RR vs CKS : दुबेजींना लग्न मानवलं, चेन्नईविरोधात 4 षटकारांसह वेगवान अर्धशतक, 7 दिग्गजांना पछाडलं

शिवम दुबेच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानने एमसएस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला धूळ चारली. दुबे आणि यशस्वी जयसवालच्या अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने दिलेले 190 धावांचे आव्हान राजस्थानने सहज पार केलं.

1/5
लग्नानंतर लोक बदलतात असे म्हणतात. दुबे जी अर्थात शिवम दुबे याच्या बाबतीतही असेच घडले आहे. तोदेखील आता बदलला आहे. लग्नानंतर तो पहिल्यांदाच काल (2 ऑक्टोबरच्या संध्याकाळी) आयपीएलच्या खेळपट्टीवर पहिला सामना खेळण्यासाठी आला, तेव्हा त्याचा खेळण्याचा अंदाज बदलेला पाहायला मिळाला. तो खूपच आक्रमक वाटत होता. दुबेच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर राजस्थानने एमसएस धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला धूळ चारली.

2/5
16 जुलै 2021 रोजी शिवम दुबे याने मुंबईत अंजुम खान हिच्याशी विवाह केला. लग्नानंतर काल तो पहिल्यांदाच आयपीएलच्या मैदानात उतरला होता.

3/5
शिवम दुबेने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आक्रमक खेळी केली. शिवम दुबेने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही अर्धशतक लगावले नव्हते. 46 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पण लग्नानंतर आयपीएलच्या पहिल्या सामन्यात उतरल्यानंतर त्याने आपले पहिले आणि शानदार अर्धशतक झळकावले.

4/5
शिवम दुबेने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 42 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या या पहिल्या अर्धशतकात त्याने 8 चौकार लगावले. 152.38 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या तुफानी खेळीमुळे शिवम दुबेने चेन्नईच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली.

5/5
शिवम दुबेने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याच्या अर्धशतकी खेळीत 4 षटकार ठोकले. या 4 षटकारांमुळे त्याने आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत 7 फलंदाजांना मागे टाकले आहे. तो आता आयपीएल 2021 मध्ये ख्रिस गेल, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, निकोलस पूरन आणि हार्दिक पंड्या यांच्यापेक्षा जास्त षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI