आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील (IPL 2021) 43 वा सामना सनरायजर्स हैद्राबाद (SRH) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (CSK) यांच्यात खेळवला गेला. प्रसिद्ध अशा शारजाहच्या मैदानावर हा सामना पार पडला. शारजाहच्या छोट्याशा मैदानात मोठा स्कोर होत असतो पण या सामन्यात मात्र फार कमी धावा झाल्या.
सामन्यात नाणेफेक जिंकत चेन्नईने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर हैद्राबादची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. साहा (44) सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने हैद्राबाद संघ केवळ 134 धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यानंतर 135 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी चेन्नईला देखील बराच वेळ लागला. अखेर 6 विकेट्सच्या फरकाने चेन्नईने सामना जिंकला. चेन्नईकडून सलामीवीर गायकवाड (45) आणि फाफ (41) यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडवले.
135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईकडून सलामीवीर गायकवाड (45) आणि फाफ (41) यांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडवले. ज्यामुळे चेन्नईने सामना 6 विकेट्सने जिंकला.
चेन्नई संघाला 12 चेंडूत 16 धावांची गरज आहे. फलंदाजीसाठी राय़डू आणि धोनी हे दोघे आहेत.
जेसन होल्डरने 16 व्या षटकात चेन्नईला दोन झटके दिले आहेत. तिसऱ्या चेंडूवर सुरेश रैनाला पायचीत केल्यानंतर पाचव्या चेंडूवर फाफला झेलबाद केलं आहे. सिद्धार्थ कौलने फाफचा झेल घेतला.
चेन्नईचा दुसरा फलंदाज तंबूत परतला आहे. राशिद खानने मोईन अलीची विकेट घेतली आहे.
चेन्नईला उत्तम सुरुवात करु देणाऱ्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक थोडक्यात हुकलं आहे. त्य़ाला 45 धावांवर होल्डरने बाद केलं आहे. विल्यमसनने त्याची कॅच घेतली.
चेन्नईच्या सलामीवीरांनी तुफान सुरुवात करत पहिल्या 6 षटकात 47 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.
135 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईची सलामी जोडी फाफ डुप्लेसी आणि ऋतुराज गायकवाड मैदानात आले आहेत.
हैद्राबाद संघाच्या 20 ओव्हर संपल्या आहेत. दरम्यान साहा (44) सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने हैद्राबाद संघ केवळ 134 धावांपर्यंत मजल मारु शकला आहे. आता 135 धावांचे सोपे आव्हान पूर्ण करण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात येईल.
हैद्राबादचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरही ठाकूरच्या चेंडूवर बाद झाला आहे. दीपक चाहरने त्याचा झेल घेतला आहे.
हैद्राबादचे अभिषेक शर्मा आणि अब्दुल समाद हे दोघेही हेझलवुड टाकत असलेल्या 17 व्या षटकात बाद झाले आहेत. त्यामुळे 17 ओव्हरनंतर हैद्राबादची अवस्था 111 वर 6 बाद झाली आहे.
हैद्राबादची फलंदाजी एकहाती सांभाळणारा साहाही बाद झाला आहे. जाडेजाच्या चेंडूवर धोनीनेच त्याची कॅच पकडली असून साहा 44 धावा करुन बाद झाला आहे.
हैद्राबादला तिसरा झटका प्रियमच्या रुपात बसला. ब्राव्होने पुन्हा एक विकेट घेत धोनीच्या हाती गार्गला झेलबाद करवलं.
शार्दूल ठाकूर 9 वी ओव्हर टाकत असताना साहाने मारलेला एक चेंडू थेट गायकवाडच्या हातात गेला. साहा झेलबाद झाला असं वाटतं असतानाच नो बॉल असल्याने नॉटआऊट देण्यात आलं.
सलामीवीर जेसन रॉय दोन धावा करुन बाद झाल्यानंतर आता हैद्राबादला आणखी एक मोठा झटका बसला आहे. कर्णधार केन विल्यमसन अवघ्या 11 धावा करुन बाद झाला आहे. ब्राव्होने त्याला पायचीत केलं आहे.
मागील सामन्यात संघासाठी दमदार कामगिरी करणाऱ्या जेसन रॉयला आज मात्र खास कामगिरी करता आली नाही. तो केवळ 2 धावा करुन बाद झाला आहे. हेजलवुडच्या चेंडूवर धोनीने त्याची कॅच घेतली आहे.
सनरायजर्स हैद्राबाद संघाकडून सलीमीवर जेसन रॉय आणि रिद्धीमन साहा मैदानात आले आहेत.
नाणेफेक जिंकत एमएस धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे सनरायजर्स हैद्राबादचे खेळाडू प्रथम फलंदाजीला येतील.
ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड
जेसन रॉय, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गार्ग, केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, अब्दुल समाद, जेसन होल्डर, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौैल, संदीप शर्मा
यंदाच्या हंगामात सतत पराभव स्वीकाराव लागणाऱ्या हैद्राबाद संघात जेसन रॉयचं आगमन होताच त्यांनी राजस्थानला 7 विकेट्सनी मात दिली. आजही चेन्नईविरुद्ध जेसन कमाल करणार का? हे पाहावं लागेल.
हैद्राबादचा संघ 10 पैकी 2 सामना जिंकल्याने 4 पॉईंट्ससह शेवटच्या स्थानावर आहे. पण हैद्राबाद संघाने नुकताच एक सामना राजस्थानला पराभूत करत जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. ज्यामुळे आजचा सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे.
Published On - Sep 30,2021 7:02 PM