करा. महादेवांना बेलाची पानं अर्पण करा. सायंकाळच्या वेळी देवघरात किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा. दररोज सकाळी घरात कापूर लावा, त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्म ऊर्जा नष्ट होऊन तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल.

वास्तुदोष दूर करण्याचे अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, त्यातील काही उपयांची आपण आज माहिती घेतली. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील देवी देवतांच्या फोटोची दिशा देखील योग्य असणं गरजेचं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.