IPL 2021 CSK vs RR Head to Head : संजू सॅमसनसमोर कॅप्टन कूल धोनीचं आव्हान, कोणाचं पारडं जड

आयपीएल 2021 स्पर्धेत सोमवारी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.

1/5
आयपीएल 2021 स्पर्धेत सोमवारी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होणार आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने धोनीला आपला आदर्श मानला आहे आणि आज संजूला थेट धोनीशी दोन हात करावे लागणार आहेत.
2/5
आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ 24 वेळा आमनेसामने आले आहेत. या 24 पैकी 14 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर राजस्थानने 10 सामने जिंकले आहेत.
3/5
चेन्नईने यापूर्वी राजस्थानवर वर्चस्व गाजवलं असलं, तरी आयपीएलच्या मागील हंगामात राजस्थान रॉयल्सने लीग फेरीत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दोन्ही सामने जिंकले होते. चेन्नई संघाची कामगिरी गेल्या वर्षी खूपच निराशाजनक होती.
4/5
उभय संघांमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये सुरेश रैनाने सर्वाधिक 638 धावा केल्या आहेत. दुसर्‍या क्रमांकावर राजस्थानचा माजी शिलेदार अजिंक्य रहाणे आहे. रहाणे यापूर्वी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. तेव्हा त्याने राजस्थानकडून खेळताना चेन्नईविरुद्ध 335 धावा फटकावल्या होत्या.
5/5
गोलंदाजीतही चेन्नईचा संघ उजवा वाटतो, कारण उभय संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स रवींद्र जाडेजा आण ड्वेन ब्राव्होने मिळवल्या आहेत. प्रत्येकी 15 विकेट्स दोघांच्या नावावर आहेत.