viral video: पाकिस्तानच्या पराभवानंतर चाहत्यांचा ट्रेंड बदलला, टीव्हीऐवजी फाडले जाताय पासपोर्ट…
क्रिकेट विश्वात भारत पाकिस्तान सामना प्रत्येकवेळी खास असतो. बऱ्याच वेळेला खेळाडू असे काही करतात जे अगदी चर्चेचा विषय ठरतात. तर काही वेळा लोकांना चाहत्यांच्या मजेशीर कृती पाहण्याचा आनंद मिळतो, आणि ह्याच मजेशीर घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. या संदर्भात एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला त्यानंतर काही पाकिस्तानी त्यांचा पासपोर्ट फाडताना दिसत आहे.

क्रिकेट विश्वात भारत पाकिस्तान सामना प्रत्येकवेळी खास असतो. यात जेव्हा भारत आणि पाकिस्तान असा सामना रंगतो तेव्हा तो खेळ म्हणून कमी आणि भावनेने अधिक पाहायला जातो. हेच कारण आहे की जेव्हा जेव्हा आपला पाकिस्तानशी सामना असतो तेव्हा वातावरण थोडे अधिक गंभीर होते. तेव्हा अनेकांचा उत्साह हा फक्त स्टडीयममध्येच नाही तर त्याच्या बाहेरही बरोबरीने दिसून येतो. अशातच काहींचा उत्साह असा असतो जो मॅच संपल्यावर सुद्धा पाहायला मिळतो. त्यामध्ये टीम जिंकल्यावर चाहत्यांना अधिक आनंद होत असतो. तेवढाच टीमच्या पराभवानंतर चाहते टीमच्या नावाने नाराजगी देखील दर्शवतात.
असाच काहीसा प्रकार आपल्याला भारत- पाकिस्तानच्या सामान्य नंतर पाहायला मिळाला आहे. यात २३ फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानला ६ विकेट्सने हरवले होते. हे एका पाकिस्तानी चाहत्यांसाठी अत्यंत वेदनादायी ठरल्याने त्यांनी त्यांच्याच संघाबद्दल वाईट बोलायला सुरुवात केली. ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहेत. यामध्ये पाकिस्ताच्या चाहत्यांनी पराभव मान्य केल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे. आपला संघ सातत्याने भारताविरुद्ध पराभूत होताना पाहून त्यांनी भारताला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. याचेच उत्तम उदाहरण चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. हेच पाहून आपल्या भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये भरपूर मज्जा केली.
वाह विराट वाह ! आपसे अधिक विराट कोई नहीं 🔥
आप कभी भी न चलें मगर जब कोई अहम मैच होता है तब आप देश की उम्मीद बनकर आते हैं,
और लोगों की इस उम्मीद को ज़िंदा रखकर ख़ुद को बार बार प्रूफ भी करते हैं,
जब भी देश को ज़रूरत पड़ी तब तब आप क्रिकेट के मैदान पर जमकर खड़े हो गए और देश को खुश… pic.twitter.com/sqR60Kc2ff
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) February 23, 2025
पाकिस्तानी के फैन को हम लोगों ने भारत जर्सी पहना दिया ! #INDvsPAKlive #INDvsPAK #ViratKohli𓃵 #virat pic.twitter.com/Mx1w0Ymhy7
— ANSHUL YADAV (@Anshulydv02) February 24, 2025
दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा ५वा सामना खेळवण्यात आला. ज्यामध्ये टॉस जिंकल्यानंतर पाकिस्तान टीमचा कॅप्टन रिझवान याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु आपल्या भारतीय टीमच्या गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीने त्यांचा निर्णय चुकीचा ठरवला आणि त्यांचा संघ २४४ धावांवर रोखला गेला. जेव्हा टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानांत उतरली तेव्हा कोहली मैदानांवर टिकून राहिला आणि त्याने संघाला सामना जिंकून दिला आणि हे पाहून एका चाहत्याने आपली बाजू बदलली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी चाहता भारत विरुद्ध पाक सामन्यादरम्यान भारताची निळ्या रंगाची जर्सी परिधान करताना दिसत आहे. यात व्हिडीओ बनवणारी व्यक्ती त्या पाकिस्तानी चाहत्याला म्हणताना दिसत आहे, ‘ टीम चेंजिंग बॉय… पाकिस्ताच्या व्यक्तीने भारताची जर्सी परिधान केली आहे.’ यानंतर तिथे उपस्थित असलेले सर्व भारतीय चाहते त्याला पाठिंबा देताना दिसले आहे.
पाकिस्तान जब मैच हार गया था तब पाकिस्तान की मीडिया में क्या कुछ चल रहा था, देखो तो 🔥 pic.twitter.com/hXzd1PmeBH
— Prem singh meena (@TATUPREM5555) February 24, 2025
कोहलीच्या एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओही इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या पाकिस्तानी माणसाने टी-शर्टवर कोहलीचे नाव विराट लिहिले आहे, तर पाकिस्तानी माध्यमांमधील क्रिकेट तज्ञ आणि अँकर ‘दिल के अरमान आंसू में बेह गये हम वफा कर के भी तन्हा रह गये’ अशी गाणी गात आहेत. याशिवाय, असे अनेक लोक आहेत जे त्यांचे पासपोर्ट फाडताना दिसतात. या सर्वांव्यतिरिक्त पाकिस्तानच्या पराभवानंतर असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत ज्यात चाहते टीव्ही तोडत नसून आता तर त्यांचे पासपोर्ट फाडत आहेत. हे पाहून भारतातील लोक म्हणत आहेत की आता पाकिस्तानमध्ये ट्रेंड आलेला आहे.
—————————————————————————————————————-
—————————————————————————————————————–
——————————————————————————————————————
