ENG vs IND : रोहित शर्मा-विराट कोहलीही इंग्लंड दौऱ्यावर जाणार, बीसीसीआयची मोठी घोषणा
Rohit Sharma and Virat Kohli England Tour 2026 : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार रोहित शर्मा आणि विराट कोहली ही जोडी 2026 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जाणून घ्या सविस्तर.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यजमान इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहेत. तर उभयसंघात 23 जुलैपासून चौथा कसोटी सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येत आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने 2026 च्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात एकदिवसीय आणि टी 20i अशा 2 मालिका खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात 5 टी 20i तर 3 एकदिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. टी 20i मालिका 1 ते 11 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. तर त्यानंतर 14 जुलैपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.
टी 20i मालिका
पहिला सामना, 1 जुलै, रात्री 11 वाजता, बँक्स होम्स रिव्हरसाईड, डरहमन
दुसरा सामना, 4 जुलै, संध्याकाळी 7 वाजता, एमीरेट्स ओल्ड ट्रफर्ड, मँचेस्टर
तिसरा सामना, 7 जुलै, रात्री 11 वाजता, ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम
चौथा सामना, 9 जुलै, रात्री 11 वाजता, सीट युनिक स्टेडियम, ब्रिस्टॉल
पाचवा सामना, 11 जुलै, रात्री 11 वाजता, युटिलिटा बॉऊल, साउथम्पटन
रोहित-विराट 3 सामने खेळणार
रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळणार आहेत. तसेच रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे या दोघांनी 2026 पर्यंत निवृत्ती घेतली नाही तर 3 सामने खेळतील हे निश्चित आहे.
भारताचा इंग्लंड दौरा 2026
5⃣ T20Is. 3⃣ ODIs
📍 England
Fixtures for #TeamIndia‘s limited over tour of England 2026 announced 🙌#ENGvIND pic.twitter.com/Bp8gDYudXW
— BCCI (@BCCI) July 24, 2025
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 14 जुलै, एजेबस्टन, संध्याकाळी साडे पाच वाजता, बर्मिंघम
दुसरा सामना, 16 जुलै, संध्याकाळी साडे पाच वाजता, सोफिया गार्डेन्स, कार्डीफ
तिसरा सामना, 19 जुलै, संध्याकाळी साडे पाच वाजता, लॉर्ड्स, लंडन
बांगलादेश दौरा स्थगित
दरम्यान टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार होती. भारतीय संघ या दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार होती. मात्र बीसीसीआयने हा दौरा सध्यासाठी स्थगित केला. त्यामुळे चाहत्यांना विराट आणि रोहितला मैदानात खेळताना पाहण्यासाठी आता आणखी काही आठवडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.
