ICC T20 Rankings: श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा पहिल्या स्थानावर कायम, ‘टॉप 10’ मध्ये एकही भारतीय नाही

यंदाच्या टी20 विश्वचषकातील सामन्यांमुळे आयसीसी टी20 रँकिगमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यानुसार गोलंदाजांची रँकिंगही समोर आली असून श्रीलंकेच्या हसारंगाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

1/5
आयसीसीने बुधवारी यंदाची टी20 रँकिंग जाहीर केली. ज्यानुसार फलंदाजीमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम अव्वलस्थानी असून गोलंदाजीमध्ये श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाने पहिलं स्थान पटकावलं आहे. विश्वचषकातील कामगिरीचा वानिंदूला फायदा झाला आहे.

2/5
टी20 वर्ल्ड कपच्या 8 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. हसरंगाने या कामगिरीमुळेच त्याचं पहिलं स्थान अबाधित ठेवलं आहे. त्याच्या खात्यात 797 गुण आहेत. त्याच्या पाठी दक्षिण आफ्रीकेचा तबरेज शम्सी 784 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा आदिल रशीद असून त्याच्या खात्यात 727 गुण आहेत.

3/5
ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचवण्यात महत्तावाची भूमिका निभावणारा अॅडम जम्पा आणि जोश हेजलवुड यांनाही रँकिंगमध्ये चांगला फायदा झाला आहे. झाम्पा पाचव्या तर तर हेजलवुड आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

4/5
न्यूझीलंडचा टिम साउदी मागील रँकिंगमध्ये 12 व्या क्रमाकांवर होता. पण तो  तीन स्थानाच्या उडीसह नवव्या स्थानावर पोहोचला आहे.

5/5
टॉप 10 मध्ये एकही भारतीय नसून भारताचा नंबर 1 गोलंदाज जसप्रीत बुमराह 15 व्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 586 गुण आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI