आरसीबीसोबतचा प्रवास अजून संपलेला नाही..! ग्लेन मॅक्सवेलच्या विधानानंतर क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या

आयपीएल मेगा लिलावाकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये 24 आणि 25 नोव्हेंबरला ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. असं असताना आरसीबीने रिलीज केलेल्या ग्लेन मॅक्सवेलचं एक विधान समोर आलं आहे. त्यामुळे आरसीबी मॅक्सवेलची पुन्हा निवड करण्याची शक्यता आहे.

आरसीबीसोबतचा प्रवास अजून संपलेला नाही..! ग्लेन मॅक्सवेलच्या विधानानंतर क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 8:33 PM

आयपीएल मेगा लिलावाची संपूर्ण तयारी झाली असून खेळाडूंची नाव नोंदणीही झाली आहे. खेळाडूंची बेस प्राईसही ठरली आहे. लिलाव प्रक्रिया 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये पार पडणार आहे. एकूण 204 जागांसाठी 1574 खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. त्यामुळे काही खेळाडूंच्या पदरी यश, तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडणार आहे. दरम्यान या मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. यात काही फ्रेंचायझींनी आश्चर्यकारक निर्णय घेत धक्का दिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि अनकॅप्ड यश दयालचा समावेश आहे. पण स्फोटक फलंदाज विल जॅक्स, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना रिलीज केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्लेन मॅक्सवेलने रिलीज केल्यानंतर एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. आरसीबीने रिटेन केलं नाही, पण त्यांची रणनिती मला खरोखरच आवडते. मला संघातून डावलण्यापूर्वी बॉबॅट आणि अँडी फ्लॉवर्सने मला फोन केल्याचं त्याने सांगितलं. या तिघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगितलं.

अँडी फ्लॉवर आणि बॉबॅट यांनी ग्लेन मॅक्सवेलला संघातून नेमकं का वगळलं ते सांगितलं आहे. ‘त्यांनी मला एक चांगला संघ तयार करण्यासाठी आम्हाला काय अपेक्षित आहे त्याबाबत सांगितलं. प्रत्येक संघाने आरसीबीसारखं वागलं पाहीजे. यामुळे संघ आणि खेळाडू यांच्यातील संबंध मोठ्या प्रमाणात सुधारतात. आगामी हंगामासाठी संघाची रणनिती त्यांनी समजावून सांगितली.’, असं ग्लेन मॅक्सवेल याने सांगितलं.

‘माझा आरसीबीसोबतचा प्रवास अजून संपलेला नाही. आरसीबीने त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्येही बदल केला आहे. मला माहिती आहे की, खेळाडूंची योग्य निवड करण्यास वेळ लागेल. मला संघासोबत परत खेळायला आवडेल. आरसीबी खेळण्यासाठी उत्तम फ्रेंचायझी आहे.’ असं मॅक्सवेलने सांगितलं. तसं पाहिलं तर आरसीबीकडे आरटीएमचे तीन पर्यात आहेत. त्यामुळे मॅक्सवेलबाबत रणनिती समजू शकतो. मेगा लिलावात त्याची पुन्हा निवड होऊ शकते. आरसीबीसोबत मॅक्सवेलने 52 सामने खेळले आहेत. यात 28.77 च्या सरासरीने आणि 159.25 च्या स्ट्राईक रेटने 1266 धावा केल्या आहेत. यात 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.