AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs MI Toss : केकेआर विरुद्ध मुंबईची बॅटिंग, पलटणचा कॅप्टन बदलला, पाहा प्लेइंग ईलेव्हन

Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Toss and Playing 11, IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या निर्णायक सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केकेआर त्याच 11 खेळाडूंसह मुंबई विरुद्ध 2 हात करणार आहे.

KKR vs MI Toss : केकेआर विरुद्ध मुंबईची बॅटिंग, पलटणचा कॅप्टन बदलला, पाहा प्लेइंग ईलेव्हन
Ajinkya Rahane and Hardik Pandya KKR vs MI TossImage Credit source: IPL X Account
| Updated on: May 20, 2026 | 8:16 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) 65 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्ससमोर 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. या सामन्याचं कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये आयोजन करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस झाला. केकेआरच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार अजिंक्य रहाणे याने फिल्डिंगचा निर्णय घेत मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दोन्ही संघांच्या प्लेइंग ईलेव्हनबाबत आपण जाणून घेऊयात.

कोलकातामधील दोन्ही संघांची आकडेवारी

केकेआर आणि मुंबई दोन्ही संघ कोलकातमधील इडन गार्डन्समध्ये आमनेसामने येण्याची ही 12 वी वेळ आहे. मुंबई इडन गार्डन्समध्ये याआधी झालेल्या 11 पैकी सर्वाधिक सामन्यांत विजय मिळवला आहे. मुंबईने केकेआरला त्यांच्या घरच्या मैदानात 7 सामन्यांत पराभूत केलं आहे. तर केकेआरने मुंबईला 4 वेळा पराभूत केलं आहे.

प्लेइंग ईलेव्हन अपडेट

कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केलेले नाहीत. तर मुंबईने बदल केले आहेत. मुंबईच्या नियमित कर्णधाराचं कमबॅक झालं आहे. हार्दिक पंड्या परतला आहे. मुंबईचं गेल्या सामन्यात जसप्रीत बुमराह याने नेतृत्व केलं होतं. तसेच  हार्दिक व्यतिरिक्त सूर्यकुमार यादव आणि अल्लाह गजनफर या दोघांचं कमबॅक झालं आहे.

मुंबई-केकेआरपैकी कोण वरचढ? पाहा आकडेवारी

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 36 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने या 36 पैकी 25 सामने जिंकले आहेत. तर केकेआरने 11 सामन्यांत मुंबईवर मात केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार कोलकाता पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे. तर मुंबई शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या स्थानी विराजमान आहे.

मुंबई जिंकणार की केकेआर मैदान मारणार?

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा , नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कॅप्टन), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह आणि रघु शर्मा.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन: अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरुन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती आणि सौरभ दुबे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?