AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar : तुझे क्रिकेटर मित्र किती? अर्जुन तेंडुलकरच उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल, टीकेचा काय परिणाम होतो यावरही बोलला VIDEO

Arjun Tendulkar : आयपीएल 2026 चा सीजन सुरु झालाय. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन एका पॉडकास्टमध्ये बऱ्याच विषयांवर मनमोकळेपणाने बोललाय. तुझ्यावर जेव्हा टीका होते, तू कसा शांत राहतोस? यावर सुद्धा अर्जुन बोललाय.

Arjun Tendulkar : तुझे क्रिकेटर मित्र किती? अर्जुन तेंडुलकरच उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल, टीकेचा काय परिणाम होतो यावरही बोलला VIDEO
Arjun Tendulkar Image Credit source: PTI
| Updated on: Apr 01, 2026 | 9:42 AM
Share

सलग दोन सीजन मुंबई इंडियन्स टीमचा भाग राहिल्यानंतर अर्जुन तेंडुलकर आता आयपीएल 2026 मध्ये नव्या फ्रेंचायजीकडून खेळताना दिसणार आहे. अर्जुन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. मैदानातील त्याच्या कामगिरीवर नेहमीच मीडियाचं बारीक लक्ष असतं. अर्जुन तेंडुलकर यंदाच्या सीजनमध्ये लखनऊ सुपर जायंट्स फ्रेंचायजीचा भाग आहे. ऋषभ पंत या टीमचा कॅप्टन आहे. अर्जुनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार किंवा नाही, या बद्दल काही ठामपणे सांगता येणार नाही. अर्जुन तेंडुलकर ऑलराऊंडर आहे. लिलावात अर्जुनला त्याच्या बेस प्राइसला 30 लाख रुपयात विकत घेतलं. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एकाना क्रिकेट स्टेडियममधून एलएसजीच्या आयपीएल 2026 च्या सीजनला सुरुवात होईल. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध त्यांचा पहिला सामना आहे.

मैदानावर तू कसा शांत राहतो? यावर बोलतानाचा अर्जुन तेंडुलकरचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शुभांकर मिश्रा अर्जुनला विचारतो, तू स्वत:ला शांत कसं ठेवतोस? त्यावर अर्जुनने उत्तर दिलं की, ‘गोव्यात माझ्याकडे पाच कुत्रे आहेत. मी त्यांच्यासोबत खेळण्यात वेळ घालवतो’. तुझे कोणी क्रिकेटर मित्र आहेत का? असा प्रश्न शुभांकरने विचारला. त्यावर अर्जुन म्हणाला की, ‘माझे क्रिकेटर मित्र नाहीयत. माझे बहुतेक मित्र क्रिकेट खेळत नाहीत’

नुकतचं झालय लग्न

तू टीकेला घाबरतोस का? या प्रश्नावर अर्जुनने ‘अजिबात नाही’ असं उत्तर दिलं. अर्जुन तेंडुलकर दोन सीजन मुंबई इंडियन्समध्ये होता. तो पाच सामने खेळला. यात त्याने तीन विकेट काढले आणि 13 धावा दिल्या. अर्जुन तेंडुलकरचा नुकताच 5 मार्च 2026 रोजी सानिया चंडोक सोबत विवाह झाला. त्यानंतरचा त्याचा हा पहिला आयपीएल सीजन आहे. अर्जुन तेंडुलकर डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.नेट्समध्ये अनेकदा तो भेदक गोलंदाजी करताना दिसतो.

‘अर्जुन कसा खेळणार?’

काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने अर्जुनला लखनऊ सुपर जायंट्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? यावर थेट भाष्य केलं होतं. “लखनऊच्या टीममध्ये मयांक यादव, मोहसीन खान, आवेश खान आणि मोहम्मद शमी सारखा बॉलिंग लाइन अप आहे. त्यामुळे अर्जुन कसा खेळणार? त्या टीममध्ये बऱ्याच दुखापती झाल्याशिवाय अर्जुनला संधी मिळेल असं मला वाटत नाही” असं अश्विन सरळ बोलला होता.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग