AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Points Table : आयपीएलमध्ये कोणत्या संघाची आगेकूच, तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी, जाणून घ्या

काल आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील लखनौ आणि बंगलोरचा सामना झाला. यामध्ये बंगलोरचा लखनौवर रॉयल विजय झाला. यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत काय बदल झालाय पाहुया...

IPL 2022 Points Table : आयपीएलमध्ये कोणत्या संघाची आगेकूच, तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानी, जाणून घ्या
गुजरात टिटन्स आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानीImage Credit source: IPL
| Updated on: Apr 20, 2022 | 8:40 AM
Share

मुंबई : काल आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील लखनौ आणि बंगलोरचा सामना झाला. यामध्ये बंगलोरचा (RCB) लखनौवर रॉयल विजय झाला. त्यानंतर  आरसीबीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे. RCB ने लखनौला (LSG) 18 धावांनी हरवलं. आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसी आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने विजयात महत्त्वची भूमिका बजावली. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) खराब फॉर्म कायम आहे. आयपीएलचा हा 15 वा सीजन आहे. या सीजनमध्ये अजूनही विराटकडून अपेक्षित कामगिरी होऊ शकलेली नाही. विराटचा धावांसाठी संघर्ष सुरुच आहे. विराट कोहली काल पुन्हा अपयशी ठरला. महत्त्वाचं म्हणजे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत तो चौथ्यांदा गोल्डन डकवर आऊट झाला. श्रीलंकेच्या दुष्मंथा चमीराने त्याला पहिल्या चेंडूवर बाद केलं. चमीराने त्याला हुड्डा करवी झेलबाद केलं. कालच्या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झालाय का?, पाहुया

पॉईंट्स टेबलमध्ये कोणता संघ अव्वल?

आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरात पहिल्या स्थानी आहे. गुजरातने सहापैकी पाच सामने जिंकले आहे. तर एक सामना हरला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी आरसीबी आहे. आरसीबीने सातपैकी पाच सामने जिंकले आहे. तर दोन सामन्यात त्यांना अपयश आलंय. तिसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थानने सहापैकी चार सामने जिंकले आहे. दोन सामन्यात राजस्थानला अपयश आलंय. चौथ्या स्थानी लखनौ आहे. लखनौने सातपैकी चार सामने जिंकले असून तीन सामन्यात त्यांना अपयश आलंय. पाचव्या स्थानी हैदराबाद आहे. या संघाने सहापैकी चार सामने जिंकले आहे. तर दोन सामन्यात या संघाला अपयश आलंय.

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

थोडक्यात हुकली डु प्लेसिसची सेंच्युरी

काल लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात डु प्लेसीच्या खेळातून त्याची झलक दिसून आली. डु प्लेसीच शतक थोडक्यात हुकलं. पण त्याने IPL मधली सर्वोच्च खेळी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये डु प्लेसी आऊट झाला. पण तो पर्यंत त्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (टीमला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मार्कस स्टॉयनिसने सीमारेषेवर त्याचा झेल घेतला. या सामन्यात टॉस जिंकून लखनौचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. डु प्लेसीने आज कठीण परिस्थितीत त्याचा सर्वोत्तम खेळ दाखवला. आरसीबीचे टॉपचे चार फलंदाज 62 धावात तंबूत परतले होते. त्यांचा डाव अडचणीत होता. अशा परिस्थितीत डु प्लेसीने डाव सावरलाच पण संघाला एक भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवलं.

इतर बातम्या

Hair care : उन्हाळ्यात डोके थंड ठेवण्यासाठी या तेलांचा वापर करा आणि सोबतच सुंदर केस मिळवा!

Record food production : चालू आर्थिक वर्षात विक्रमी धान्य उत्पादनाचे लक्ष्य; पावसाने साथ दिल्यास 32.8 कोटी टन धान्य निर्मितीचा अंदाज

कोण म्हणते सरकारने रोजगार दिला नाही ? तब्बल 8.25 लाखांहून अधिक रोजगार उपलब्ध करुन दिल्याचा केंद्राचा दावा

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.