India vs South Africa, 2nd Odi Score and Updates : दक्षिण आफ्रिकेचा 4 विकेट्सने विजय, टीम इंडियाचा 358 धावा करुनही पराभव
India vs South Africa, 2nd ODI Cricket Score and Updates Highlights In Marathi : दक्षिण आफ्रिकेने या मालिकेतील पहिला सामना गमावला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी दुसरा सामना हा करो या मरो असा होता. दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये ऐतिहासिक 359 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी केली.

भारताला बुधवारी रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत व्हावं लागलं. धक्कादायक म्हणजे टीम इंडियाला 358 रन्स करुनही पराभवाची चव चाखावी लागली. टीम इंडियाने ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर 358 रन्स केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने प्रत्युत्तरात 49.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 6 डिसेंबरला होणार आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs SA 2nd Odi Live Score : दक्षिण आफ्रिकेचा 4 विकेट्सने विजय, टीम इंडियाचा 358 धावा करुनही पराभव
दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 359 धावांचा यशस्वी पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : दक्षिण आफ्रिका विजयाच्या दिशेने, 12 बॉलमध्ये 8 रन्सची गरज
दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित झाला आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 12 बॉलमध्ये फक्त 8 धावांची गरज आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
-
-
IND vs SA 2nd Odi Live Score : मार्को यान्सेन स्वस्तात आऊट, दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका, सामना रगंतदार स्थितीत
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका दिला आहे. अर्शदीप सिंह याने यान्सेन याला 2 रन्सवर ऋतुराज गायकवाड याच्या हाती कॅच आऊट केलं आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : मॅथ्यू ब्रिट्झके आऊट, दक्षिण आफ्रिकेला पाचवा झटका, सामना रंगतदार स्थितीत
प्रसिध कृष्णा याने निर्णायक क्षणी सेट बॅट्समन मॅथ्यू ब्रिट्झके याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. मॅथ्यूने 64 बॉलमध्ये 68 रन्स केल्या. प्रसिधची ही दुसरी विकेट ठरली. प्रसिधने त्याआधी कॅप्टन टेम्बा बवुमा याला आऊट केलं.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : हुश्श, कुलदीपने सेट जोडी फोडली, डेवाल्ड ब्रेव्हिस आऊट
कुलदीप यादव याने अखेर मॅथ्यू ब्रिट्झके आणि डेवाल्ड ब्रेव्हीस ही घातक आणि सेट जोडी फोडली आहे. कुलदीपने डेवाल्डला यशस्वी जैस्वाल याच्या हाती कॅच आऊट केलं. डेवाल्डने 54 रन्स केल्या. डेवाल्ड आणि मॅथ्यू या जोडीने 63 बॉलमध्ये 92 रन्सची पार्टनरशीप केली.
-
-
IND vs SA 2nd Odi Live Score : मॅथ्यू ब्रिट्झके-डेवाल्ड ब्रेव्हिसची फटकेबाजी, टीम इंडियाची सुमार बॉलिंग
मॅथ्यू ब्रिट्झके आणि डेवाल्ड ब्रेव्हिस हे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज दोन्ही बाजूने फटकेबाजी करत आहेत. या दोघांनी मोठे फटके मारुन दक्षिण आफ्रिकेला सामन्यात कायम ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेने 350 रन्सचा पाठलाग करताना 40 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 282 धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये आणखी 77 धावांची गरज आहे. भारताला हा सामना जिंकायचा असेल तर कोणत्याही स्थितीत आधी ही सेट जोडी फोडावी लागणार आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : टीम इंडिया विकेटच्या शोधात, सामना निर्णायक वळणावर
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना निर्णायक वळणावर आहे. दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचा पाठलाग करताना 36 ओव्हरमध्ये 3 विके्टस गमावून 237 धावा केल्या आहेत. डेवाल्ड ब्रेव्हीस 20 आणि मॅथ्यू ब्रीट्झके 40 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : हर्षित राणाकडून मोठी शिकार, शतकवीर एडन मार्रक्रम आऊट
हर्षित राणा याने दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका दिला आहे. हर्षितने दक्षिण आफ्रिकेचा सेट बॅट्समन एडन मार्रक्रम याला ऋतुराज गायकवाड याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. मार्रक्रम याने 98 बॉलमध्ये 110 रन्स केल्या.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : एडन मार्रक्रमचं कडक शतक, टीम इंडिया विकेटच्या शोधात
दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एडन मार्रक्रम याने 359 धावांचा पाठलाग करताना शतक केलं आहे. एडनने 89 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. एडन रायपूरमधील या सामन्यात शतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला तर एकूण तिसरा फलंदाज ठरला. एडनआधी ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या दोघांनीही शतक झळकावलं आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका, कॅप्टन टेम्बा बवुमा आऊट
