IPL 2022 Retention, Live Updates : MI, CSK, KKR, DC कडून 4 खेळाडू रिटेन, RCB, RR SRH चे 3 खेळाडू संघात कायम, PBKS चा राहुलला रामराम

| Updated on: Nov 30, 2021 | 11:07 PM

IPL 2022 Retention, Live Updates : आयपीएल 2022 मध्ये कोणते संघ कोणकोणते खेळाडू संघात कायम ठेवणार याची लवकरच घोषणा होणार आहे. रात्री 9.30 वाजल्यापासून लाईव्ह शोमध्ये प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्यासोबत राहणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर करणार आहे.

IPL 2022 Retention, Live Updates : MI, CSK, KKR, DC कडून 4 खेळाडू रिटेन, RCB, RR SRH चे 3 खेळाडू संघात कायम, PBKS चा राहुलला रामराम
IPL 2022

आयपीएल 2022 मध्ये खेळाडूंचे रिटेनशन पार पडले आहे. चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जाडेजा, एमएस धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड या चार खेळाडूंना संघात कायम ठेवले. विशेष म्हणजे धोनीपेक्षा जाडेजाला जास्त पैसे मिळणार आहेत. जडेजाला 16 कोटी रुपये मिळतील. चेन्नईने धोनीला 12 कोटी, मोईन अली 8 कोटी आणि ऋतुराज गायकवाडला 6 कोटींमध्ये रिटेन केलं आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन करत विराट कोहलीपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. रोहितला या सीझनसाठी तब्बल 16 कोटी मिळाले आहेत. मात्र विराट कोहलीला आरसीबीकडून 15 कोटी रुपयात रिटेन करण्यात आलं आहे. मुंबईकडून दुसरा खेळाडू जसप्रीत बुमराह रिटेन करण्यात आला आहे. त्याला यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळाले आहेत. तर तिसरा खेळाडू सुर्यकुमार यादवचं 8 कोटी रुपयात रिटेंन्शन करण्यात आलं आहे. मुंबईने कायरन पोलार्डचंही 6 कोटी रुपये देऊन रिटेन्शन केलं आहे.

Key Events

जाडेजाला धोनीपेक्षा जास्त, रोहितला विराटपेक्षा जास्त पैसे

रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनीला मिळालेली रक्कम चाहत्यांना विचार करायला भाग पाडणारी आहे. कारण यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी रवींद्र जडेजाला धोनीपेक्षा जास्त म्हणजे एकूण तब्बल 16 कोटी मिळणार आहेत तर महेंद्रसिंह धोनीला यंदाचं आयपीएल खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन करत विराट कोहलीपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. रोहितला या सीझनसाठी तब्बल 16 कोटी मिळाले आहेत. मात्र विराट कोहलीला आरसीबीकडून 15 कोटी रुपयात रिटेन करण्यात आलं आहे.

दोन नवीन फ्रेंचायझी संघांसाठी काय नियम असतील

लखनौ आणि अहमदाबादचे संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहेत. 1 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान मेगा ऑक्शनपूर्वी, या दोन फ्रेंचायझी संघांना लिलावात येणारे पहिले तीन खेळाडू निवडण्याचा पर्याय असेल. या यादीत दोनपेक्षा जास्त भारतीय खेळाडू घेता येणार नाहीत. तसेच केवळ एकच परदेश खेळाडू या पद्धतीने संघात घेता येईल.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 30 Nov 2021 10:31 PM (IST)

    नवीन संघ आपले बेस्ट खेळाडू कधी निवडणार?

    अहमदाबाद आणि लखनौचे संघ केवळ 3-3 खेळाडू निवडू शकतात. या तीन खेळाडूंमध्ये दोनपेक्षा जास्त भारतीय असू शकत नाहीत किंवा एकाहून अधिक परदेशी खेळाडू असू शकत नाहीत. तसेच, नवीन संघांद्वारे एक अनकॅप्ड खेळाडू निवडला जाऊ शकतो. रिटेनशन संपल्यानंतर, नवीन संघ त्यांचे 3 सर्वोत्तम खेळाडू निवडू शकतील.

