India vs England 2nd Test, 2nd Day Highlights | दुसऱ्या दिवसखेर रोहित-पुजारा नाबाद, टीम इंडियाकडे 249 धावांची भक्कम आघाडी

| Updated on: Feb 15, 2021 | 8:37 AM

टीम इंडियाला दुसऱ्या डावात 195 धावांची आघाडी मिळाली आहे.

India vs England 2nd Test, 2nd Day Highlights | दुसऱ्या दिवसखेर रोहित-पुजारा नाबाद, टीम इंडियाकडे 249 धावांची भक्कम आघाडी
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (Team India vs England 2nd Test) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम (ma chidambaram stadium) स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दिवसखेर 1 विकेट गमावून 54 धावा केल्या आहेत. भारताकडे दुसऱ्या डावात 195 धावांची आघाडी आहे. यामुळे टीम इंडियाने दिवसखेर 249 रन्सची लीड घेतली आहे. रोहित शर्मा 25 तर चेतेश्वर पुजारा 7 धावांवर नाबाद आहेत. (india vs england 2021 2nd test day 2 live cricket score updates online in marathi at ma chidambaram stadium chennai) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

टीम इंडियाकडे 249 धावांची आघाडी

टीम इंडियाने दुसऱ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 54 धावा केल्या आहेत. भारताकडे दुसऱ्या डावात 195 धावांची आघाडी आहे. यामुळे टीम इंडियाने दिवसखेर 249 रन्सची लीड घेतली आहे. रोहित शर्मा 25 तर चेतेश्वर पुजारा 7 धावांवर नाबाद आहेत. तर शुबमन गिल 14 धावा करुन माघारी परतला. गिलला जॅक लीचने एलबीडबल्यू आऊट केलं.

इंग्लंडच्या पहिल्या डावात 134 धावा

टीम इंडियाने पहिल्या डावात 329 धावा केल्या. टीम इंडियाकडून रोहित शर्माने 161, अजिंक्य रहाणेने 67 तर रिषभ पंतने नाबाद  58 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ओली स्टोनने 3 तसेच जॅक लीचने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 14 Feb 2021 04:54 PM (IST)

    दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त

    भारताने दुसऱ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 54 धावा केल्या आहेत. भारताकडे दुसऱ्या डावात 195 धावांची आघाडी आहे. यामुळे टीम इंडियाने दिवसखेर 249 रन्सची लीड घेतली आहे. रोहित शर्मा 25 तर चेतेश्वर पुजारा 7 धावांवर नाबाद आहेत. तर शुबमन गिल 14 धावा करुन माघारी परतला. गिलला जॅक लीचने एलबीडबल्यू आऊट केलं.

    टीम इंडियाचा स्कोअर

    54-1 (18 Overs)

    रोहित शर्मा – 25* (62)

    चेतेश्वर पुजारा – 7* (18)

  • 14 Feb 2021 04:06 PM (IST)

    भारताला पहिला धक्का

    भारताने पहिली विकेट गमावली आहे. शुबमन गिल 14 धावांवर आऊट झाला आहे. जॅक लीचने गिलला एलबीडबल्यू आऊट केलं.

  • 14 Feb 2021 03:50 PM (IST)

    टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील बॅटिंगला सुरुवात

    टीम इंडियाच्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामी जोडी मैदानात खेळत आहे. इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर बाद केल्याने भारताला दुसऱ्या डावात 195 धावांची मजबूत आघाडी मिळाली आहे.

  • 14 Feb 2021 03:46 PM (IST)

    इंग्लंडच्या पहिल्या डावात 134 धावा

    टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 134 धावांवर गुंडाळलं आहे. यामुळे भारताला दुसऱ्या डावात 195 धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून पहिल्या डावात विकेटकीपर बेन फोक्सने सर्वाधिक नाबाद 42 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून आर अश्विनने सर्वाधिक 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. इशांत शर्मा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 फलंदाजांना माघारी धाडलं. तर मोेहम्मद सिराजने 1 विकेट घेत चांगली साथ दिली.

