Vastu | नवीन प्लॉट घेताय ? मग हे वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल

महानगरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे लोक लहान घरांमध्ये (Home) राहतात. पण असे असताना देखील घराची सजावट करताना तुम्ही वास्तुशास्त्रातील (Vastu) काही नियम लक्षात ठेवायला हवेत.

Vastu | नवीन प्लॉट घेताय ? मग हे वास्तु नियम नक्की लक्षात ठेवा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल
vastu
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 11:58 AM

मुंबई :  महानगरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे लोक लहान घरांमध्ये (Home) राहतात. पण असे असताना देखील घराची सजावट करताना तुम्ही वास्तुशास्त्रातील (Vastu) काही नियम लक्षात ठेवायला हवेत. वास्तुशास्त्रातील नियमांकडे आपण दुर्लक्ष केले तर याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात. घर खरेदी करणे ही एक मोठी जबाबदारी आहे कारण प्लॉट खरेदी करताना वास्तुशी (Vastu Rules) संबंधित कोणत्याही चुकीमुळे मोठे नुकसान होते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या प्लॉट खरेदी करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा तो प्लॉट ठेवणे किंवा विकणे योग्य नाही. त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो.

अशा प्लॉटमुळे नुकसान होते जमिनीच्या दक्षिणेला विहीर असणे अत्यंत धोकादायक असते, अशा प्लॉटमध्ये अपघाती घटना घडतात. प्लॉटचा ईशान्य कोपरा वाढवणे शुभ आहे, तर दक्षिण आणि पश्चिम कोपऱ्याची उंची अशुभ आहे. नैऋत्य दिशेला वाढलेला कोनाचा आकार अशुभ मानला जातो. प्लॉट खरेदी करायला गेल्यावर दक्षिणेत वाढीव जमीन घेऊ नये, अशी गाठ बांधा. जर असा प्लॉट आधीच असेल तर तो एकतर सोडून द्यावा किंवा तो या दिशेने काटकोनात बनवला पाहिजे.

चांगले कंपन माणसाच्या सभोवताली जशी आभा असते, त्याचप्रमाणे जमिनीवर वेगवेगळी कंपने असतात. वेगवेगळ्या लहरी आहेत आणि त्यामागे काही दृश्य आणि अदृश्य कारणे आहेत. उदाहरणार्थ, शंभर वर्षांपूर्वी एखाद्या जमिनीवर स्मशानभूमी असेल, तर अशा जमिनीचे कंपन योग्य होणार नाही. आता अशा जमिनीवर राहणे कुठूनही योग्य होणार नाही. दवाखाना, तुरुंग, पोलीस ठाणे किंवा अशा कोणत्याही ठिकाणी जिथे गेली अनेक वर्षे दु:खाचे वातावरण आहे आणि आता तुम्ही तिथे घर बांधणार आहात, तेव्हा लक्षात ठेवा की, वेदनेच्या लाटा कुठे पसरत आहेत. वर्षानुवर्षे, तेथे जमीन मालकाला शांतता मिळणार नाही.

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | लग्नासाठी मुली बघताय ? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा

‘पितृदोष’ आणि ‘वास्तुदोष’ दूर करण्यासाठी कापूर वापरून करा हे उपाय… सर्व त्रास होतील दूर !

24-30 April 2022, साप्ताहिक राशिभविष्य : कन्या राशीसाठी कठीण असेल काळ, पहा इतर राशींसाठी संपूर्ण आठवडा कसा राहील..

Non Stop LIVE Update
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.