AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India A vs Pakistan A Live Score Updates : पाकिस्तानला आठवा झटका, 100 धावा होणार का?

| Updated on: Feb 15, 2026 | 1:45 PM
Share

India vs Pakistan, ACC Womens Asia Cup Rising Stars 2026 Live Cricket Score Updates : वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारत ए विरुद्ध पाकिस्तान ए हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.

India A vs Pakistan A Live Score Updates : पाकिस्तानला आठवा झटका, 100 धावा होणार का?
India A vs Pakistan AImage Credit source: @BCCIWomen and @ACCMedia1 X Account

LIVE Cricket Score & Updates

  • 15 Feb 2026 01:45 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Score Updates : पाकिस्तानला आठवा झटका, 100 धावा होणार का?

    टीम इंडियाने पाकिस्तानला आठवा झटक देत त्यांचं कंबरडं मोडलं आहे.  टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या पाकिस्तान टीमला भारतीय गोलंदाजांनी झटपट झटके दिले. त्यामुळे आता पाकिस्तानच्या 100 धावा तरी होणार का? तसेच पाकिस्तान 20 ओव्हर पूर्ण खेळण्यात समर्थ ठरणार का? हे पाहणं महत्त्त्वाचं ठरणार आहे.

  • 15 Feb 2026 01:45 PM (IST)

    पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी

    पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मला जीवे मारण्याची धमकी… पंकजा मुंडेंवर व्हिडीओ करु नको, असं सांगितलं… करुणा मुंडेंची माहिती… तर मला धमकी देण्यापेक्षा काम करा… करुणा मुंडेंचं उत्तर…

  • 15 Feb 2026 01:19 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Score Updates : पाकिस्तानची दुर्दशा, टीम इंडियाकडून सहावा झटका

    टीम इंडियाच्या ए च्या गोलंदाजांसमोर पाकिस्तान ए संघाने गुडघे टेकले आहेत. भारताने पाकिस्तानला झटपट धक्के देत बॅकफुटवर टाकलं आहे. पाकिस्तानची 10 ओव्हरमध्ये 6 आऊट 46 अशी स्थिती झाली आहे.

  • 15 Feb 2026 01:00 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Score Updates : पाकिस्तानला चौथा झटका, सायमा ठाकोरकडून कॅप्टनची शिकार

    टीम इंडियाने पाकिस्तानला चौथा झटका दिला आहे. सायमा ठाकोर हीने पाकिस्तानची कॅप्टन हाफसा खालिद हीला 1 रनवर बोल्ड केलंय. त्यामुळे पाकिस्तानचा स्कोअर 4.4 ओव्हरमध्ये 4 आऊट 21 असा झाला आहे.

  • 15 Feb 2026 12:56 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Score Updates : पाकिस्तानला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके, टीम इंडियाची कडक सुरुवात

    इंडिया ए टीमने पाकिस्तान विरुद्ध कडक सुुरुवात केलीय. सायमा टाकोर हीने पाकिस्तानला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. त्यानंतर भारताने चौथ्या  ओव्हरमध्ये पाकिस्तानला 2 झटके दिले आहेत. जितामनी कलिता हीने पहिल्याच बॉलवर ओमैमा सोहेल हीला विकेटकीपरच्या हाती 1 रनवर कॅच आऊट केलं. त्यानंतर चौथ्या चेंडूवर अनुष्का शर्माने एमान नासीर हीला 4 रन्सवर रन आऊट केलं. 

  • 15 Feb 2026 12:35 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Score Updates : भारताची जबदरस्त सुरुवात, पाकिस्तानला पहिल्या ओव्हरमध्ये झटका

    सायमा ठाकोर हीने इंडिया ए टीमला जबरदस्त सुरुवात मिळवून दिली आहे. सायमाने पाकिस्तानला पहिल्याच ओव्हपमध्ये झटका दिला आहे. सायमाने युसरा आमीर हीला बोल्ड केलं आहे.

  • 15 Feb 2026 12:27 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Updates : इंडिया ए प्लेइंग इलेव्हन

    हुमैरा काझी, वृंदा दिनेश, तेजल हसबनीस, अनुष्का शर्मा, राधा यादव(कर्णधार), ममता माडीवाला(विकेटकीपर), तनुजा कंवर, प्रेमा रावत, मिन्नू मणी, सायमा ठाकोर आणि जिंतिमणी कलिता.

  • 15 Feb 2026 12:14 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Updates : पाकिस्तानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

    पाकिस्तान ए टीमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. पाकिस्तानची कॅप्टन हाफसा खालिद हीने टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया पाकिस्तानला किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    पाकिस्तान ए टीमने टॉस जिंकला

  • 15 Feb 2026 12:07 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Updates : पाकिस्तान ए वुमन्स टीम

    पाकिस्तान ए वुमन्स टीम : युसरा अमीर (विकेटकीपर), हाफसा खालिद (कॅप्टन) शवाल जुल्फिकार, हुरैना सज्जाद, गुल रुख, नूरीन याकूब, वहिदा अख्तर, इमान नसीर, अनोशा नसीर, मोमिना रियासत, सय्यदा मासूमा झहरा, उम्म-ए-हानी, लुबना बेहराम, कोमल खान आणि नेहा शर्मीन.

  • 15 Feb 2026 12:05 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Updates : इंडिया ए टीम

    इंडिया ए टीम : राधा यादव (कर्णधार), ममथा माडीवाला (विकेटकीपर), हुमैरा काझी, वृंदा दिनेश, तेजल हसबनीस, अनुष्का शर्मा, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, सायमा ठाकोर, नंदिनी कश्यप, सोनिया मेंढिया, जिंतीमणी कलिता, नंदनी शर्मा आणि दिया यादव.

  • 15 Feb 2026 12:03 PM (IST)

    IND A vs PAK A, Live Updates : इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए सामना

    वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा सामना सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 12 वाजता टॉस होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे.

क्रिकेट चाहत्यांसाठी आज (15 फेब्रुवारी) खऱ्या अर्थाने महारविवार आहे. क्रिकेटप्रेमींना तब्बल भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 2 सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहेत. आयसीसी मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए यांच्यात सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Published On - Feb 15,2026 12:03 PM

Follow us
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने.
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.