AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: हार्दिक पांड्याला कर्णधारपद भूषवता येत नाही? इरफान पठाणने केला हल्लाबोल

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी सुरू होईल. पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करेल या आशेवर हाराकिरी सुरूच आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने हार्दिक पांड्यावर निशाणा साधला आहे. त्याने त्याच्या कर्णधारपदावरच बोट ठेवलं आहे.

IPL 2026: हार्दिक पांड्याला कर्णधारपद भूषवता येत नाही? इरफान पठाणने केला हल्लाबोल
IPL 2026: हार्दिक पांड्याला कर्णधारपद भूषवता येत नाही? इरफान पठाणने हार्दिक पांड्यावर केला हल्लाबोलImage Credit source: IPL/BCCI/PTI
| Updated on: Apr 24, 2026 | 5:24 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू पाहिले तर कोणालाही घाम फुटेल. इतके दिग्गज खेळाडू या संघात आहेत. मात्र असं असूनही मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक होत आहे. कोणीही यावं आणि टपली मारून जावं अशी स्थिती आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी 5 सामन्यात मुंबई इंडियन्सने पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सनला 103 धावांनी पराभूत केलं. त्यामुळे हा मानहानीकारक पराभव पचवणं क्रीडाप्रेमींना कठीण जात आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टीम इंडियाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या काही निर्णयावर टीकास्त्र सोडलं आणि त्याला त्याची जबाबदारी घेण्याचा सल्लाही दिला.

इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सांगितलं की, हार्दिक पांड्याने युवा गोलंदाज कृष भगतकडे 16 आणि 20वं षटक सोपवलं. त्याला सॅमसनविरुद्ध गोलंदाजी करण्यास भाग पाडलं. हा निर्णय चुकीचा होता असं इरफान पठाणने सांगितलं, समोर संजू सॅमसन होता आणि शतकाच्या उंबरठ्यावर असताना कर्णधार हार्दिक पांड्याला ही जबाबदारी स्वत: घ्यायला हवी होती. कृष भगतच्या दोन षटकात 31 धावा गेल्या. त्यामुळे संघाचं मोठं नुकसान झालं.

इरफान पठाणने युट्यूब चॅनेलवर हार्दिक पांड्यावर चर्चा करताना सांगितलं की, ‘तुम्ही 16वं षटक असा गोलंदाजाकडे सोपवत आहात जो आयपीएलमध्ये दुसरा सामना खेळत आहे. तेही चांगल्या फॉर्मात असलेल्या संजू सॅमसनविरुद्ध.. हा निर्णय काही योग्य नव्हता. इतकंच काय तर तुम्ही शेवटचं षटकही त्याच गोलंदाजाला समोर संजू सॅमसन असताना दिलं. हे काही बरोबर नाही. तुला जबाबदारी घ्यायला हवी होती. कर्णधार म्हणून तुला सक्रिय असायला हवं होतं.’

इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या फलंदाजीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आयपीएल 2023 नंतर हार्दिक पांड्याला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. त्याने त्याच्या शैलीत बदल केल्याने वेगवान गोलंदाजांसमोर चांगली कामगिरी करत आहे. पण फिरकीपटूंसमोर त्याची कामगिरी निराशाजनक आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले