AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाच्या 3 खेळाडूंना दुखापत, मँचेस्टरमध्ये शुबमनसेनेची वाईट स्थिती

Indian Cricket Team Injury : टीम इंडियाची मँचेस्टर कसोटीत वाईट स्थिती झाली आहे. त्यात आता खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. टीम इंडियाच्या 3 प्रमुख खेळाडूंना दुखापत झाली आहे.

Team India : टीम इंडियाच्या 3 खेळाडूंना दुखापत, मँचेस्टरमध्ये शुबमनसेनेची वाईट स्थिती
Shardul Thakur And Jasprit BumrahImage Credit source: PTI
| Updated on: Jul 26, 2025 | 1:34 AM
Share

टीम इंडिया इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मँचेस्टरमधील चौथा कसोटी सामना भारतासाठी मालिकेच्या दृष्टीने करो या मरो असा आहे. या अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाला संघर्ष करावा लागला आहे. मँचेस्टरमध्ये आधी भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारतीय फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र एकालाही मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर गोलंदाजांनाही विकेटसाठी संघर्ष करावा लागत आहे. आधीच अडचणीत असलेल्या भारतीय संघाची दुखापतीमुळे डोकेदुखी वाढली आहे. चौथ्या कसोटी सामन्यात आतापर्यंत 3 खेळाडूंना दुखापत झाली आहे.

पहिल्या दिवशी ऋषभ पंतला दुखापत

टीम इंडियाची मँचेस्टर कसोटी सामन्यातील सुरुवात ही दुखापतीने झाली. पहिल्या दिवसातील तिसऱ्या सत्रात उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याच्या पायाला दुखापत झाली. ख्रिस वोक्स याने टाकलेल्या चेंडूवर पंतने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पंतच्या पायाला दुखापत झाली. तपासणीनंतर पंतला फ्रॅक्चर झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र पंत रिटायर्ड हर्ट झाल्यानंतरही बॅटिंगसाठी आला. पंतने अर्धशतक झळकावलं. मात्र पंत विकेटकीपिंग करणार नसल्याचं स्पष्ट आहे.

बुमराहच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह

त्यानंतर तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे त्रास जाणवला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अडचणीत सापडला. बुमराह आधीच वर्कलोड मॅनेजमेंटमुळे चर्चेत होता. या सामन्यात ते जाणवलंही. इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराहच्या बॉलिंगमध्ये ती धार जाणवली नाही. टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी दुसरा नवा बॉल घेतला. बुमराह 1 ओव्हरनंतरच मैदानाबाहेर गेला. बुमराहला डाव्या घोट्यात वेदना जाणवत होती. मात्र बुमराह तिसऱ्या सत्रात बॉलिंगसाठी परतला. तेव्हाही बुमराहच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या.

मोहम्मद सिराजलाही त्रास

बुमराहनंतर टीम इंडियाच्या अडचणीत आणखी वाढ झाली. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही फिटनेसमुळे त्रास जाणवू लागला. दुसऱ्या सत्राच्या शेवटी सिराजने इंग्लंडच्या डावातील 99 वी ओव्हर टाकली. त्यानंतर सिराजला त्रास झाला. सिराजला चालताना त्रास जाणवू लागला. त्यामुळे सिराजला मैदानाबाहेर जावं लागलं. मात्र सिराज काही वेळानंतर मैदानात परतला. मात्र या घडल्या प्रकारामुळे सिराजच्या फिटनेसबाबतही भीती व्यक्त केली जात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.