IND vs PAK : नाही म्हणजे नाही; कॅप्टन सूर्याचा फायनलआधी स्पष्ट नकार, पाकिस्तानचा पुन्हा पोपट
India vs Pakistan Final Asia Cup 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नक्की काय निर्णय घेतला? जाणून घ्या.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या या दहशतवादी हल्ल्यात 20 पेक्षा अधिक निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतीयांच्या भावना तीव्र आहेत.त्यामुळे कोणत्याच स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशी भारतीयांची भावना आहे. भारतीयांकडून आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या 2 सामन्यांना तीव्र विरोध करण्यात आला. मात्र या तीव्र विरोधानंतरही साखळी आणि सुपर 4 फेरीत 2 शेजारी देशाचे क्रिकेट संघ आमनेसामने आले होते. भारताने या दोन्ही सामन्यांत विजय मिळवला.
भारतीय खेळाडूंनी या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंसह हस्तांदोलनही केलं नाही. खेळाडूंनी आपण देशवासियांसह आहोत, हे दाखवून दिलं. मात्र त्यानंतरही देशवासियांचा पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास विरोध कायम आहे. हा तीव्र विरोध कायम असताना आता साखळी, सुपर 4 नंतर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. हा सामना रविवारी 28 सप्टेंबरला दुबईत होणार आहे. भारताने याआधी दोन्ही सामन्यात हस्तांदोलन न करुन पाकिस्तानला जगासमोर तोंडावर पाडलं. त्यानंतर आता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडलं आहे. तसेच सूर्याने आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं या कृतीतून दाखवून दिलं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघाली आहे. नक्की काय झालं हे सविस्तर जाणून घेऊयात.
कॅप्टन सूर्याचा फोटोशूटसाठी नकार
कॅप्टन सूर्यकुमार यादव याने अंतिम सामन्याआधी पाकिस्तान कॅप्टनसह फोटोशूटसाठी स्पष्ट नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. कोणत्याही स्पर्धेत अंतिम सामन्याआधी दोन्ही संघांचे कर्णधारांचं ट्रॉफीसह फोटोशूट केलं जातं. मात्र टीम इंडियाने पाकिस्तान विरूद्ध आपली भूमिका कायम ठेवत फोटोशूट करण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेला ब्रेक लागला आहे.
हस्तांदोलनास स्पष्ट नकार
दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध साखळी फेरीत 14 आणि सुपर 4 मध्ये 21 सप्टेंबरला पाकिस्तानवर मात केली. भारताने दोन्ही सामन्यांमध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी विजयानंतर हस्तांदोलन न करता थेट ड्रेसिंग रुमचा रस्ता धरला होता. त्यामुळे हस्तांदोलनच्या प्रतिक्षेत असलेल्या पाकिस्तानचा जगासमोर पोपट झाला होता. अपमानामुळे चिडलेल्या पाकिस्तानने यावरुन आक्षेप घेतला होता. मात्र पाकिस्तानला अपेक्षित तसं काहीच झालं नाही.
