AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG vs MI Score And Updates IPL 2025 : लखनौचा घरच्या मैदानात विजय, मुंबईवर 12 धावांनी मात

| Updated on: Apr 05, 2025 | 3:02 AM
Share

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Score And Highlights in Marathi : लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवला. लखनौचा हा या मोसमातील दुसरा विजय ठरला.

LSG vs MI Score And Updates IPL 2025 : लखनौचा घरच्या मैदानात विजय, मुंबईवर 12 धावांनी मात
Lucknow Super Giants vs Mumbai Indians Live Ipl 2025Image Credit source: Tv9

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 16 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे लखनौमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. दोन्ही संघांचा हा या मोसमातील चौथा सामना होता. लखनौने घरच्या सामन्यात मुंबईवर मात करत या मोसमातील दुसरा विजय मिळवला. लखनौने मुंबईला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 191 धावाच करता आल्या. लखनौने यासह मुंबईवर 12 धावांनी विजय मिळवला. लखनौ यासह पॉइंट्स टेबलमध्ये एका स्थानाची झेप घेत सहाव्या स्थानी विराजमान झाली. तर मुंबईचा हा तिसरा पराभव ठरला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Apr 2025 11:25 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : लखनौचा घरच्या मैदानात विजय, मुंबईवर 12 धावांनी मात

    लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानात विजय मिळवला आहे. लखनौने मुंबईला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 191 धावाच करता आल्या. लखनौने यासह या मोसमात चौथ्या सामन्यातील दुसरा विजय मिळवला.

  • 04 Apr 2025 11:20 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : मुंबईला 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज

    मुंबईला विजयासाठी 6 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. हार्दिक पंड्या आणि मिचेल सँटनर हे दोघे फलंदाज मैदानात आहेत. तर लखनौकडून आवेश खान शेवटची ओव्हर टाकत आहे.

  • 04 Apr 2025 11:18 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : तिलक वर्मा रिटायर्ड हर्ट

    तिलक वर्मा रिटायर्ड हर्ट झाला आहे. तिलकने 23 बॉलमध्ये 25 रन्स केल्या. तिलकच्या बॅटने धावा होत नसल्याने त्याला मैदानाबाहेर पाठवलं असाव, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगली आहे.

  • 04 Apr 2025 11:04 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : सूर्यकुमार यादव आऊट, मुंबईला निर्णायक क्षणी मोठा झटका

    लखनौ सुपर जायंट्सने सेट सूर्यकुमार यादव याला आऊट करत मुंबईला निर्णायक क्षणी मोठा झटका दिला आहे. सूर्यकुमार यादव 67 धावा करुन आऊट झाला आहे. मुंबईने यासह चौथी विकेट गमावली आहे.

  • 04 Apr 2025 10:57 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, सामना रंगतदार स्थितीत

    सूर्यकुमार यादव याने निर्णायक क्षणी एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे सामना रंगतदार स्थिती आहे. मुंबईला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये आणखी 61 धावांची गरज आहे. लखनौने मुंबईला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 04 Apr 2025 10:22 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : नमन धीरचं अर्धशतक हुकलं, 46 रन्सवर बोल्ड, मुंबईला तिसरा धक्का

    दिग्वेश राठी याने नमन धीरला बोल्ड केलं आहे. नमन धीर 46 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 04 Apr 2025 09:46 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : मुंबईची सलामी जोडी माघारी, विल जॅक्सनंतर रायन रिकेल्टन आऊट

    लखनौ सुपर जायंट्सने तिसऱ्याच ओव्हरमध्ये मुंबईच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.  विल जॅक्सनंतर रायन रिकेल्टन आऊट झाला आहे. जॅक्सने 5 तर रिकेल्टनने 10 धावा केल्या.