  • 30 Nov 2021 10:27 PM (IST)

    RR IPL 2022 Confirmed Retained players list: राजस्थान रॉयल्सने 3 खेळाडू रिटेन केले.

    संजू सॅमसन – 14 कोटी

    जॉस बटलर – 10 कोटी

    यशस्वी जयस्वाल – 4 कोटी

  • 30 Nov 2021 10:19 PM (IST)

    KKR IPL 2022 Confirmed Retained players list: कोलकाताने 4 खेळाडू रिटेन केले.

    पहिला खेळाडू - आंद्रे रसेल, 12 कोटी रुपये

    दुसरा खेळाडू – वरुण चक्रवर्ती, 8 कोटी रुपये

    तिसरा खेळाडू- व्यंकटेश अय्यर, 8 कोटी रुपये

    चौथा खेळाडू- सुनील नरेन, 6 कोटी रुपये

  • 30 Nov 2021 10:12 PM (IST)

    DC IPL 2022 Confirmed Retained players list: दिल्लीने 4 खेळाडू रिटेन केले.

    पहिला खेळाडू - ऋषभ पंत, 16 कोटी रुपये

    दुसरा खेळाडू- अक्षर पटेल, 9 कोटी रुपये

    तिसरा खेळाडू - पृथ्वी शॉ, 7.5 कोटी रुपये

    चौथा खेळाडू- एनरिक नॉर्खिया, 6.5 कोटी रुपये

  • 30 Nov 2021 10:08 PM (IST)

    CSK IPL 2022 Confirmed Retained players list: चेन्नईने 4 खेळाडू रिटेन केले

    पहिला खेळाडू - रवींद्र जाडेजा, 16 कोटी रुपये

    दुसरा खेळाडू - एमएस धोनी, 12 कोटी रुपये

    तिसरा खेळाडू - मोईन अली, 8 कोटी रुपये

    चौथा खेळाडू - ऋतुराज गायकवाड, 6 कोटी रुपये

  • 30 Nov 2021 10:01 PM (IST)

    SRH IPL 2022 Confirmed Retained players list: हैदराबादने 3 खेळाडू रिटेन केले.

    पहिला खेळाडू- केन विल्यमसन, 24 कोटी रुपये

    दुसरा खेळाडू - अब्दुल समद - 4 कोटी रुपये

    तिसरा खेळाडू - उमरान मलिक- 4 कोटी रुपये

  • 30 Nov 2021 09:53 PM (IST)

    PBKS IPL 2022 Confirmed Retained players list: पंजाब किंग्सने 2 खेळाडू रिटेन केले.

    मयंक अग्रवाल - 14 कोटी रुपये

    अर्शदीप सिंह - 4 कोटी रुपये

  • 30 Nov 2021 09:52 PM (IST)

    रिटेन न झाल्याने के. एल. राहुलला फायदा होणार का?

    काही रिपोर्ट्सनुसार के. एल. राहुलला पंजाब किंग्सने रिटेन केलं नाही तर त्याला मोठा फायदा होऊ शकतो. कारण लखनौ फ्रेंचायझी राहुलवर 20 कोटी रुपये खर्च करुन आपल्या ताफ्यात घेऊ शकते.

  • 30 Nov 2021 09:50 PM (IST)

    मुंबईच्या पर्समध्ये 48 कोटी बाकी

    मुंबई इंडियन्सने सर्व 4 खेळाडू रिटेन केल्यामुळे मुंबई इंडियन्स आगामी मेगा ऑक्शनमध्ये पर्समध्ये 48 कोटी रुपये घेऊन उतरणार आहे.

  • 30 Nov 2021 09:47 PM (IST)

    RCB IPL 2022 Confirmed Retained players list : मुंबई इंडियन्सने 4 खेळाडू रिटेन केलं.

