आयपीएल 2025 मेगा लिलावात या पाच विकेटकीपर्सवर पडणार पैशांचा पाऊस! जाणून घ्या

आयपीएल मेगा लिलावात काही खेळाडू आतापर्यंत सर्व विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील महागडा खेळाडू म्हणून मिचेल स्टार्कची नोंद आहे. आता हा विक्रम कोण मोडीत काढतं याची उत्सुकता आहे. हा विक्रम एखादा विकेटकीपर बॅट्समन मोडीत काढण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात त्या पाच विकेटकीपर्सबाबत

आयपीएल 2025 मेगा लिलावात या पाच विकेटकीपर्सवर पडणार पैशांचा पाऊस! जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 9:11 PM

आयपीएल मेगा लिलावात एकूण 1574 खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंच्या नशिबाचा फैसला सौदी अरेबियचाच्या जेद्दाहमध्ये 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहे. पंजाब किंग्सच्या पर्समध्ये इतर फ्रेंचायझींच्या तुलनेत सर्वाधिक पैसे आहेत. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात पुन्हा एकदा संघ बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे फ्रेंचायझी एखाद्या खेळाडूसाठी सर्वाधिक पैसे मोजण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेगा लिलावात पंजाब किंग्स काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे पंजाब किंग्ससाठी महागडा खेळाडू हा कर्णधार असेल यात काही शंका नाही. कारण सध्या दोन अनकॅप्ड खेळाडूंना 9.5 कोटी खर्च करून संघात कायम ठेवलं आहे. असं असताना पाच विकेटकीपर्सकडे लक्ष असणार आहे. यात सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे ऋषभ पंत..पाच ते सहा फ्रँचायझी पंतला संघात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यात फ्रँचायझींमध्ये आरसीबी, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचा समावेश आहे. पंत यष्टिरक्षक तसेच स्फोटक फलंदाज आहे. तसेच कर्णधार मिळत असल्याने सर्व फ्रँचायझी पंतकडे लक्ष देत आहेत.

लखनौ सुपरजायंट्स संघातून बाहेर पडलेल्या केएल राहुलवर अनेक फ्रँचायझींची नजर आहे. राहुल देखील यष्टिरक्षक तसेच स्फोटक फलंदाज आहे. त्याच्यात नेतृत्व गुण असल्याने कर्णधार देखील मिळणार आहे. आरसीबी राहुलला विकत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या इशान किशनला मेगा लिलावात भरपूर पैसे मिळतील याची खात्री आहे. मुंबई संघाने आधीच पाच कॅप्ड खेळाडूंना संघात कायम ठेवले असल्याने किशनवर आरटीएम कार्ड वापरता येणार नाही. त्यामुळे पुढच्या आवृत्तीत किशन नव्या टीमसोबत दिसणार आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडचं नेतृत्व केलं आहे.

राजस्थान रॉयल्सने इंग्लंडचा जोस बटलरला रिलीज केलं आहे. फ्रँचायझीने आधीच 6 खेळाडूंना संघात कायम ठेवले असल्याने बटलर पुढच्या पर्वात नवीन संघासोबत खेळताना दिसणार आहे. बटलर सलामीवीर तसेच यष्टिरक्षक म्हणून संघाला मदत करू शकतो. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याला लखनौ सुपरजायंट्स फ्रँचायझीने सोडले आहे. डीकॉक सलामीवीर तसेच यष्टिरक्षक म्हणून संघासाठी योगदान देऊ शकतो. त्यामुळे फ्रँचायझी डीकॉकवर डाव लावू शकतात.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.