AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH Toss : मुंबईने टॉस जिंकला, पलटणची बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध रोहित खेळणार? पाहा प्लेइंग 11

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Toss and Playing 11 : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांनी वानखेडे स्टेडियममधील सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. जाणून घ्या.

MI vs SRH Toss : मुंबईने टॉस जिंकला, पलटणची बॅटिंग, हैदराबाद विरुद्ध रोहित खेळणार? पाहा प्लेइंग 11
MI vs SRH Toss IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 29, 2026 | 7:55 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 41 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे.

मुंबईची ओपनिंग जोडी बदलली

मुंबईने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. क्विंटन डी कॉक प्लेइंग ईलेव्हनचा भाग नाही. शेरफेन रदरफोर्ड याला बाहेर करण्यात आलं आहे. रायन रिकेल्टन याचं कमबॅक झालं आहे. बॉलिंग ऑलराउंडर मिचेल सँटनर याच्या जागी विल जॅक्स याचा समावेश करण्यात आला आहे. विल आणि रायन हे दोघे मुंबईसाठी ओपनिंग करणार आहेत.

मिचेल सँटनर आणि क्रिष भगत या तिघांना मैदानाबाहेर व्हावं लागलं आहे. तर रायन रिकेल्टन, विल जॅक्स, ट्रेन्ट बोल्ट आणि रॉबिन मिंझ यांचं कमबॅक झालं आहे. बॉलिंग ऑलराउंडर मिचेल सँटनर याच्या जागी विल जॅक्स याचा समावेश करण्यात आला आहे. सनरायजर्स हैदराबादनमध्ये हर्ष दुबे याला शिवांग कुमार याच्या जागी संधी देण्यात आली आहे.

मुंबईची वानखेडेतील हैदराबाद विरुद्धची आकडेवारी

मुंबई इंडियन्सला या 19 व्या हंगामात वानखेडे स्टेडियममध्ये सलग 3 सामने गमवावे लागले आहेत. मात्र मुंबईचा वानखेडेत सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दबदबा राहिलेला आहे. मुंबईने हैदराबाद विरुद्ध 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला वानखेडेत 2 सामने जिंकता आले आहेत.

रोहितच्या दुखापतीबाबत अपडेट काय?

दरम्यान कॅप्टन हार्दिकने टॉसनंतर रोहित शर्मा याच्या दुखापतीबाबत माहिती दिली. “रोहित शर्मा याला कमबॅक करण्यासाठी आणखी काही सामन्यांची प्रतिक्षा करावी लागेल”, असं हार्दिकने सांगितलं. रोहितचं कमबॅक लांबवणीवर पडल्याने मुंबईच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्ष दुबे, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे आणि एशान मलिंगा.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), रॉबिन मिन्झ, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर आणि अश्वनी कुमार.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है