प्रसिध कृष्णा याने टीम इंडियाला दुसरी विकेट मिळवून देत दक्षिण आफ्रिकेची सेट जोडी फोडली आहे. प्रसिधने दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बवुमा याला हर्षित राणा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. टेम्बाने 46 रन्स केल्या. टेम्बा आणि एडनने दुसऱ्या विकेटसाठी 101 रन्सची पार्टनरशीप केली.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : यशस्वीने मोठी संधी गमावली, एडन मारक्रमला जीवनदान
यशस्वी जैस्वाल याने सीमारेषेवर मोठी संधी गमावली आहे. कुलदीप यादव याने टाकलेल्या 18 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मोठा फटका मारला. एडनने मारलेला फटका यशस्वीच्या दिशेने गेला. मात्र यशस्वीने बाउंड्रीवर सोपा कॅच सोडला. त्यामुळे एडनला 53 धावांवर जीवनदान मिळालं. तसेच यशस्वीने कॅच सोडल्याने 6 धावाही मिळाल्या.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : मार्रक्रम-टेम्बा बवुमा जोडी जमली, टीम इंडिया दुसऱ्या विकेटच्या शोधात
दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक याच्या रुपात पहिली विकेट झटपट गमावली. त्यानंतर एडन मार्रक्रम आणि कॅप्टन टेम्बा बावुमा ही जोडी जमली आहे. दक्षिण आफ्रिकेने 11 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 56 धावा केल्या आहेत.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : भारताला पहिलं यश, क्विंटन डी कॉक आऊट, अर्शदीप सिंहकडून शिकार
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका दिला आहे. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी टी 20i बॉलर अर्शदीप सिंह याने क्विंटन डी कॉक याला वॉशिंग्टन सुंदर याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. क्विंटन डी कॉकने 11 बॉलमध्ये 8 रन्स केल्या.
-
पुणे : मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी शीतल तेजवानी यांना अटक
पुणे पोलिसांनी मुंढवा येथील कोट्यवधी रुपयांच्या जमीन अनियमितता प्रकरणातील सूत्रधार शीतल तेजवानी हिला अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी शीतल तेजवानी हिची दोनदा चौकशी केली होती. चौकशीदरम्यान उघड झालेल्या तथ्यांवरून तिचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध झाले, ज्यामुळे तिला अटक करण्यात आली.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात, मार्रक्रम-क्वींटन डी कॉक मैदानात
दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्रक्रम आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या नवी जर्सीचं अनावरण
रायपूरमध्ये टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील पहिला डाव आटोपला आहे.या दरम्यान आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या हस्ते या जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : भारताची चाबूक बॅटिंग, दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं आव्हान
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर दुसऱ्या एकदकिवसीय सामन्यात 359 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 358 धावा केल्या. टीम इंडियासाठी ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या दोघांनी शतक झळकावलं. तर अखेरच्या क्षणी कॅप्टन केएल राहुल याने अर्धशतक झळकावलं. त्यामुळे भारताला 350 पार मजल मारता आली.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : केएल राहुलचं निर्णायक अर्धशतक, टीम इंडिया 350 च्या दिशेने
टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. केएलने 33 बॉलमध्ये फोर ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. केएलचं एकदिवसीय कारकीर्दीतील 20 वं अर्धशतक ठरलं.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : वॉशिंग्टन सुंदर रनआऊट, टीम इंडियाला पाचवा झटका
टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला. वॉशिंग्टन सुंदर याने 8 बॉलमध्ये 1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : विराट शतकी खेळीनंतर आऊट, टीम इंडियाला चौथा झटका
विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड ही टीम इंडियाची सेट जोडी आऊट झाली आहे. ऋतुराज गायकवाड याच्यानंतर विराट कोहली याने शतक झळकावलं. मात्र ऋतुराजप्रमाणे विराट कोहली हा देखील शतकानंतर आऊट झाला. विराटने 102 रन्स केल्या.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : विराटचा धमाका, कोहलीचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक
विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग दुसरं शतक झळकावलं आहे. विराटने 90 बॉलमध्ये सलग दुसरं शतक पूर्ण केलं. विराटच्या एकदिदीवसीय कारकीर्दीतील हे 53 वं शतक ठरलं.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : टीम इंडियाला तिसरा झटका, ऋतुराज गायकवाड आऊट
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. मार्को यान्सेन याने टीम इंडियाची सेट जोडी फोडत भारताला तिसरा धक्का दिलाय. मार्को यान्सेन याने 36 व्या ओव्हरमध्ये ऋतुराज गायकवाड याला टॉनी डी झॉर्जी याच्या हाती कॅच आऊट केलं. ऋतुराजने 105 रन्स केल्या.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : ऋतुराज गायकवाडचं अप्रतिम शतक, टीम इंडिया मोठया धावसंख्येच्या दिशेने
ऋतुराज गायकवाड याने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं आहे. ऋतुराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूरमध्ये ही कामगिरी केली आहे. ऋतुराजने अवघ्या 77 बॉलमध्ये 100 रन्स पूर्ण केल्या.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : ऋतुराज-विराटची फटकेबाजी, टीम इंडिया 200 पार
टीम इंडियाने 30 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 207 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड 87 आणि विराट कोहली 64 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : ऋतुराज-विराटचं अर्धशतक पूर्ण, टीम इंडिया 150 पार
ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या सेट जोडीने अर्धशतक पूर्ण केलं आहे. ऋतुराजने 52 तर विराटने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : विराट-ऋतुराज अर्धशतकाच्या दिशेने, टीम इंडिया चांगल्या स्थितीत
टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून — धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. विराट 34 आणि ऋतुराज 38 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण, विराट-ऋतुराज जोडी जमली
टीम इंडियाने 15.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावूून 100 धावा पूर्ण केल्या आहेत. तसेच विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड जोडी जमली आहे. ऋतुराज 31 आणि विराट 21 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : रोहितनंतर यशस्वी जैस्वालही आऊट, टीम इंडियाची सलामी जोडी माघारी
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला दुसरा झटका दिला आहे. रोहित शर्मा याच्यानंतर यशस्वी जैस्वाल आऊट झाला आहे. मार्को यान्सेन याने यशस्वीला आऊट केलं. यशस्वीने 38 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.
-
IND vs SA 2nd Odi Live Score : भारताला पहिला झटका, रोहित शर्मा आऊट
टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. नांद्रे बर्गर याने रोहितला विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्या हाती कॅच आऊट केलं. नांद्रे बर्गर याला रोहितच्या बॅटला बॉलने स्पर्श केल्याचं समजलंही नाही. मात्र डी कॉक याने अपील केली. त्यानंतर कॅप्टन टेम्बा बवुमा याने रीव्हीव्यू घेतला. या रिव्हीव्यूमध्ये रोहितच्या बॅटला बॉल लागल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे रोहितला मैदानाबाहेर जावं लागलं. रोहितने 14 धावा केल्या.
-
IND vs SA 2nd Odi Live Updates : टीम इंडियाची संयमी सुरुवात, रोहित-यशस्वी सलामी जोडी मैदानात
यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला संयमी सुरुवात करुन दिली आहे. या ओपनिंग जोडीने 4 ओव्हरमध्ये पहिल्या विकेटसाठी नाबाद 29 धावा जोडल्या आहेत. यशस्वी 13 तर रोहित 2 धावांवर नाबाद खेळत आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Updates : सामन्याला सुरुवात, टीम इंडियाची बॅटिंग, रोहित-यशस्वी मैदानात
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला नाणेफेक जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Updates : दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन
क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), एडन मार्कराम, टेम्बा बवुमा(कर्णधार), मॅथ्यू ब्रीट्झके, टॉनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी
-
IND vs SA 2nd Odi Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि प्रसीध कृष्णा.
-
IND vs SA 2nd Odi Live Updates : दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, टीम इंडिया विरुद्ध निर्णय काय?
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन टेम्बा बावुमा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाला बॅटिंग करावी लागणार आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Updates : थोड्याच मिनिटांत टॉस, कोण जिंकणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात थोड्याच मिनिटांत टॉस होणार आहे. दुपारी 1 वाजता टॉस होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुुरवात होणार आहे.
-
IND vs SA 2nd Odi Live Updates : एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ
एडन मार्रक्रम, रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, प्रिनेलन सुब्रेन, नांद्रे बर्गर, ओटनील बार्टमन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी आणि रुबिन हरमन.
-
IND vs SA 2nd Odi Live Updates : वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा.
-
IND vs SA 2nd Odi Live Updates : टीम इंडिया सलग दुसऱ्या सामन्यासह मालिका विजयासाठी सज्ज
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 30 नोव्हेंबरला झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. भारताने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे भारताकडे रायपूरमध्ये दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
Published On - Dec 03,2025 12:51 PM