    पहिला खेळाडू - रोहित शर्मा, 16 कोटी रुपये.

    दुसरा खेळाडू - जसप्रीत बुमराह, 12 कोटी रुपये.

    तिसरा खेळाडू - सूर्यकुमार यादव, 8 कोटी रुपये.

    चौथा खेळाडू - कायरन पोलार्ड, 6 कोटी रुपये

  • 30 Nov 2021 09:41 PM (IST)

    RCB IPL 2022 Confirmed Retained players list : बँगलोरने तीन खेळाडूंना रिटेन केलं

    पहिला खेळाडू- विराट कोहली, 15 कोटी रुपये.

    दुसरा खेळाडू- ग्लेन मॅक्सवेल याला 11 कोटी रुपये.

    तिसरा खेळाडू - मोहम्मद सिराजला 7 कोटी रुपये मिळतील.

  • 30 Nov 2021 09:39 PM (IST)

    पंजाब किंग्सच्या पर्समध्ये सर्वात जास्त पैसे

    सनरायझर्स हैदराबाद : 3 खेळाडू रिटेन, पर्समध्ये 68 कोटी बाकी

    रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : 3 खेळाडू रिटेन, पर्समध्ये 57 कोटी बाकी

    राजस्थान रॉयल्स : 3 खेळाडू रिटेन, पर्समध्ये 62 कोटी बाकी

    पंजाब किंग्स : 2 खेळाडू रिटेन, पर्समध्ये 72 कोटी बाकी

  • 30 Nov 2021 09:36 PM (IST)

    रिटेन्शननंतर कोणत्या संघाकडे किती पैसे

    चेन्नई सुपरकिंग्स - सर्व 4 खेळाडू रिटेन, मेगा ऑक्शनसाठी पर्समध्ये 48 कोटी बाकी

    कोलकाता नाइट रायडर्स - सर्व 4 खेळाडू रिटेन, मेगा ऑक्शनसाठी पर्समध्ये 48 कोटी बाकी

    दिल्ली कॅपिटल्स - सर्व 4 खेळाडू रिटेन, मेगा ऑक्शनसाठी पर्समध्ये 48 कोटी बाकी

    मुंबई इंडियन्स - सर्व 4 खेळाडू रिटेन, मेगा ऑक्शनसाठी पर्समध्ये 48 कोटी बाकी

  • 30 Nov 2021 09:25 PM (IST)

    सनरायझर्स हैदराबाद राशिद खानला रिटेन करणार नाही

    सनरायझर्स हैदराबाद संघ आपला सर्वात मोठा मॅचविनर खेळाडू राशिद खानला रिटेन करणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राशिद खानला नंबर 1 वर कायम ठेवायचे होते परंतु फ्रेंचायझीने केन विल्यमसनची निवड केली.

  • 30 Nov 2021 09:25 PM (IST)

    RCB चा चतूर चहलला टाटा बाय-बाय

    युजवेंद्र चहल संघात RCB ने संघात कायम ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंचा भाग असणार नाही. त्याच्यात आणि व्यवस्थापनात सुरु असलेली चर्चा आता थांबली आहे. हे प्रकरण रिटेन्शन रकमेवर अडकल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत चहलने लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Nov 30,2021 9:24 PM

Follow us
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?
शिवतीर्थावर मोदी-राज एकाच मंचावर, युद्धपातळीवर तयारी; कधी धडाडणार तोफ?.
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट
यामिनी जाधवांना त्रास दिला, त्या रडल्या त्यांनी... शिंदेंचा गौप्यस्फोट.
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय
मोदींना जिरेटोप अन् विरोधकांची टीका, प्रफुल्ल पटेलांचं प्रत्युत्तर काय.
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका
ठाकरे व्होट जिहादचे आका, शिवसेनाभवनात बोलावून हिरवी चादर...कुणाची टीका.