Photo : ‘अरे बाबांनो मी तिचा मालक नाहीय’, इरफान खान बायकोच्या त्या फोटोवरुन ट्रोलर्सवर भडकला

Irfan Pathan Statement of Wife Safa blur Photo Controvercy

May 26, 2021 | 12:43 PM
Akshay Adhav

| Edited By: VN

May 26, 2021 | 12:43 PM

भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा चेहरा ब्लर केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नेटकरी इरफानला प्रश्न विचारुन बायकोला सामनतेची वागणूक देण्याविषयी सांगत आहेत.

1 / 6
या फोटोवरुन पहिल्यांदा इरफान मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाला. सोशल मीडियावर खास करुन ट्विटटवर अनेक नेटकऱ्यांनी इरफानला या फोटोवर सुनावलं. नंतर याचं उत्तर देणं इरफानला भाग पडलं.

2 / 6
हा फोटो माझ्या पत्नीने मुलाच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. या फोटोवरुन आम्हाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. माझ्या पत्नीने तिच्या मर्जीने स्वत:चा चेहरा ब्लर केला आहे. मी तिचा मालक नाही तर जोडीदार आहे, असं उत्तर इरफानने नेटकऱ्यांना दिलं आहे.

3 / 6
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांने आपली पत्नी सफा बेग हिच्यासोबतचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जवळपास ती बुर्ख्यातच दिसून येते. इरफान आणि सफा 2016 साली लग्नाच्या बेडीत अडकले.

4 / 6
इरफानची ओळख सगळ्या जगाला आहे. पण त्याच्या पत्नीविषयी फार कमी लोकांना माहितीय. सफाचे वडील मिर्झा फारूक बेग हे सौदी अरेबियाचे बिझनेसमॅन आहेत. सफा आणि इरफान यांची दुबईमध्ये पहिली भेट झाली. सफाचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. ती सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये वाढली आणि इंटनॅशनल इंडियन स्कूलमध्ये तिचं शिक्षण झालं.

5 / 6
27 वर्षांची सफा खूप सुंदर आहे. ती मध्य पूर्व आशियातील एक प्रसिद्ध मॉडेल आहे आणि तिने अनेक नामांकित मासिकांमध्ये तिची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. लग्नानंतर सफाने तिचे आयुष्य खाजगी ठेवणे पसंत केले.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें