IND vs IRE : आयर्लंड की टीम इंडिया? एकमेकांविरुद्ध वरचढ कोण? आकडे काय सांगतात?
India vs Ireland Head To Head Records: टीम इंडिया आणि आयर्लंड दोन्ही संघ 5 जून रोजी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. उभयसंघातील आकडेवारी कशी राहिली आहे? जाणून घ्या.

सराव सामन्यात बांगलादेश विरुद्ध विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी सज्ज आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पहिल्या सामन्यासाठी तयार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा आयर्लंड विरुद्ध होणार आहे. टीम इंडिया आयर्लंड यांच्यात 5 जून रोजी हा सामना होणार आहे. पॉल स्टर्लिंग याच्या कॅप्टन्सीत आयर्लंड टीम इंडिया विरुद्ध 2 हात करणार आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघातील आकडेवारी जाणून घेऊयात.
आकडे काय सांगतात?
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड आतापर्यंत एकूण 7 टी 20 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. त्या सातही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा बोलबाला राहिला आहे. टीम इंडियाने 7 पैकी सर्वच सामने जिंकले आहेत. आयर्लंडला एकदाही टीम इंडिया विरुद्ध जिंकता आलेला नाही. टीम इंडियाने 2023 मध्ये आयर्लंड दौरा केला होता. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात 2-0 ने आयर्लंडला पराभूत केलं होतं. तसेच दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 वर्षांनंतर आमनेसामने असणार आहे. टीम इंडियाने आयर्लंडचा 2009 साली टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभव केला होता.
टीम इंडिया जरा जपूण
टीम इंडियाचे आयर्लंड विरुद्धचे आकडे पाहता चिंता करण्याची बाब नाही. मात्र आयर्लंडला हलक्यात घेऊन चालणार नाही. कारण आयर्लंड उलटफेर करण्यात माहिर आहे. कारण 2 म्हणजे याच आयर्लंडने पाकिस्तानला 2007 मध्ये पराभूत करत वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. तसेच नुकतंच आयर्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात 3 टी 20 सामन्यांची मालिका झाली. आयर्लंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकून पाकिस्तानला धोबीपछाड दिला होता. त्यामुळे टीम इंडियाला आयर्लंड विरुद्ध तगडी टक्कर मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबिर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोशुआ लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