  • 04 Apr 2025 09:33 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : रायन रिकेल्टन-विल जॅक्स सलामी जोडी मैदानात, मुंबईसमोर 204 धावांचं आव्हान

    मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रायन रिकेल्टन-विल जॅक्स सलामी जोडी मैदानात आली आहे. लखनौने मुंबईसमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

  • 04 Apr 2025 09:18 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : मुंबईसमोर 204 धावांचं आव्हान

    लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं आहे. लखनौकडून मिचेल मार्श आणि एडन मारक्रम या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या.  मार्श याने 60 तर मारक्रमने 53 रन्स केल्या. तर मुंबईकडून कर्णधार हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

  • 04 Apr 2025 09:11 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : अब्दुल समद आऊट

    मुंबईने लखनौला सहावा झटका दिला आहे. ट्रेन्ट बोल्ट याने अब्दुल समद याला नमन धीर याच्या हाती 4 रन्सवर कॅच आऊट केलं.

  • 04 Apr 2025 09:05 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : ओपनर एडन मारक्रम आऊट, लखनौला पाचवा धक्का

    मुंबईने लखनौ सुपर जायंट्सला पाचवा धक्का दिला आहे. हार्दिक पंड्या याने एडन मारक्रम याला 53 धावांवर राज बावा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे.

  • 04 Apr 2025 08:53 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : लखनौला चौथा धक्का, आयुष बडोनी आऊट

    मुंबईने लखनौ सुपर जांयट्सला चौथा झटका दिला आहे. अश्वनी कुमार याने आयुष बदोनी याला रायन रिकेल्टन याच्या हाती 30 धावांवर कॅच आऊट केलं आहे.

  • 04 Apr 2025 08:24 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : कर्णधार ऋषभ पंत कॅच आऊट, कॉर्बिन बॉशचा कमाल कॅच

    लखनौ सुपर जांयट्सचा कर्णधार सलग चौथ्या सामन्यात अपयशी ठरला आहे. हार्दिक पंड्याच्या बॉलिंगवर कॉर्बिन बॉश याने ऋषभचा 2 धावांवर अप्रतिम कॅच घेतला.

  • 04 Apr 2025 08:16 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : लखनौला दुसरा धक्का, निकोलस पूरन आऊट

    मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या याने लखनौ सुपर जायंट्सला मोठा झटका दिला आहे. हार्दिकने स्फोटक फलंदाज निकोलस पूरन याला 12 धावांवर दीपक चाहर याच्या हाती कॅच आऊट केलं.

  • 04 Apr 2025 08:06 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : लखनौला कडक सुरुवातीनंतर पहिला झटका, मिचेल मार्श आऊट

    लखनौ सुपर जायंट्सला चांगल्या सुरुवातीनंतर अखेर मुंबईने पहिला झटका लागला आहे. विघ्नेश पुथुर याने मिचेल मार्श याला 60 रन्सवर आऊट केलं आहे.

  • 04 Apr 2025 07:31 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात

    लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. लखनौकडून मिचेल मार्श-एडन मारक्रम हीसलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 04 Apr 2025 07:23 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, दीपक चहर आणि विघ्नेश पुथूर.

    मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेअर : तिलक वर्मा, कॉर्बिन बॉश, रॉबिन मिन्झ, सत्यनारायण राजू आणि कर्ण शर्मा.

  • 04 Apr 2025 07:22 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन

    लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप आणि आवेश खान.

    लखनौ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेअर: रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद, एम सिद्धार्थ आणि आकाश सिंग.

  • 04 Apr 2025 07:03 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : मुंबईने टॉस जिंकला, लखनौविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय

    मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 04 Apr 2025 06:06 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.

  • 04 Apr 2025 06:05 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : लखनौ सुपर जायंट्स संघ

    लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.

  • 04 Apr 2025 05:50 PM (IST)

    LSG vs MI Live Updates, IPL 2025 : लखनौ-मुंबई दुसर्‍या विजयासाठी सज्ज, कोण होणार यशस्वी

    लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत या मोसमात प्रत्येकी 3 पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 सामने गमावले आहेत. मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या तर लखनौ सुपर जायंट्स सातव्या क्रमांकावर आहे.

Published On - Apr 04,2025 5:49 PM

Follow us
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.