CSK vs KKR, IPL 2022 : कोलकात्याचा विजयी शुभारंभ, CSK चा पराभव

| Updated on: Mar 26, 2022 | 11:29 PM

CSK vs KKR, IPL 2022 : क्रिकेट चाहते आतुरतेने ज्याची वाट पाहत असतात, तो क्रिकेटचा सण आज सुरु झाला आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा सीजन (IPL 2022) आजपासून सुरु होतोय.

CSK vs KKR, IPL 2022 : कोलकात्याचा विजयी शुभारंभ, CSK चा पराभव
Image Credit source: instagram

बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने विजयी शुभारंभ केला आहे. चेन्नई सुपर किंग्सला त्यांनी सहा विकेट राखून सहज पराभूत (KKR vs CSK) केलं. एमएस धोनीने (MS dhoni) या सामन्यात चमकदार खेळ दाखवला. आपल्यात अजूनही क्रिकेट शिल्लक असल्याचं त्याने दाखवून दिलं. धोनीने टीकाकारांना आपल्या फलंदाजीने उत्तर दिलं. पण त्याचा उपयोग झाला नाही. कोलकाताच्या फलंदाजांनी 132 धावांचे लक्ष्य 18.3 षटकात आरामात पार केलं. केकेआरकडून मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 44 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि शेल्डन जॅक्सनच्या जोडीने केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Key Events

दोन्ही संघांकडे नवीन कर्णधार

चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन्ही संघ या सीजनमध्ये नव्या कर्णधारासह मैदानावर उतरतील. महेंद्र सिंह धोनीने दोन दिवसांपूर्वी सीएसकेच कर्णधारपद सोडलं.

IPL मध्ये यंदा 10 संघ

आयपीएल यंदा एका नव्या फॉर्मेटमध्ये दिसणार आहे. कारण यावेळी आठऐवजी दहा संघ आयपीएलमध्ये आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 26 Mar 2022 11:01 PM (IST)

    कोलकात्याचा विजयी शुभारंभ, CSK चा पराभव

    बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीगच्या सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने विजयी शुभारंभ केला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा त्यांनी सहा विकेट राखून सहज पराभूत केलं.

  • 26 Mar 2022 10:44 PM (IST)

    कोलकाताचे धावांचे शतक पूर्ण

    कोलकाता नाइट रायडर्सने 100 धावांचा टप्पा पार केला आहे. श्रेयस अय्यर आणि बिलिंग्सची जोडी मैदानात आहे.

  • 26 Mar 2022 10:31 PM (IST)

    अजिंक्य रहाणे बाद

    दमदार फलंदाजी करणारा अजिंक्य रहाणे बाद झाला आहे. त्याने 44 धावा केल्या. सँटनरच्या गोलंदाजीवर त्याने रवींद्र जाडेजाकडे सोपा झेल दिला आहे. केकेआरच्या तीन बाद 87 धावा झाल्या आहेत.

  • 26 Mar 2022 10:03 PM (IST)

    चांगल्या सुरुवातीनंतर केकेआरला पहिला धक्का

    चांगल्या सुरुवातीनंतर केकेआरला पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर वेंकटेश अय्यर 16 धावांवर बाद झाला. ब्राव्होने त्याला धोनीकरवी झेलबाद केले.

  • 26 Mar 2022 10:01 PM (IST)

    केकेआरची चांगली सुरुवात

    केकेआरने चांगली सुरुवात केली आहे. त्यांच्या सहा षटकात बिनबाद 43 धावा झाल्या आहेत. अजिंक्य रहाणे 27 आणि वेंकटेश अय्यर 16 धावांवर खेळतोय.

  • 26 Mar 2022 09:54 PM (IST)

    Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना ताब्यात घेतलं

    किरीट  सोमय्या, नील सोमय्या आणि निलेश राणेंना ताब्यात घेतलं

    सोमय्यांना पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं

  • 26 Mar 2022 09:39 PM (IST)

    धोनीच्या आजच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं?

    IPL 2022च्या पहिल्याच सामन्यात धोनीनं कठीण परिस्थितीत फलंदाजीला येऊन पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलंय. धोनीच्या आजच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं?

  • 26 Mar 2022 09:36 PM (IST)

    कोलकाताच्या डावाला सुरुवात

    कोलकाताच्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकात बिनबाद 6 धावा झाल्या आहेत. रहाणे 6 धावांवर खेळतोय.

  • 26 Mar 2022 09:20 PM (IST)

    CSK साठी एमएस धोनी बनला संकटमोचक

    एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नईसाठी संकटमोचक ठरला आहे. संघ अडचणीत असताना धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्याने 38 चेंडूत नाबाद 50 धावा फटकावल्या. यात सात चौकार आणि एक षटकार आहे. उलट कर्णधार रवींद्र जाडेजाच थोडा दबावाखाली वाटला. त्याने 28 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या. फक्त एक चौकार त्याने लगावला. कोलकाताने आज टिच्चूक गोलंदाजी केली. CSK ने निर्धारीत 20 षटकात पाच बाद 131 धावा केल्या.

  • 26 Mar 2022 09:00 PM (IST)

    आता सर्व काही जाडेजा-धोनीवर अवलंबून

    चेन्नईचा संघ अडचणीत आहे. त्यांच्या 17 षटकात पाच बाद 84 धावा झाल्या आहेत. धोनी 19 आणि जाडेजा 16 धावांवर खेळतोय.

