India vs England 1st Test, 3rd Day Highlights | तिसऱ्या दिवसखेर टीम इंडियाच्या 6 बाद 257 धावा, अजूनही 321 धावांनी पिछाडीवर

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसखेर 6 विकेट्स गमावून 257 धाना केल्या आहेत.

India vs England 1st Test, 3rd Day Highlights | तिसऱ्या दिवसखेर टीम इंडियाच्या 6 बाद 257 धावा, अजूनही 321 धावांनी पिछाडीवर
वॉशिंग्टन सुंदर

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (india vs england 2021 1st test) यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिली कसोटी खेळण्यात येत आहे. या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसर्‍या दिवशी भारताने 6 गडी गमावून 257 धावा केल्या. पहिल्या डावात टीम इंडिया 321 धावांनी पिछाडीवर आहे. रवीचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर नाबाद असून चौथ्या दिवशीही या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे. (india vs england 2021 1st test day 3 live cricket score updates online in marathi at ma chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड

Match Highlights

 • तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

  तिसर्‍या दिवशी भारताने 6 गडी गमावून 257 धावा केल्या. पहिल्या डावात टीम इंडिया 321 धावांनी पिछाडीवर आहे. रवीचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर नाबाद असून चौथ्या दिवशीही या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे.

 • इंग्लंडच्या पहिल्या डावात 578 धावा

  इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 578 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक 218 धावांची खेळी केली. तर डोमिनिक सिबलेने 87 तर बेन स्टोक्सने 82 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवीचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 07 Feb 2021 17:27 PM (IST)

  तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

  चेन्नई कसोटीतील तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसर्‍या दिवशी भारताने 6 गडी गमावून 257 धावा केल्या. पहिल्या डावात टीम इंडिया 321 धावांनी पिछाडीवर आहे. रवीचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर नाबाद असून चौथ्या दिवशीही या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे.

 • 07 Feb 2021 17:09 PM (IST)

  टीम इंडिया 250 पार

  टीम इंडियाने 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे इंग्लंडकडे 350 पेक्षा कमी धावांची आघाडी राहिली आहे.  रिषभ पंत आऊट झाल्याने टीम इंडियाचाी 225-6 अशी स्थिती झाली. पण यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विनने टीम इंडियाचा डाव सावरला आहे.

 • 07 Feb 2021 15:47 PM (IST)

  अवघ्या 9 धावांनी पंतचे शतक हुकले

  img

  रिषभ पंतचे अवघ्या 9 धावांनी शतक हुकले आहे. पंत 91 धावांवर आऊट झाला आहे. पंतने 88 चेंडूत 9 फोर आणि 5 सिक्ससह 91 धावांची खणखणीत खेळी केली. मात्र तो शतक लगावण्यात अपयशी ठरला.

 • 07 Feb 2021 15:28 PM (IST)

  चेतेश्वर पुजारा आऊट

  img

  टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा ही  टीम इंडियाची सेट जोडी फुटली आहे. चेतेश्वर पुजारा आऊट झाला आहे. पुजाराला डोम बेसने रोरी बर्न्सच्या हाती कॅच आऊट केलं. पुजाराने 143 चेंडूत 11 चौकारांसह 73 धावा केल्या.

 • 07 Feb 2021 15:12 PM (IST)

  पंत-पुजाराची 100 रन्सची पार्टनरशीप

  चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत या जोडीने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. टीम इंडिया अडचणीत असताना या दोघांनी निर्णायक क्षणी ही शतकी भागीदारी केली. दरम्यान तिसऱ्या सत्रातील खेळ सुरु आहे.

 • 07 Feb 2021 14:48 PM (IST)

  तिसऱ्या सत्राला सुरुवात

  चेन्नई कसोटीतील तिसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा ही जोडी मैदानात खेळत आहे. या जोडीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

 • 07 Feb 2021 14:37 PM (IST)

  टी ब्रेकपर्यंत टीम इंडियाच्या 4 बाद 154 धावा

  टीम इंडियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना चहापानापर्यंत 4 विकेट्स गमावून  154 धावा केल्या आहेत.  रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारामध्ये नाबाद  81 धावांची भागीदारी झाली आहे. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी टीम इंडियाचा अडखळलेला डाव सावरला. सलामी जोडी आणि मीडल ऑर्डरमधील टॉप फलंदाज अपयशी ठरल्यानंतर या दोघांनी इंग्लिश बोलर्सवर हल्ला चढवत टीम इंडियाला 150 पार नेले. दरम्यान टीम इंडिया अजूनही 424 धावांनी पिछाडीवर आहे.

 • 07 Feb 2021 14:15 PM (IST)

  पुजारा पाठोपाठ पंतचे दणदणीत अर्धशतक

  पुजारानंतर रिषभ पंतने शानदार अर्धशतक लगावलं आहे. हे अर्धशतक पंतच्या टेस्ट कारकिर्दीतील  5 वं अर्धशतक ठरलं.  पुजारा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सातत्याने चांगली खेळी करतोय.

 • 07 Feb 2021 14:11 PM (IST)

  चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक

  चेतेश्वर पुजाराने अर्धशतक लगावलं आहे. टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी त्याने ही कामगिरी केली आहे. पुजाराच्या कसोटी कारकिर्दीतील हे 28 वं अर्धशतक ठरलं.

