AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, PBKS vs GT : पंजाब किंग्सचा गुजरातवर रडत रखडत विजय, काय झालं ते वाचा

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पंजाब किंग्सने बाजी मारली. खरं तर गुजरात टायटन्सने अत्यंत सुमार दर्जाची फलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाही.

IPL 2026, PBKS vs GT : पंजाब किंग्सचा गुजरातवर रडत रखडत विजय, काय झालं ते वाचा
Image Credit source: Punjab Kings Twitter
| Updated on: Mar 31, 2026 | 11:26 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यावर पूर्णपणे पंजाब किंग्सचा वरचष्मा दिसला. पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा हायस्कोरिंग सामना होईल असं वाटलं होतं. पण गुजरातची फलंदाजी हवी तशी झाली. एकही फलंदाजी आक्रमक फटकेबाजी करू शकला नाही. कारण खेळपट्टी धीमी होती आणि चेंडू थांबून बॅटवर येत होता. त्यात मैदान मोठं असल्याने फटका मारला तर झेल बाद होत होते. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. गुजरात टायटन्सने 20 षटकात 6 गडी गमवून 162 धावा केल्या. तसेच विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पंजाब किंग्सने सहज गाठेल असं सुरूवातीला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. पंजाब किंग्सला या विजयासाठी चांगलंच झुंजावं लागलं. हे आव्हान गाठताना पंजाब किंग्सने 7 विकेट गमावले आणि शेवटच्या षटकात विजय मिळवला.

गुजरात टायटन्सचा डाव

गुजरात टायटन्सकडून एकही फलंदाजी मोठी खेळी करू शकला नाही. साई सुदर्शन 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि जोस बटलर यांनी सावध खेळी केली. पण त्यांचा स्ट्राईक रेट काही खास राहिला नाही. शुबमन गिलने 27 चेंडूत 38, तर जोस बटलरने 33 चेंडूत 38 धावा केल्या. ग्लेन फिलिप्स 17 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. शाहरूख खान 4 धावा करू शकला. राहुल तेवतियाने नाबाद 11 धावांवर राहिला. पंजाबकडून विजयकुमार विशाकने 3, युजवेंद्र चहलने 2, तर मार्को यानसेनने 1 विकेट काढली.

असा झाला सामना

विजयी धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरूवात काही चांगली झाली नाही.अवघ्या 7 धावांवर प्रियांश आर्याच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉनोली यांनी डाव सावरला. दुसरी विकेट 83 धावांवर प्रभसिमरन सिंगची पडली. त्यानंतर श्रेयस अय्यर संघाच्या 110 धावा असताना बाद झाला. या नंतर सामन्याचं चित्र पालटलं. नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टोयनिस आणि मार्को यानसेन यांच्या धडाधड विकेट पडल्या. त्यामुळे गुजरात टायटन्सकडे सामना झुकला. पण कूपर कोनोलीने नाबाद 72 धावांची खेळी करत संघाला विजयाच्या वेशीवर पोहोचवलं.पंजाब किंग्सने  यासह स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.गेल्या हंगामात पंजाब किंग्सने अंतिम फेरी गाठली होती. पण आरसीबीकडून पराभव झाल्याने पहिल्या जेतेपदाबाबत स्वप्नभंग झाला होता. आता पुन्हा नव्या उमेदीने संघ मैदानात उतरला आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन
मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह....
Asangaon to Vasind | मध्य रेल्वेचा खोळंबा! मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; लोकलसह एक्स्प्रेस गाड्या अर्धा तास रांगेत
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग