ENG vs IND : जा तू, निघ! पाचव्या कसोटीदरम्यान टीम इंडियाचा खेळाडू रिलीज, Bcci ची मोठी घोषणा
England vs India 5th Test : इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान 1 ऑगस्टला भारतीय संघातून मॅचविनर खेळाडूला मुक्त करण्यात आलं आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.

इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमधील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. भारताने या कसोटीतील पहिल्या दिवसापर्यंत 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. तर दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी भारताच्या गोटातून मोठी बातमी समोर आली. टीम इंडियाचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड दौऱ्यातून रिलीज करण्यात आलं. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली.
बुमराहचा इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. बुमराहने वर्कलोड मॅनेजमेंटनुसार 3 सामने खेळले होते. त्यामुळे टीम मॅनजमेंटने बुमराहबाबत कोणतीही जोखीम न घेता त्याला वर्कलोडनुसार पाचव्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली. त्यानंतर आता बुमराहला संघातून मुक्त करण्यात आलंय. बुमराहने इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी वर्कलोड मॅनेजमेंटमुळे फक्त 3 सामनेच खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. बुमराह त्यानुसार इंग्लंड विरुद्ध पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात खेळला.
बुमराह क्रिकेट विश्वातील आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक आहे. बुमराहने इंग्लंड दौऱ्यातील 5 पैकी 3 सामन्यांत उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे बुमराहच्या चांगल्या कामगिरीनंतरही भारताला विजयी होता आलं नाही.
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याची कामगिरी
बुमराहने या कसोटी मालिकेतील 3 सामन्यांमधील 5 डावांत 119.4 ओव्हर बॉलिंग केली. बुमराहने या दरम्यान 21 षटकं निर्धाव टाकली. तसेच बुमराहने 3.04 च्या इकॉनॉमीने 364 धावांच्या मोबदल्यात 14 विकेट्स घेतल्या. बुमराहने या मालिकेत 2 वेळा 5 विकेट्स घेतल्या.
बुमराह इंग्लंड दौऱ्यातील कसोटी संघातून रिलीज
🚨 NEWS 🚨
Jasprit Bumrah released from squad for fifth Test.
Details 🔽 #TeamIndia | #ENGvINDhttps://t.co/nqyHlIp6fZ
— BCCI (@BCCI) August 1, 2025
इंग्लंड पहिल्या डावात 115 धावांनी पिछाडीवर
दरम्यान इंग्लंड पाचव्या सामन्यातील पहिल्या डावात 115 धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडने भारताला पहिल्या डावात 224 धावांवर ऑलआऊट केलं. भारतासाठी पहिल्या डावात करुण नायर याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. करुणने केलेल्या खेळीमुळे भारताला 224 धावांपर्यंत पोहचता आलं. इंग्लंडसाठी गस एटकीन्सन याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. त्यानतंर इंग्लंडने विस्फोटक सुरुवात करत लंचब्रेकंपर्यंत 100 पार मजल मारली. इंग्लंडने लंचपर्यंत 16 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 119 रन्स केल्या आहेत.
