T20 World Cup 2021: क्रिकेटपटूने आज्जीसाठी सोडला देश, आता आयर्लंडकडून खेळताना केला विश्वविक्रम

टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात नेदरलँड्सला आयर्लंडने 7 विकेट्सने पराभूत केलं. या सामन्यात आयर्लंडचा गोलंदाज कर्टिस याने खास कामगिरी केली.

1/5
टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली असून ग्रुप स्टेजमधील सामनेही अत्यंत चुरशीचे होत आहेत. आजच झालेल्या सामन्यात आयर्लंडने नेदरलँड्सला 7 विकेट्सनी मात तर दिली. पण या विजयाचा हिरो ठरलेल्या आयर्लंड्सचा गोलंदाज कर्टिस कँफरने 4 चेंडूत 4 विकेट्स घेत कमाल केली.

2/5
तर ही कमाल करणारा कर्टिसची कथा इतर खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. कर्टिसचा जन्म 20 एप्रिल, 1999 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे झाला. तो आफ्रिकेकडून सामनेही खेळला. पण त्याचा आयर्लंड देशाशी एक खास नातं आहे. त्याची आज्जी तिथे रहात आहे. त्याच्याकडे तिथला पासपोर्टही आहे.

3/5
कर्टिसला आयर्लंडकडून खेळण्याची इच्छा असल्याने त्याने 2018 सालीच्या आफ्रिका विरुद्ध आयर्लंड सामन्यात आफ्रिकेकडून खेळताना आयर्लंडचा कर्णधार ओब्रायन याला माझ्याकडे आयर्लंडचा पासपोर्ट असल्याचं सांगितलं.

4/5
त्या सामन्यात कर्टिसने चांगली कामगिरी केल्याने  आयर्लंडचा कर्णधार  ओब्रायन याने कर्टिसला आयर्लंड संघाकडून  खेळण्याची ऑफर दिली. जी त्याने मान्य करत नुकतीच विश्वचषकातून आयर्लंड संघाकडून खेळण्यासही सुरुवात केली आणि आज पहिल्याच सामन्यात 4 चेंडूत 4 विकेट घेत विश्वविक्रमही केला.

5/5
कर्टीसने आतापर्यंत 10 वनडे सामन्यात 51.28 च्या सरासरीने 359 धावाही केल्या आहेत. तर 8 विकेट्सही मिळवल्या आहेत. तर 4 टी20 सामन्यात 13.33 च्या सरासरीने 40 धावा करत 3 विकेट्स घेतल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI