Australia vs India WTC Final 2023 Highlight | दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत 5 बाद 151 धावा

| Updated on: Jun 08, 2023 | 11:13 PM

Australia vs India Highlight in Marathi : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवसावरही ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. ऑस्ट्रेलियाकडे 318 धावांची भक्कम आघाडी आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आणि श्रीकर भरत तिसऱ्या दिवशी काय करतात? याकडे लक्ष लागून आहे.

Australia  vs India WTC Final 2023 Highlight | दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत 5 बाद 151 धावा

मुंबई : वर्ल्ड टेस्टच्या दुसऱ्या दिवसावरही ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व दिसून आलं. पहिल्या दिवशी फलंदाजांनी आणि दुसऱ्या दिवशी गोलंदाजांनी भारताला आस्मान दाखवलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 151 धावांवर 5 गडी बाद केले. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 318 धावांची आघाडी आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आणि श्रीकर भरत ही जोडी तारणार का? अशी आशा क्रीडाप्रेमी करत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jun 2023 10:36 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | दुसऱ्या दिवशी आघाडीचे फलंदाज फेल, भारत 5 बाद 151 धावा

    दुसऱ्या दिवसअखेर भारताने 5 गडी बाद 151 धावा केल्या. अजूनही भारताला 318 धावांची आघाडी पार करायची आहे. मैदानात अजिंक्य रहाणे नाबाद 29 आणि श्रीकर भारत नाबाद 5 धावांवर खेळत आहे.

  • 08 Jun 2023 10:15 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | रवींद्र जडेजा मोक्याच्या क्षणी बाद

    रवींद्र जडेजा  48 धावांवर असताना नाथन लायनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे आता तळाच्या फलंदाजांकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

  • 08 Jun 2023 10:01 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | टीम इंडिया संकटात असताना रहाणे जडेजा अर्धशतकी भागीदारी

    टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येची गरज असताना रहाणे आणि जडेजा जोडीने डाव सावरला आहे. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 50 धावांची भागीदारी केली आहे. अजूनही भारताचं संकट काही टळलेलं नाही.

  • 08 Jun 2023 09:27 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | भारताच्या 4 बाद 100 धावा

    भारताच्या 4 गडी बाद 100 धावा झाल्या आहेत. मैदानात अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा ही जोडी मैदानात आहे. त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

  • 08 Jun 2023 09:08 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | नो बॉल आणि अजिंक्य रहाणेला मिळालं जीवदान

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची स्थिती नाजूक झाली आहे. चार गडी झटपट बाद झाल्याने तशा आशा जवळपास निवळल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजाकडून मोठ्या धावांची अपेक्षा आहे. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रहाणे पायचीत घोषित करण्यात आलं. पण त्याने रिव्ह्यू घेतला आणि नो बॉल घोषित करण्यात आला. त्यामुळे त्याला जीवदान मिळालं आहे.

  • 08 Jun 2023 08:44 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | विराट कोहली बाद झाल्याने भारताच्या आशा जवळपास संपुष्टात

    विराट कोहलीच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला आहे. विराट कोहली बाद झाल्याने आता भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मोठी धावसंख्या उभारेल असा खेळाडू तळाशी नाही.

  • 08 Jun 2023 08:26 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | अजिंक्य रहाणेने चौकारासह खोललं खातं

    अजिंक्य रहाणेने चौकार मारत आपलं खात खोललं आहे. भारतीय संघ अडचणीत असताना त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

  • 08 Jun 2023 08:20 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | चेतेश्वर पुजारा 14 धावा करून तंबूत

    भारताचे गडी झटपट बाद झाले असून आता धावा होणं कठीण असल्याचं दिसत आहे. रोहित, शुभमन आणि पुजारा स्वस्तात बाद झाले. त्यामुळे आता फॉलोऑन तरी वाचवा, असं भारतीय फॅन्स सांगत आहेत.

  • 08 Jun 2023 08:14 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | पुजारा आणि विराटकडून क्रीडाप्रेमींना अपेक्षा

    रोहित शर्मा आणि शुभमन गिल झटपट बाद झाल्यानंतर आता विराट-पुजारा या जोडीकडून भारताला खूप अपेक्षा आहेत. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करणं अन्यथा कठीण होईल. इतकंच काय तर फॉलोऑनची नामुष्की देखील ओढावू शकते.

  • 08 Jun 2023 07:26 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | रोहित शर्मानंतर शुभमन गिल बाद, भारतावरील संकट गडद

    रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिलही तंबूत परतला आहे. दुसऱ्या दिवशी झटपट गडी बाद झाल्याने भारतावरील संकट गडद झालं आहे. आता विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्याकडून आशा आहेत.

  • 08 Jun 2023 07:22 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | कर्णधार रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का

    ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 439 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने पहिली विकेट दिली. रोहित शर्मा बाद झाल्याने टीम इंडियावर दबाव वाढला आहे.

  • 08 Jun 2023 06:54 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | टीम इंडिया आणि रोहित शर्माची फोरने सुरवात

    ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 469 धावांवर ऑलआऊट केल्यानंतर टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात आली आहे. रोहित शर्मा याने मिचेल स्टार्क याच्या बॉलिंगवर चौका ठोकत टीम इंडियाचं आणि स्वत:चं खातं उघडलं आहे.

  • 08 Jun 2023 06:50 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | पॅट कमिन्स आऊट, ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

    ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

    ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रात आटोपला आहे.  ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 121.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 469 धावांवर धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी शतकं ठोकली. हेडने 163 धावांची खेळी केली. तर स्टीव्हन स्मिथ याने 121 धावा केल्या.  स्टीव्हनचं भारत विरुद्धचं एकूण नववं कसोटी शतक ठरलं.

    या दोघांव्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन दिली नाही. एलेक्स कॅरी याने 48, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेन याने 26 धावा जोडल्या.  उस्मान ख्वाजा याला भोपळाही फोडता आला नाही. तर चौघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. तर स्कॉट बॉलंड 1 धावेवर नाबाद राहिला.

    ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

    टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली. तर रविंद्र जडेजा याने 1 विकेटसह चांगली साथ दिली. तर अक्षर पटेल याने मिचेल स्टार्क याला रन आऊट केलं.

  • 08 Jun 2023 06:33 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | नेथन लायन क्लिन बोल्ड

    मोहम्मद सिराजने नेथन लायनला क्लिन बोल्ड केलंय. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने नववी विकेट गमावलीय. नेथनने 9 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 9 बाद 468 असा झाला आहे.

  • 08 Jun 2023 06:14 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | एलेक्स कॅरी आऊट

    ऑस्ट्रेलियाने लंच ब्रेकनंतर पहिली आणि एकूण आठवी विकेट गमावली आहे. रविंद्र जडेजा याने एलेक्स कॅरी याला एलबीडबल्यू आऊट केलंय.  आधी अंपायरने कॅरीला आऊट देण्यास नकार दिला. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा याने रिव्हीव्यू घेत पंचाच्या निर्णयाला आव्हान दिलं. त्यानंतर थर्ड अंपायरने सर्वकाही तपासून कॅरी एलबीडबल्यू असल्याचं जाहीर केलं. कॅरीने   69 बॉलमध्ये 48 धावांची खेळी केली.

    जडेजाला पहिली विकेट

  • 08 Jun 2023 05:55 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | लंचनंतर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात

    लंचब्रेकनंतर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाची पॅट कमिन्स आणि एलेक्स कॅरी जोडी मैदानात खेळत आहे.  पहिल्या सत्रात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 4 झटके दिले. त्यानंतर आता या दुसऱ्या सत्रात कांगारुंना झटपट ऑलआऊट करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.

  • 08 Jun 2023 05:05 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 7 गडी बाद 422 धावा

    दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने चांगलं कमबॅक केलं आहे. 4 गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या धावांची गती रोखली. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुरने प्रत्येकी एक गडी बाद केला. तर अक्षर पटेलने जबरदस्त फिल्डिंग करत मिशेल स्टार्कला तंबूत पाठवलं. ऑस्ट्रेलियाने 7 गडी बाद 422 धावा केल्या आहेत. पण अजूनही तीन गडी बाद करण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे. त्याबरोबर इतक्या धावा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

  • 08 Jun 2023 04:39 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | लंचपूर्वी ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का

    लंचपूर्वी भारताला आणखी यश मिळालं आहे. मिशेल स्टार्कला धावचीत करण्यात अक्षर पटेलला यश आले आहे. त्याने डायरेक्ट हीट करत त्याला तंंबूचा रस्ता दाखवला.

  • 08 Jun 2023 04:33 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ऑस्ट्रेलियाच्या 6 गडी गमवून 400 धावा केल्या

    पहिल्या दिवशी 327 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 3 गडी गमवून 400 धावांचा पल्ला गाठला आहे. भारतीय गोलंदाजांना अजूनही झटपट गडी बाद करण्याचं आव्हान आहे.

  • 08 Jun 2023 04:13 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | शार्दुल ठाकुरने पहिल्याच चेंडूवर स्मिथला दाखवला इंगा

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिपमध्ये अडसर ठरत असलेल्या स्टिव्ह स्मिथला शार्दुल ठाकुरने तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला आणि संघाला कमबॅक मिळवून दिलं आहे.