  • 14 Feb 2021 02:23 PM (IST)

    दुसऱ्या सत्रात टीम इंडियाचा दबदबा

    दुसऱ्या सत्रात टीम इंडियाने दबदबा कायम राखला आहे. दुसऱ्या सत्रात इंग्लंडने 8 विकेट्स गमावून 106 धावा केल्या. टीम इंडियाकडून अश्विनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेलने 2 बळी मिळवल्या. दरम्यान इंग्लंड अजून 233 धावांनी पिछाडीवर आहे.

  • 14 Feb 2021 02:15 PM (IST)

    अश्विनचा 'चौकार', इंग्लंडला आठवा धक्का

    इंग्लंडने आठवी विकेट गमावली आहे. अश्विनने ओली स्टोनला रोहित शर्माच्या हाती कॅच आऊट केलं. यासह अश्विनने 4 विकेट्स पूर्ण केल्या आहेत.

  • 14 Feb 2021 02:11 PM (IST)

    इंग्लंडला सातवा धक्का

    अक्षर पटेलने इंग्लंडला सातवा दणका दिला आहे. अक्षरने मोईन अलीला 6 रन्सवर अजिंक्य रहाणे हाती कॅच आऊट केलं.

  • 14 Feb 2021 02:00 PM (IST)

    मोहम्मद सिराजच्या सलग 4 मेडन ओव्हर्स

    मोहम्मद सिराजने आतापर्यंत 4 ओव्हर्स टाकल्या आहेत. विशेष म्हणजे या 4 ओव्हर मेडन टाकल्या आहेत. त्यातही सिराजने एक विकेट घेण्याची कामगिरी केली. त्यामुळे इंग्लंडची बिकट अवस्था झाली आहे.

  • 14 Feb 2021 01:28 PM (IST)

    इंग्लंडला सहावा झटका

    इंग्लंडने सहावी विकेट गमावली आहे. मोहम्मद सिराजने ओली पोपला विकेटकीपर रिषभ पंतच्या हाती 22 धावांवर कॅच आऊट केलं. यामुळे इंग्लंडची 87-6 अशी स्थिती झाली आहे. दरम्यान इंग्लंड 242 धावांनी पिछाडीवर आहे.

  • 14 Feb 2021 12:33 PM (IST)

    इंग्लंडला पाचवा धक्का

    इंग्लंडने पाचवी विकेट गमावली आहे. अश्विनने आक्रमक फलंदाज बेन स्टोक्सला 16 धावांवर आऊट केलं आहे. यामुळे इंग्लंडची 52-5 अशी बिकट स्थिती झाली आहे.

  • 14 Feb 2021 12:28 PM (IST)

    दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात

    लंचनंतर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरूवात झाली आहे. पहिल्या डावात इंग्लंडची निराशाजनक सुरुवात राहिली. इंग्लंडने लंचपर्यंत 4 विकेट्स गमावून 39 धावा केल्या. लोकल बॉय अश्विनने 2 विकेट्स घेतल्या.तर इशांत शर्मा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 1 विकेट मिळवल्या. दरम्यान आता दुसर्‍या सत्रात बेन स्टोक्स आणि ओली पोपवर इंग्लंडची जबाबदारी आहे.

  • 14 Feb 2021 11:47 AM (IST)

    लचंब्रेकपर्यंत इंग्लंडच्या 4 बाद 39 धावा

    दुसर्‍या टेस्टमध्ये दुसर्‍या दिवशी लंचपर्यंतचा खेळ म्हणजे पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. पहिल्या सत्रात एकूण 26 षटकांत एकूण 68 धावा झाल्या आणि 8 विकेट्स पडल्या. इंग्लंडने त्यात 4 गडी गमावून 39 धावा केल्या. तर टीम इंडियाने पहिल्या डावात 29 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स गमावल्या. यासह भारताचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला.

