IND vs PAK: पाकिस्तानी खेळाडूचं घृणास्पद कृत्य, सरावादरम्यान सर्व मर्यादा ओलांडल्या! Video व्हायरल
भारत पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सुपर 4 फेरीत सामना होणार आहे. भारताने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक न करता त्यांची लायकी दाखवली होती. आताही तसंच असेल. पण या सामन्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूचं घृणास्पद कृत्य समोर आलं आहे.

पाकिस्तानने गेली अनेक वर्षे देशात दहशतवाद पोसला. त्यामुळे त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. पण कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच.. भीक मागताना देखील पाकिस्तानला लाज वाटत नाही. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चांगलाच दणका दिला. दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि क्रिकेट मैदानातही त्यांची लायकी दाखवून दिली. आशिया कप स्पर्धेत साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताने हँडशेक केलाच नाही. त्यामुळे पाकिस्तान संघाचा जळफळाट झाला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाल्यानंतर वाटेल ते करू लागला. मग सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. तसेच युएईविरुद्धचा सामना खेळणार नसल्याची धमकी दिली. पण शेवटी नाक घासत मैदानात खेळणं भाग पडलं. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान संघ आमनेसामने येत आहेत. असं असताना या सामन्यापूर्वी पार पडलेल्या एक सरावात पाकिस्तानी खेळाडूने सर्व मर्यादा ओलांडल्या. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुपर 4 फेरीतील भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ दुबईत सराव करत होता. त्या सरावादरम्यानचा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. तेव्हा वेगवान गोलंदाज हारिस रउफने त्याच्या हाताने 6-0 असा इशारा केला. तसेच 6-0 असा जोराने ओरडत होता. या माध्यमातून तो ऑपरेशन सिंदूरवरून डिवचण्याचा प्रयत्न करत होता, असं नेटकरी सांगत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर पार पाडलं. यावेळी दोन्ही देशात युद्धजन्य स्थिती होती. यावेळी पाकिस्तानने आणि तिथल्या मीडियाने भारताची सहा लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला होता. आता हारिस रउफ तेच सांगत असल्याचा दावा नेटकरी करत आहेत. त्यामुळे त्याला ट्रोल केलं जात आहे. पण त्याने कोणाकडे पाहून असं केलं याबाबत काही स्पष्टता नाही. हा भारतावर व्यंग्यात्मक उपहास होता की पाकिस्तान संघ आपापसात खेळत असलेल्या फुटबॉल सामन्याचा स्कोअर होता हे स्पष्ट झालेले नाही.
Haris Rauf and other Pakistani players shouting 6-0 before the India-Pakistan game.
Celebrating a victory that never happened shows the level of their IQ Level.
These beggars create fake reasons to fool their awam. pic.twitter.com/JGbHVuQOce
— Space Recorder (@1spacerecorder) September 21, 2025
पाकिस्तानी टीम किस हद तक गिरी हुई है उसका अंदाजा इस बात से लगाया जा सकता है कि अभ्यास सत्र में उनके खिलाड़ी 6-0, 6-0 चिल्ला रहे थे। मूर्ख तुम्हारे 11 एयरबेस उड़ाए गए लेकिन तुमको समझ नहीं आया। कल तुमको सिर्फ हौंका जाएगा।#INDvsPAK
— Abhishek Tripathi / अभिषेक त्रिपाठी (@abhishereporter) September 20, 2025
पाकिस्तानकडून असं घृणास्पद कृत्य करणारा हारिस रउफ हा काही पहिला खेळाडू नाही. यापूर्वी पाकिस्तानचा अष्टपैलू फहिम अश्रफने असंच केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. सुपर 4 फेरीत भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव करून त्यांची लायकी दाखवावी अशा भावना भारतीय क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. साखळी फेरीत भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यावर पूर्णपणे भारताची पकड होती. त्यांना डोकंच वर काढू दिलं नव्हतं. पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