  • 08 Jun 2023 04:04 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | झटपट गडी बाद करण्याचं गोलंदाजांना आव्हान

    भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आव्हान कायम ठेवायचं असेल तर झटपट विकेट घेणं गरजेचं आहे. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर दोनदा पायचीतसाठी अपील करण्यात आली. मात्र दोन्ही वेळेला नाबाद घोषित करण्यात आलं.

  • 08 Jun 2023 03:48 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | सिराजनंतर मोहम्मद शमीचा दे धक्का

    मोहम्मद सिराजने पहिला धक्का दिल्यानंतर मोहम्मद शमीने कॅमरून ग्रीनला तंबूचा रस्ता दाखवला आहे.

  • 08 Jun 2023 03:32 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | मोहम्मद सिराजने हेडला तंबूत धाडलं

    दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या तासात भारतीय गोलंदाजांची कसोटी लागली आहे. झटपट विकेट घेण्याचं आव्हान गोलंदाजांसमोर आहे. मोहम्मद सिराजला पहिलं यश मिळालं असून 150 धावा करणाऱ्या ट्रेव्हिस हेडला तंबूत धाडलं.

  • 08 Jun 2023 03:17 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ट्रेव्हिस हेडची दीड शतकी खेळी

    ट्रेव्हिस हेडने भारताविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली आहे. ट्रेव्हिस हेडने 150 धावा केल्या. विकेट घेण्यासाठी भारतीय गोलंदाजांची दमछाक झाली आहे. त्यामुळे भारताच्या हातून कसोटी सामना लांबत असल्याचं चित्र आहे.

  • 08 Jun 2023 03:13 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | भारताविरुद्ध सर्वाधिक शतक करणारे खेळाडू

    भारताविरुद्ध सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज

    • 9 - जो रूट
    • 9 - स्टीव्ह स्मिथ
    • 8 - रिकी पॉटिंग
    • 8 - सर विव रिचर्ड्स
    • 8 - सर गारफिल्ड सोबर्स
  • 08 Jun 2023 03:03 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | स्टिव्ह स्मिथचं भारताविरुद्ध दमदार शतक

    स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध दुसरं शतक ठोकलं आहे. मोहम्मद सिराजला सलग दोन चौकार ठोकत शतक ठोकलं आहे. 229 चेंडूत 103 धावा केल्या.

  • 08 Jun 2023 01:05 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध केलेल्या मोठ्या भागीदारी

    • 386 - रिकि पॉटिंग आणि मायकल क्लार्क, एडलेड, 2012
    • 334* - मायकल क्लार्क आणि मायकल हस्सी, सिडनी, 2012
    • 288 - रिकी पॉटिंग आणि मायकल क्लार्क, सिडनी, 2012
    • 251* - स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड, ओव्हल, 2023
    • 239 - रिकी पॉटिंग आणि स्टि वॉ, एडलेड, 1999
  • 08 Jun 2023 01:00 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | स्टिव्ह स्मिथला शतकासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता

    स्टिव्ह स्मिथने 227 चेंडूंचा सामना करत पहिल्या दिवशी नाबाद 95 धावांची खेळी केली आहे. आता त्याला शतकासाठी अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर या सामन्यातील दुसरं शतक क्रीडाप्रेमींना बघायला मिळू शकतं. स्टिव्ह स्मिथने कसोटीत आतापर्यंत 30 शतकं झळकावली आहेत.

  • 08 Jun 2023 12:57 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | ट्रेव्हिस हेड आणि स्टिव्ह स्मिथ जोडी फोडण्याचं आव्हान

    भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही हे पहिल्या दिवशीच कळलं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि स्टिव्ह स्मिथ जोडीने गोलंदाजांना चांगलंच दमवलं. आता दुसऱ्या कमबॅक करायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. अन्यथा हा सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजुने झुकलेला राहील. त्याचबरोबर फलंदाजांवर दडपण राहील.

  • 08 Jun 2023 12:37 PM (IST)

    Australia vs India Live Score, WTC Final 2023 | पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा, टीम इंडिया विरुद्ध 3 बाद 327 धावा

    वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 3 विकेट गमावून 85 ओव्हरमध्ये 327 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड  सर्वाधिक नाबाद 146 धावा करुन मैदानात आहे. तर स्टीव्हन स्मिथ 94 रन्सवर नॉट आऊट आहे. तर उस्मान ख्वाजा याने 0, डेव्हिड वॉर्नर याने 43 तर मार्नस लाबुशेने याने  26 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुर या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Published On - Jun 08,2023 12:35 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.