DC vs GT : शुबमन गिलचं अनोखं ‘शतक’, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Shubman Gill IPL 2024 : शुबमन गिल याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात इतिहास रचला आहे. शुबमनने एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

DC vs GT : शुबमन गिलचं अनोखं 'शतक', अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय
Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 10:20 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. दिल्ली आपल्या घरच्या मैदानात अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळत आहे. गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुबमन गिल याने टॉस जिंकून दिल्ली कॅपिट्ल्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शुबमन गिलने टॉससाठी मैदानात येताच इतिहास रचला. शुबमन गिल आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला युवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

शुबमन गिलची ऐतिहासिक कामगिरी

दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धचा सामना हा शुबमन गिलच्या आयपीएल कारकीर्दीतील 100 वा सामना ठरला. शुबमन आयपीएलमध्ये 100 सामने खेळणारा 65 खेळाडू ठरला आहे. इतकंच नाही,तर शुबमन 100 सामने खेळणारा सर्वात युवा भारतीय ठरला आहे. शुबमनने विराट कोहली याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शुबमनच्या आधी 100 सामने खेळणारा युवा खेळाडू हा बहुमान विराटच्या नावावर होता. विराट वयाच्या 25 वर्ष 182 व्या दिवशी 100 वा आयपीएल सामना खेळला होता. तर शुबमनने वयाच्या 24 वर्ष 221 व्या दिवशी हा कारनामा केला आहे. तर सर्वात कमी वयात 100 वा सामना खेळण्याचा विक्रम हा राशिद खानच्या नावावर आहे. राशिदने 24 वर्ष 221 दिवशी 100 वा सामना खेळला होता.

आयपीएलमध्ये 100 सामने खेळणारे युवा खेळाडू

राशिद खान : 24 वर्ष 221 दिवस शुबमन गिल : 24 वर्ष 229 दिवस विराट कोहली : 25 वर्ष 182 दिवस संजू सॅमसन : 25 वर्ष 335 दिवस पीयूष चावला : 26 वर्ष 108 दिवस

शुबमन गिलची आयपीएल कारकीर्द

दरम्यान शुबमन गिल याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 38.12 च्या सरासरी आणि 135.20 च्या स्ट्राईक रेटने 3 हजार 88 धावा केल्या आहेत. गिलने या दरम्यान 3 शतकं आणि 20 अर्धशतक झळकावली आहेत. गिलची आयपीएलमधील 129 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, अझमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा आणि संदीप वॉरियर.

Non Stop LIVE Update
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.