 • 07 Feb 2021 14:01 PM (IST)

  पुजारा-पतंची अर्धशतकी भागीदारी

  चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतने टीम इंडियाचा डाव सावरत पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या भागीदारीदरम्यान पंत आणि पुजाराने जोरदार फटकेबाजी केली.

 • 07 Feb 2021 13:39 PM (IST)

  टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण

  टीम इंडियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील सुरुवात निराशाजनक राहिली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल झटपट आऊट झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेही बाद झाले. दरम्यान आता  चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत खेळत आहेत.

 • 07 Feb 2021 13:31 PM (IST)

  विराट पाठोपाठ रहाणे माघारी

  img

  टीम इंडियाने 2 विकेट्स गमावले आहेत. विराटनंतर अजिंक्य रहाणेही बाद झाला आहे. रहाणेने टीम इंडियाच्या चाहत्यांची निराशा केली.  रहाणे 1 रन करुन आऊट झाला.

 • 07 Feb 2021 13:26 PM (IST)

  टीम इंडियाला तिसरा धक्का

  img

  कर्णधार विराट कोहली 11 धावा करुन आऊट झाला आहे. डोमिनिक बेसने आपल्या गोलंदाजीवर विराटला ओली पोपच्या हाती कॅच आऊट केलं.

 • 07 Feb 2021 12:36 PM (IST)

  दुसऱ्या सत्राला सुरुवात

  तिसर्‍या दिवसाच्या दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत.

 • 07 Feb 2021 11:41 AM (IST)

  लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाच्या 2 बाद 59 धावा

  टीम इंडियाने लंच ब्रेकपर्यंत 2 विकेट्स गमावून 59 धावा केल्या आहेत. लंचपर्यंत टीम इंडियाने रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीची विकेट्स गमावल्या आहेत. तर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत.

 • 07 Feb 2021 11:25 AM (IST)

  टीम इंडियाच्या 50 धावा पूर्ण

  टीम इंडियाने पहिल्या डावात 50 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 विकेट्स गमावून  50 धावा केल्या आहेत. कर्णधार विराटा कोहली आणि चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत.

 • 07 Feb 2021 11:16 AM (IST)

  टीम इंडियाची सलामी जोडी माघारी

  img

  टीम इंडियाला दुसरा धक्का लागला आहे. सलामीवीर शुबमन गिल आऊट झाला आहे. जोफ्रा आर्चरने शुबमनला अँडरसनच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमनने 29 धावांची खेळी केली. गिल आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 2 बाद 44 अशी झाली आहे.

 • 07 Feb 2021 11:03 AM (IST)

  अँडरसनच्या ओव्हरमध्ये शुबमनचे शानदार 2 चौकार

  img

  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या एकाच ओव्हरमध्ये सलामीवीर शुभमन गिलने दोन चौकार ठोकले. भारताच्या डावातील 7 व्या ओव्हरमधील तिसर्‍या आणि 5 व्या चेंडूंवर त्याने हे फोर लगावले. यासह 7 ओव्हरनंतर टीम इंडियाचा स्कोअर 35-1 असा झाला आहे.

 • 07 Feb 2021 10:50 AM (IST)

  रोहितनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात

  हिटमॅन रोहित आऊट झाल्यानंतर टीम इंडियाचा तारणहार चेतेश्वर पुजारा मैदानात आला आहे. पुजारा आणि शुबमन गिल मैदानात खेळत आहेत.

 • 07 Feb 2021 10:42 AM (IST)

  टीम इंडियाला पहिला झटका

  img

  टीम इंडियाची पहिल्या डावातील निराशाजनक सुरुवात झाली आहे. ‘हिटमॅन’ रोहित शर्मा 6 धावा करुन तंबूत परतला आहे. जोफ्रा आर्चरने  रोहितला जॉस बटलरच्या हाती कॅच आऊट केलं.

 • 07 Feb 2021 10:39 AM (IST)

  टीम इंडियाच्या पहिल्या डावातील बॅटिंगला सुरुवात, रोहित-शुबमन सलामी जोडी मैदानात

  टीम इंडियाच्या पहिल्या डावातील बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि  शुबमन गिल सलामी जोडी फलंदाजी करत आहेत. या दोघांनी 3.2 ओव्हर्समध्ये 19 धावा जोडल्या आहेत.

 • 07 Feb 2021 10:19 AM (IST)

  इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर आटोपला

  img

  अश्विनने जेम्स अँडरसनचा त्रिफळा उडवला. यासह इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर आटोपला आहे.

 • 07 Feb 2021 09:59 AM (IST)

  इंग्लंडला नववा धक्का

  img

  इंग्लंडने नववी विकेट गमावली आहे. जसप्रीत बुमराहने डोमनिक बेसला एलबीडब्ल्यू आऊट केलं. बेसने 105 चेंडूत 6 चौकारांसह 34 धावा केला.

 • 07 Feb 2021 09:44 AM (IST)

  तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

  डॉम बेस आणि जॅक लीच तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. टीम इंडियाने गोलंदाजीची सुरुवात अश्विनकडून केली. इंग्लंडने पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव केली. यामुळे इंग्लंडचा स्कोअर 8 बाद 556 झाला आहे.

 • 07 Feb 2021 09:09 AM (IST)

  अवघ्या काही मिनिटांमध्ये तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होणार

  अवघ्या काही मिनिटांमध्ये पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे.

Published On - 5:29 pm, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI