MI vs PBKS IPL 2024: अतितटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने मारली 9 धावांनी विजय

| Updated on: Apr 19, 2024 | 12:35 AM

Mumbai Indians vs Punjab Kings IPL Highlight in Marathi: आयपीएल 2024 स्पर्धेतील तळाशी असलेल्या पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगतदार लढत झाली. हा सामना मुंबई इंडियन्स फक्त 9 धावांनी जिंकला. मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स आणि गुजरातला मागे टाकत सातव्या स्थानी झेप घेतली आहे.

MI vs PBKS IPL 2024: अतितटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने मारली 9 धावांनी विजय

आयपीएल स्पर्धेतील 33 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना कोण जिंकेल शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला माहिती नव्हतं. एकवेळ अशी होती की सामना पूर्णपणे मुंबईच्या पारड्यात झुकलेला होता. मात्र आशुतोष शर्माच्या वादळी खेळीने मुंबईचं टेन्शन वाढलं. त्याला बाद करण्याचे सर्व प्रयत्न फसले होते. त्यानंतर 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात झेल बाद झाला आणि सामना फिरला. त्यानंतरही ब्रारने सामन्यात रंगत आणली होती. तसेच रबाडाने एक षटकार मारताच मुंबईचा रंग उडाला होता. पण दोन धावा घेताना धावचीत झाला आणि मुंंबईने सामना 9 धावांनी जिंकला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Apr 2024 11:39 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : अतितटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची बाजी

    मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला 9 धावांनी विजय मिळवला आहे. आशुतोष शर्माने विजयाच्या वेशीवर पंंजाबला आणून ठेवलं आहे. पण अखेर मुंबई इंडियन्सच्या पारड्यात विजय पडला आहे.

  • 18 Apr 2024 11:32 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : हरप्रीत ब्रार बाद, मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा सामन्यात

    हरप्रीत ब्रारला बाद करण्यात हार्दिक पांड्याला यश आलं आहे. हरप्रीत ब्रार मोक्याच्या क्षणी झेल बाद झाला.

  • 18 Apr 2024 11:23 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : आशुतोष शर्मा 61 धावा करून बाद

    आशुतोष शर्मा 61 धावा करून कोएत्झीच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. त्यामुळे सामन्याची स्थिती दोलयामान झाली आहे. कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

  • 18 Apr 2024 11:10 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : आशुतोष शर्माचं दमदार अर्धशतक

    आशुतोष शर्माने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची हवा काढली. आशुतोष शर्माने 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं.

  • 18 Apr 2024 10:50 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : शशांक सिंगचा डाव 41 धावांवर आटोपला

    पंजाबच्या आशा पूर्णत: शशांक सिंगवर टिकल्या होत्या. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण जसप्रीत बुमराहने त्याचा डाव हाणून पाडला.

  • 18 Apr 2024 10:37 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : जितेश शर्माच्या रुपाने पंजाब किंग्सला सहावा धक्का

    आकाश मढवालच्या गोलंदाजीवर जितेश शर्मा 9 धावा करून बाद झाला. डायरेक्ट बॉल खेळताना चूक झाली आणि थेट पॅडवर आदळला. पंचांनी त्याला पायचीत दिलं.

  • 18 Apr 2024 10:17 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : पंजाब किंग्सला पाचवा धक्का

    हरप्रीत सिंग भाटीयाच्या रुपाने पंजाबला पाचवा धक्का बसला आहे. 13 धावांवर असताना त्याला श्रेयस गोपाळने बाद केलं.

  • 18 Apr 2024 09:54 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : पंजाब किंग्सला 14 धावांवर चौथा धक्का

    पंजाब किंग्सला लिविंगस्टोनच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे. कोएत्झीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

  • 18 Apr 2024 09:53 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : जसप्रीत बुमराहने सॅम करनलाही पाठवलं तंबूत

    जसप्रीत बुमराहने पंजाब किंग्सला बॅकफूटवर ढकललं आहे. एकाच षटकात दोन गडी बाद केले. रिली रोस्सोला बाद केल्यानंतर सॅम करनला तंबूत पाठवलं.

  • 18 Apr 2024 09:49 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : रिली रोस्सो स्वस्तात बाद, बुमराहने दाखवला तंबूचा रस्ता

    जसप्रीत बुमराहच्या भेदक यॉर्कवर रिली रोस्सोच्या दांड्या उडाल्या. त्याला चेंडूच कळला नाही. रोस्सो फक्त 1 धाव करून तंबूत परतला.

  • 18 Apr 2024 09:43 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : प्रभसिमरन सिंग शून्यावर बाद

    पंजाब किंग्सला प्रभसिमरन सिंगच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. गेराल्ड कोएत्झीच्या गोलंदाजीवर इशान किशनने त्याचा झेल पकडला. त्याला आपलं खातही खोलता आलं नाही.

  • 18 Apr 2024 09:29 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : मुंबई इंडियन्सच्या 7 गडी गमवून 192 धावा

    मुंबई इंडियन्सने 7 गडी गमवून 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान पंजाब किंग्स गाठते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 18 Apr 2024 09:23 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : रोमारियो शेफर्ड 1 धाव करून बाद

    शेवटच्या जोरदार फटकेबाजी करताना रोमारियो शेफर्डचा शॉट हुकला आणि अवघी 1 धाव करून बाद झाला.

  • 18 Apr 2024 09:20 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : टिम डेविड बाद

    टीम डेविड 6 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि एक षटकार मारला.

  • 18 Apr 2024 09:08 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्या तंबूत

    कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा फलंदाजीत फेल ठरला आहे. 6 चेंडूत खेळत 10 धावा केल्या आणि बाद झाला. हर्षल पटेलने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

  • 18 Apr 2024 09:00 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : सूर्यकुमार यादव 78 धावा करून बाद

    सूर्यकुमार यादव 78 धावा करून बाद झाला आहे. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाची धावसंख्या 140 च्या पार गेली आहे.

  • 18 Apr 2024 08:30 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : रोहित शर्माच्या रुपाने मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का

    रोहित शर्मा 25 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. यात 3 षटकार आणि 2 चौकार मारले. सॅम करनच्या गोलंदाजीवर हरप्रीत ब्रारने झेल पकडला.

  • 18 Apr 2024 08:10 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माची अर्धशतकी भागीदारी

    रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी भागीदारी केली आहे. पण झटपट धावांना काही अंशी ब्रेक लागला आहे.

  • 18 Apr 2024 08:01 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सचा सावध पवित्रा, 1 बाद 54 धावा

    पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये मुंबई इंडियन्सने सावध सुरुवात केली. इशान किशन 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार आणि रोहित शर्माने डाव सावरला. तसेच 1 बाद 54 धावा केल्या.

  • 18 Apr 2024 07:40 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : इशान किशन फक्त 8 धावा करून बाद

    इशान किशन 8 धावांवर असताना रबाडाच्या गोलंदाजीवर उत्तुंग शॉट मारत बाद झाला. ब्रारने झेल पकडण्यात कोणतीही चूक केली नाही.

  • 18 Apr 2024 07:39 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : रोहित शर्मा - इशांत किशनची सावध सुरुवात

    रोहित शर्मा आणि इशान किशनने मुंबई इंडियन्सला सावध सुरुवात करून दिली आहे. 2 षटकात बिनबाद 18 धावा झाल्या आहेत.

  • 18 Apr 2024 07:16 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11

    रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

  • 18 Apr 2024 07:16 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : पंजाब किंग्सची प्लेइंग 11

    पंजाब किंग्स (प्लेइंग इलेव्हन): रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

  • 18 Apr 2024 07:02 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सने जिंकला

    पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी निवडली आहे.

  • 18 Apr 2024 05:54 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

    मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, मधवाल, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई, शम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, नुवान तुषारा, क्वेना माफाका, ल्यूक वुड, पियुष चावला.

  • 18 Apr 2024 05:53 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ

    पंजाब किंग्स संघ: अथर्व तायडे, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शशांक सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, राहुल चहर, विदाथ कावरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया, नॅथन एलिस, तनय थियागराजन, शिवम सिंग, शिखर धवन, रिले रोसो, ख्रिस वोक्स, ऋषी धवन, सिकंदर रझा, प्रिन्स चौधरी, विश्वनाथ सिंग.

  • 18 Apr 2024 05:51 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हेड टू हेड

    दोन्ही संघ आयपीएलमध्ये 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यात मुंबई इंडियन्सने 16, तर पंजाब किंग्सने 15 वेळा बाजी मारली आहे.

  • 18 Apr 2024 05:49 PM (IST)

    MI vs PBKS Live Score : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सचा मागच्या सामन्यात पराभव

    पंजाब आणि मुंबई या दोन्ही संघांची स्पर्धेतील वाटचाल जवळपास सारखी आहे. दोन्ही संघांनी मागील सामने गमावले आहेत. तसेच चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. या सामन्यात कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे खेळणार नसून सॅम करनकडे धुरा आहे. तर मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफसाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा ठरेल.

Published On - Apr 18,2024 5:49 PM

Follow us
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.