  • 26 Mar 2022 08:30 PM (IST)

    चेन्नईचा निम्मा संघ तंबूत

    चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. एमएस धोनी फलंदाजी मैदानात आला आहे. रसेलच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने नरीनकडे सोपा झेल दिला. शिवम दुबेने तीन धावा केल्या. चेन्नईच्या 11 षटकात पाच बाद 61 धावा झाल्या आहेत.

  • 26 Mar 2022 08:17 PM (IST)

    चेन्नई सुपर किंग्स अडचणीत

    चेन्नई सुपर किंग्सचा संघ अडचणीत सापडला आहे. रॉबिन उथाप्पा पाठोपाठ अंबाती रायडू पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कॅप्टन रवींद्र जाडेजा आणि रायडूमध्ये धाव घेताना गोंधळ उडाला. रायडू 15 धावांवर रनआऊट झाला. CSK ची स्थिती चार बाद 52 आहे.

  • 26 Mar 2022 08:15 PM (IST)

    मौके पे चौका, शेल्डन जॅक्सनकडून जबरदस्त स्टम्पिंग, CSK ची तिसरी विकेट

    फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर KKR च्या शेल्डन जॅक्सनने जबरदस्त स्टम्पिंग केलं. त्याने क्रीझ बाहेर गेलेल्या रॉबिन उथाप्पाला आऊट केलं. उथाप्पा 28 धावांवर आऊट झाला. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.

  • 26 Mar 2022 08:05 PM (IST)

    रॉबिन उथाप्पा-अंबाती रायडूची जोडी मैदानात

    सात षटकात चेन्नईच्या दोन बाद 40 धावा झाल्या आहेत. रॉबिन उथाप्पा 29 आणि अंबाती रायडू सात धावांवर खेळतोय.

  • 26 Mar 2022 07:55 PM (IST)

    उमेश यादवने CSK ला दिला दुसरा झटका

    उमेश यादवने CSK ला दुसरा झटका दिला आहे. डेवॉन कॉनवेला उमेश यादवने तीन धावांवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. CSK च्या दोन बाद 28 धावा झाल्या आहेत.

  • 26 Mar 2022 07:53 PM (IST)

    रॉबिन उथाप्पाने बाऊन्सरवर लगावला दुसरा षटकार

    चार षटकात चेन्नई सुपर किंग्सच्या एक बाद 28 धावा झाल्या आहेत. या षटकात रॉबिन उथाप्पाने शिवम मावीच्या गोलंदाजीवर बाऊन्सरवर षटकार ठोकला. उथाप्पा 22 आणि कॉनवे 3 धावांवर खेळतोय.

  • 26 Mar 2022 07:47 PM (IST)

    रॉबिन उथाप्पाने लगावला षटकार

    तीन षटकात चेन्नई सुपर किंग्सच्या एक बाद 16 धावा झाल्या आहेत. या षटकात रॉबिन उथाप्पाने उमेश यादवच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. उथाप्पा 11 आणि कॉनवे 2 धावांवर खेळतोय.

  • 26 Mar 2022 07:37 PM (IST)

    उमेश यादवने चेन्नईला दिला पहिला झटका

    पहिल्याच ओव्हरमध्ये उमेश यादवने चेन्नईला मोठा झटका दिला आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाडला भोपळाही फोडू न देता उमेश यादवने त्याला माघारी धाडलं. ऋतुराजला स्लीपमध्ये नितीश राणा करवी झेलबाद केले.

  • 26 Mar 2022 07:08 PM (IST)

    KKR ची अशी आहे Playing 11

    KKR- श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नीतीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, मोहम्मद नबी, सुनील नरेन, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती

  • 26 Mar 2022 07:07 PM (IST)

    CKS ची अशी आहे प्लेइंग Playing 11

    CSK- रवींद्र जडेजा (कर्णधार), ऋतुरात गायकवाड़, डेवन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, राजवर्धन हंगरगेकर, मिचेल सँटनर, एडम मिल्न

  • 26 Mar 2022 07:04 PM (IST)

    श्रेयस अय्यरने टॉस जिंकला, KKR चा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

    आयपीएल 2022 मध्ये पहिल्या सामन्याचा टॉस झाला आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीचा कौल जिंकला असून त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

  • 26 Mar 2022 06:58 PM (IST)

    मागच्या सीजनमधला दोन्ही टीम्सचा रेकॉर्ड काय सांगतो

    मागच्या सीजनमधले दोन्ही टीम्सचे आकडे पाहिले तर चेन्नईची बाजू वरचढ आहे. 14 व्या सीजनमध्ये चेन्नईने तिन्ही सामन्यांमध्ये कोलकाताला पराभूत केलं होतं. यामध्ये फायनलचाही समावेश आहे.

  • 26 Mar 2022 06:51 PM (IST)

    आयपीएलमध्ये नवीन फॉर्मेट

    आयपीएल यंदा नवीन फॉर्मेट दिसणार आहे. यावेळी लीग मध्ये आठ ऐवजी दहा संघ आहेत. 10 टीम्सची दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सामन्यांची संख्या 60 वरुन 74 झाली आहेत.

  • 26 Mar 2022 06:48 PM (IST)

    आजपासून सुरु होतोय क्रिकेटचा सण

    क्रिकेट चाहते आतुरतेने ज्याची वाट पाहत असतात, तो क्रिकेटचा सण आज सुरु झाला आहे.

Published On - Mar 26,2022 6:47 PM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.