IRE vs IND 1st T20i Live Score Updates : सामन्याला सुरुवात, आयर्लंडची बॅटिंग, टेक्टर-अडायर सलामी जोडी मैदानात
Ireland vs India 1st T20I Live Updates: टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i क्रिकेटमध्ये अजिंक्य आहे. त्यामुळे टीम इंडिया आयर्लंड विरुद्धची विजयी घोडदौड कायम राखेल असा विश्वास चाहत्यांना आहे.

LIVE Cricket Score & Updates
-
IRE vs IND 1st T20i Live Updates : आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन
आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : टीम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रेज, जय मुंद्रा आणि मॅथ्यू हॉलार्ड.
-
IRE vs IND 1st T20i Live Updates : टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा.
-
-
IRE vs IND 1st T20i Live Updates : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय
टीम इंडियाने आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज आयर्लंडला किती धावांवर रोखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
IRE vs IND 1st T20i Live Updates : आयर्लंड टीम
लॉर्कन टकर (कर्णधार आणि विकेटकीपर), टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फरीज, रुबेन विल्सन, गॅविन होय, जय मुंद्रा, लियाम मॅककार्थी आणि मॅथ्यू हॉलार्ड.
-
IRE vs IND 1st T20i Live Updates : टीम इंडिया
श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, सुर्यांश शेडगे, हर्षित राणा, प्रसीध कृष्ण, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई आणि प्रिन्स यादव.
-
-
IRE vs IND 1st T20i Live Updates : टीम इंडिया पहिल्या टी 20i सामन्यासाठी सज्ज
टीम इंडियाची युवा ब्रिगेड आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे बेलफास्टमध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील सलामीचा सामना हा बेलफास्ट इथे खेळवण्यात येत आहे. श्रेयस अय्यर याचं या सामन्यातून कर्णधार म्हणून पदार्पण झालं आहे. तर लॉर्कन टकर याच्याकडे आयर्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. लॉर्कन टकर याचाही हा कर्णधार म्हणून पहिलाच सामना आहे. उभयसंघात एकूण 2 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापैकी आता कोणता संघ विजयी सलामी देण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Published On - Jun 26,2026 5:14 PM
