AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, MI vs RR Highlight : मुंबई इंडियन्सचा होमग्राउंडवर पराभव, राजस्थानचा 6 गडी राखून विजय

| Updated on: Apr 01, 2024 | 11:35 PM
Share

IPL MI vs RR Highlight in Marathi: आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरुच आहे. मुंबईचा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. होमग्राउंडचाही मुंबई इंडियन्सला फायदा झाला नाही. राजस्थान रॉयल्सने मुंबईचा 6 विकेट्सने पराभव केला.

IPL 2024, MI vs RR Highlight : मुंबई इंडियन्सचा होमग्राउंडवर पराभव, राजस्थानचा 6 गडी राखून विजय

आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच मुंबई इंडियन्सला 125 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 126 धावांचं सोपं आव्हान मिळालं. राजस्थान रॉयल्सने हे आव्हान 15.3 षटकात पूर्ण केलं.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Apr 2024 11:25 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : राजस्थान रॉयल्सने हा सामना 6 गडी राखून जिंकला

    राजस्थानने सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड मिळवली होती. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात दोन महत्त्वाच्या फलंदाजांना शून्यावर बाद करून सामना फिरवला होता. पॉवरप्लेदरम्यानच मुंबई इंडियन्सने 4 विकेट गमावल्या. त्यांना साथ देत चहलने 3 आणि नांद्रे बर्जरने 2 विकेट घेतल्या. तसेच आवेश खानने एक विकेट घेतली.

  • 01 Apr 2024 10:41 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : राजस्थान रॉयल्सला चौथा धक्का

    राजस्थान रॉयल्सला आर अश्विनच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे. आर अश्विन 16 धावा करून तंबूत परतला आहे.

  • 01 Apr 2024 10:32 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : राजस्थान रॉयल्सच्या 10 षटकात 73 धावा

    राजस्थान रॉयल्सने 3 गडी गमवून 10 षटकात 73 धावा केल्या आहेत. राजस्थानला विजयासाठी 53 धावांची गरज आहे.

  • 01 Apr 2024 10:13 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : राजस्थान रॉयल्सचे 3 गडी तंबूत

    राजस्थान रॉयल्सचे 3 गडी बाद झाले आहेत. आकाश मधवालला दुसरं यश मिळालं आहे. जोस बटलरला बाद करण्यात यश आलं आहे.

  • 01 Apr 2024 10:01 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : राजस्थान रॉयल्सला दुसरा धक्का बसला, संजू सॅमसन 10 धावांवर बाद

    राजस्थान रॉयल्सला संजू सॅमसनच्या रुपाने दुसरा धक्का बसला आहे. आकाश मढवालने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

  • 01 Apr 2024 10:00 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : राजस्थान रॉयल्सला पहिला धक्का, यशस्वी जयस्वाल तंबूत

    राजस्थान रॉयल्सला यशस्वी जयस्वालच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. क्वेनाच्या गोलंदाजीवर यशस्वी 10 धावा करून तंबूत परतला.

  • 01 Apr 2024 09:21 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई इंडियन्सचं राजस्थानसमोर विजयासाठी 126 धावांचं आव्हान

    मुंबई इंडियन्सने राजस्थानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 125 धावा केल्या आणि विजयासाठी 126 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 34 धावांचे योगदान दिले आहे. ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. नांद्रे बर्गरने 2 आणि आवेश खानने 1 गडी बाद केला.

  • 01 Apr 2024 09:14 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई इंडियन्सला नववा धक्का

    टिम डेविडच्या रुपाने नववा धक्का बसला. डेविड 17 धावा करून तंबूत परतला.

  • 01 Apr 2024 09:03 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई इंडियन्सला आठवा धक्का

    गेराल्ड कोएत्झी 4 धावा करून युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. चहलला तिसरं यश मिळालं.

  • 01 Apr 2024 08:44 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई इंडियन्सला सातवा धक्का

    तिलक वर्माच्या रुपाने मुंबई इंडियन्सला सातवा धक्का बसला आहे.

  • 01 Apr 2024 08:36 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई इंडियन्सला सहावा धक्का

    मुंबई इंडियन्सला पियुष चावलाच्या रुपाने सहावा धक्का बसला आहे. पियुष चावला 3 धावा करून तंबूत परतला.

  • 01 Apr 2024 08:24 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई इंडियन्सला पाचवा धक्का

    मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्याच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या 34 धावा करून तंबूत परतला आहे.

  • 01 Apr 2024 07:54 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची लागली रांग

    मुंबई इंडियन्सला इशान किशनच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे.  इशान किशनही बाद झाला आहे.

  • 01 Apr 2024 07:50 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई इंडियन्सने टाकली नांगी, तिसरा खेळाडूही शून्यावर बाद

    डेवॉल्ट ब्रेव्हिसही काही खास करू शकला नाही. त्यालाही आपलं खातं खोलता आलं नाही.

  • 01 Apr 2024 07:42 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबईची पहिल्या षटकात जबर धक्का

    पहिल्याच षटकात मुंबई इंडियन्सला दोन धक्के बसले आहे. रोहित शर्मा आणि नमन धीर यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. ट्रेंट बोल्टने त्यांना तंबूचा रस्ता दाखवला.

  • 01 Apr 2024 07:15 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई आणि राजस्थानचे इम्पॅक्ट प्लेयर्स

    राजस्थान रॉयल्स: रोवमॅन पॉवेल, तनुश कोटियान, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक

    मुंबई इंडियन्स: डेवाल्ड ब्रेविस, नुवान तुषारा, रोमारियो शेफर्ड, नेहल वढेरा, शम्स मुलानी

  • 01 Apr 2024 07:11 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन

    यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल

  • 01 Apr 2024 07:11 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन

    इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका

  • 01 Apr 2024 07:02 PM (IST)

    MI vs RR LIVE Updates : राजस्थानने टॉस जिंकत निवडली गोलंदाजी

    नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

  • 01 Apr 2024 06:01 PM (IST)

    IPL 2024 MI vs RR Live : मुंबई इंडियन्सचा संघ

    हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, गेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, नुवान थुशारा, नशुल्मान, नशुल्मान, कार्तिकेय. , मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, क्वेना माफाका.

  • 01 Apr 2024 06:01 PM (IST)

    IPL 2024 MI vs RR Live : राजस्थान रॉयल्सचा संघ

    संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रायन पराग, डोनोवन फरेरा, क्रुणाल राठौर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, अवेश खान, रोवमान खान, पो. , शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्जर, तनुष कोटियन.

Published On - Apr 01,2024 6:00 PM

Follow us
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.