  • 14 Feb 2021 11:37 AM (IST)

    इंग्लंडला चौथा झटका

    अश्विनने इंग्लंडला आणखी एक दणका दिला आहे. अश्विनने डॅनियल लॉरेन्सला 9 धावांवर शुबमन गिलच्या हाती कॅच आऊट केलं आहे. यामुळे इंग्लंडची 4 बाद 39 अशी स्थिती झाली आहे. इंग्लंड अजून 290 धावांनी पिछाडीवर आहे.

  • 14 Feb 2021 11:12 AM (IST)

    जो रुट आऊट

    टीम इंडियाने इंग्लंडला तिसरा धक्का दिला आहे. पदार्पण केलेल्या अक्षर पटेलने इंग्लंडचा कर्णधार जो रुटला आऊट केलं आहे. यासह अक्षरने कसोटीमधील आपली पहिली विकेट मिळवली आहे. रुटने 6 धावा केल्या.

  • 14 Feb 2021 11:04 AM (IST)

    इंग्लंडला दुसरा झटका

    स्पिनर रवीचंद्रन अश्विनने इंग्लंडला दुसरा धक्का दिला आहे. अश्विनने कॅप्टन विराट कोहलीच्या हाती डॉमिनिक सिबलेला कॅच आऊट केलं. सिबलेने  16 धावा केल्या.

  • 14 Feb 2021 10:26 AM (IST)

    इंग्लंडला पहिला झटका

    इशांत शर्माने इंग्लंडला पहिला धक्का दिला आहे.  इंग्लंडच्या फलंदाजीतील पहिल्याच ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर इशांतने रोरी बर्न्सला शून्यावर एलबीडबल्यू आऊट केलं.

  • 14 Feb 2021 10:16 AM (IST)

    टीम इंडिया 329 धावांवर ऑलआऊट

    टीम इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपासून टीम इंडियाला धक्के द्यायला सुरुवात केली. मोईन अलीने आपल्या एका ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेतल्या. तर ओली स्टोननेही एकाच षटकात 2 बळी घेत भारताचा डाव गुंडाळला. टीम इंडियाकडून रोहित शर्माने 161, अजिंक्य रहाणेने 67 तर रिषभ पंतने नाबाद  58 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर ओली स्टोनने 3 तसेच जॅक लीचने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं.

  • 14 Feb 2021 10:08 AM (IST)

    भारताला नववा धक्का

    टीम इंडियाने नववी विकेट गमावली आहे. 14 चेंडू डॉट केल्यानंतर कुलदीप यादव 15 बोलवर शून्यावर आऊट झाला.

  • 14 Feb 2021 09:57 AM (IST)

    रिषभ पंतचे अर्धशतक

    रिषभ पंतने दमदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे सहावं अर्धशतक ठरलं आहे.

  • 14 Feb 2021 09:46 AM (IST)

    मोईन अलीचा दणका, टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के

    मोईन अलीने टीम इंडियाला दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला एकाच ओव्हरमध्ये  2 धक्के दिले आहेत. अक्षर पटेलला बाद केल्यानंतर मोईनने इशांत शर्माला आऊट केलं. यामुळे टीम इंडियाची 301-8 अशी स्थिती झाली आहे.

  • 14 Feb 2021 09:43 AM (IST)

    भारताला सातवा धक्का

    टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. अक्षर पटेल 5 धावा करुन माघारी परतला आहे.

  • 14 Feb 2021 09:38 AM (IST)

    पहिली ओव्हर मेडन

    जॅक लीचने दुसऱ्या दिवसातील पहिली ओव्हर मेडन टाकली आहे. लीचने सामन्यातील 89 व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलला एकही धाव काढू दिली नाही.

  • 14 Feb 2021 09:36 AM (IST)

    दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

    दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे.  रिषभ पंत आणि अक्षर पटेल ही जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 14 Feb 2021 08:46 AM (IST)

    दुसऱ्या कसोटीतील दुसरा दिवस

    टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा आजचा (14 फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे.

Published On - Feb 14,2021 4:54 PM

Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.