टीम इंडियावर मँचेस्टर कसोटी पराभवाचं सावट, पण गौतम गंभीर खूश; कारण…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये सुरु आहे. पण या सामन्यात भारताची स्थिती नाजूक असून पराभवाच्या सावटाखाली आहे. असं असताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या सावटाखाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 544 धावांचा खेळ केला. यासह इंग्लंडकडे 186 धावांची आघाडी आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात यात आणखी भर घालून टीम इंडियाला गुंडाळण्याचा प्रयत्न असणार आहे. खरं तर भारताची फलंदाजीला इतकी काही खोली नाही. सुरुवातीचे पाच फलंदाज बाद झाले की अर्धा सामना तिथेच संपतो. त्यामुळे शेपटच्या फलंदाजांकडून अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. हा सामना ड्रॉ करायचा असेल तर भारतीय संघाला दोन दिवस फलंदाजी करावी लागेल. असं असताना गौतम गंभीरसाठी आजचा दिवस खास आहे. 26 जुलै हा गौतम गंभीरसाठी वैयक्तिक आयुष्यातील मोठा दिवस आहे. कारण आज त्याची पत्नी नताशा जैन हीचा वाढदिवस आहे. यासाठी गौतम गंभीर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने पत्नी नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गौतम गंभीरने पत्नी नताशा जैनसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा नताशा.. तू माझ्या आयुष्याला अर्थ देतेस.’ गौतम गंभीर आणि नताशा यांनी 28 ऑक्टोबर 2011 रोजी लग्न केले. नताशा एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे. लग्नापूर्वी दोघेही चांगले मित्र होते. त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघंही लग्नबंधनात अडकले. नताशा जैन सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. तसेच कायम गंभीरसोबत फोटो शेअर करत असते. या जोडप्याला दोन मुली आहेत. एकाचं नाव अजीन आणि एकाचं नावा अनाइजा आहे.
View this post on Instagram
इंग्लंडने तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर डाव काही घोषित केलेला नाही. पण चौथ्या दिवशीच्या सुरुवातीला असं काही केलं तर भारताला सकारात्मक सुरुवात करणं भाग आहे. मोठी भागीदारी केली तर इंग्लंडचं विजयाचं स्वप्न भंगू शकते. पण आतापर्यंत भारताचा कसोटी इतिहास पाहता जेव्हा कधी पहिल्या डावात 150 हून अधिक धावांची आघाडी समोर आली तेव्हा कामगिरी काही खास राहिली नाही. अशा स्थितीत 127 सामन्यांपैकी फक्त 2 सामने जिंकू शकले आहेत.
